Eknath shinde : अजित पवार, देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला का होते गैरहजर?
Eknath shinde : सध्या शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा शासन आपल्या दारी जोरदार कार्यक्रम सुरु आहे. मात्र आजच्या बुलडाण्यातील कार्यक्रमात दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित नव्हते. त्यामुळे साऱ्यांच्या नजरा त्यांच्या अनुपस्थितीकडेच होत्या.
ADVERTISEMENT
CM Eknath shinde : ज्या लोकांनी मराठा समाजाचा गळा घोटला, त्याच लोकांनी जालन्यातील आंदोलनावर राजकारण केले असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांनी केली. बुलडाण्यात शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या निमित्ताने ते बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधकांवर पलटवार करत महाविकास आघाडीचे सरकार (mahavikas aghadi) असताना त्यांनी भोंगळ कारभार कसा केला यावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे यांनी बुलडाण्यात शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेतला असला तरी या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित नसल्यामुळे त्यांची जोरदार चर्चा सुरु होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी भाषणाला सुरुवात करताच फडणवीस-पवार यांच्या अनुपस्थितीबद्दल त्यांनी स्पष्ट सांगून टाकले. (chief minister eknath shande disclosed absence of deputy chief minister devendra fadnavis, ajit Pawar buldana)
ADVERTISEMENT
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती
महाराष्ट्रात सध्या शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जोरदारपणे सुरु आहे. त्यामुळे हा कार्यक्रम आता बुलडाण्यालाही मोठ्या उत्साहात घेण्यात आला. मात्र या कार्यक्रमाला सरकारमधीलच दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची उपस्थित दिसून आली नाही. त्यावर बोलताना एकनाथ शिंदे अनुपस्थितीचे कारण सांगितले.
हे ही वाचा >> Maratha Morcha : उदयनराजेंनी उद्धव ठाकरेंच्या सरकारवरच फोडलं खापर, म्हणाले…
…म्हणून हे आले नाहीत
एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हणाले की, काही लोकं आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हेही उपस्थित नव्हते असं सुरु करतील. मात्र त्यातील खरी गोष्ट ही आहे की, देवेंद्र फडणवीस यांचा नियोजित दौरा होता. त्यामुळे ते सध्या लेह-लडाक दौऱ्यावर आहेत. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तब्बेत बरी नसल्यामुळे ते या दौऱ्यावर आले नाहीत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
सरकार फेव्हिकॉलचा मजबूत जोड
सरकारमधील दोन्ही उपमुख्यमंत्री शासन आपल्या दारी कार्यक्रमाला उपस्थित नसल्याचे सांगत लोकं आता काहीही सांगतील. मात्र आमचे सरकार फेव्हिकॉलचा मजबूत जोड आहे, सरकार घट्ट आहे असंही देखील त्यांनी सांगितले.
हे ही वाचा >> Maratha Morcha : एकनाथ शिंदेंनी दिले आदेश, ‘या’ अधिकाऱ्यांवर होणार कारवाई
ADVERTISEMENT