देवेंद्र फडणवीसांनी मराठा आरक्षणावरून विरोधकांनाच घेरलं; म्हणाले, ‘ज्यांनी घालवलं, तेच…’
भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करत होते. यावेळी फडणवीस यांनी मराठा आरक्षण आणि इंडिया आघाडीवर टीका केली. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम भाजपाने केले होते. ज्यावेळेस आमचं सरकार होते, त्यावेळेस सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकलं होतं.
ADVERTISEMENT
महाविकास आघाडीच सरकार असताना सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली होती. आता ज्यांनी मराठा आरक्षण घालवलं तीच लोक आता तोंडवर करून मागणी करतायत, अशी टीका उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. फडणवीस यांनी यासह विरोधकांच्या इंडिया आघाडीवरही हल्ला चढवला. (dcm devendra fadnavis criticize opposition maratha reservation bjp meeting maharahstra politics)
ADVERTISEMENT
भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करत होते. यावेळी फडणवीस यांनी मराठा आरक्षण आणि इंडिया आघाडीवर टीका केली. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे काम भाजपाने केले होते. ज्यावेळेस आमचं सरकार होते, त्यावेळेस सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकलं होतं. पण ज्यावेळेस महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हाच आरक्षणाला स्थगिती मिळाली. त्यामुळे ज्यांनी मराठा आरक्षण घालवलं तेच तोंडवर करून बोलतायत,अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी ठाकरेंवर केली.
हे ही वाचा : Solapur : मोबाईल ठरला तरुणाच्या आत्महत्येचं कारण, शेतात घेतला गळफास
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, मराठा, ओबीसी, धनगर, आदिवासी समाजाच्या प्रश्नासाठी हे सरकार संवेदनशील आहे. त्यामुळे एक गोष्ट स्पष्टच सांगतो, आम्ही सगळ्या समाजाला न्याय द्यायचं ठरवलं आहे. पण हे करताना कुठलेही दोन समाज एकमेकांसमोर उभे ठाकणार नाहीत. या महाराष्ट्राला विकासाकडे न्यायचे असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
हे वाचलं का?
दुदैवाने महाराष्ट्रात अस्वस्थता राहिली पाहिजे, असा काही पक्षाच्या नेत्यांचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप फडणवीसांनी विरोधकांवर केला. पण मला विश्वास आहे खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदेचे सरकार हे प्रश्न संवेदनशीलपणे हाताळेल. हे प्रश्न हाताळताना कोणावर अन्याय होणार नाही, कुठेही दुफळी निर्माण होईल, हे आम्ही होऊ देणार नाही, असे फडणवीस म्हणाले आहेत.सरकारने अनेक विकासाची कामे हातात घेतली आहेत, पण विरोधक खोट बोल पण रेटून बोल, अशी भूमिका घेते. रोज नवीन पुड्या सोडायच्या, रोजच खोटं बोलायचं, एक अफवा सकाळी सोडायची, दुसरी अफवा संध्याकाळी सोडायची,अशी टीका फडणवीसांनी विरोधकांवर केली.
हे ही वाचा : पाकिस्तानसाठी बौद्ध राजाने घरदार सोडलं! बांग्लादेशी आईसोबत जेव्हा पहिल्यांदा…
इंडिया आघाडीवर काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीसांनी यावेळी इंडिया आघाडीवरही जोरदार हल्ला चढवला. आपली लढाई इंडिया आघाडीशी नाहीच आहे. राहुल गाँधी इंडिया आघाडी आपल्याशी लढाच देऊ शकत नाही, कारण गांधी परीवाराबद्दल विश्वासार्हता उरली नसल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. तसेच राहुल गांधी, ममता बॅनर्जी देशाला नेतृत्व देऊ शकत नाही.तसेच यांच्यात कुणीच राष्ट्रीय नेता देखील नाही आहे, अशी खिल्ली फडणवीसांनी उडवली. हे निवडणूकी आधी एकत्रित राहू शकत नाही निवडणूकीनंतर संबंधच नाही असा टोला देखील फडणवीसांनी लगावला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT