Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis : दानवे फडणवीसांना म्हणाले, “कावळ्यांची काविळ”

मुंबई तक

ADVERTISEMENT

After this statement of Uddhav Thackeray, not only Devendra Fadnavis, but Union Minister Nitin Gadkari and other leaders are targeting Uddhav Thackeray.
After this statement of Uddhav Thackeray, not only Devendra Fadnavis, but Union Minister Nitin Gadkari and other leaders are targeting Uddhav Thackeray.
social share
google news

Uddhav Thackeray vs Devendra fadnavis : ‘देवेंद्र फडणवीस म्हणजे नागपुरला लागलेला कलंक आहे’, या उद्धव ठाकरे यांच्या विधानावरून भाजप विरुद्ध ठाकरे अशी ठिणगी पडलीये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कलंकीची काविळ असा प्रतिहल्ला ठाकरेंवर केला. त्याला आता विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलंय.

ADVERTISEMENT

उद्धव ठाकरे यांच्या या विधानानंतर देवेंद्र फडणवीसच नव्हे, तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि इतर नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं जात आहे. फडणवीसांनी ट्विट केल्यानंतर त्याला अंबादास दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं असून, त्यांनी काही मुद्दे उपस्थित करत फडणवीसांवर हल्ला चढवला.

अंबादास दानवेंनी फडणवीसांना काय दिलंय उत्तर?

1) ज्यांच्या विरुद्ध लढून तुमच्या पक्षाचा पाया मजबूत केला अश्या गोपीनाथ मुंडे यांच्या लढ्याला तिलांजली देऊन त्यांचे राजकीय वैरी फोडाफोडीने जवळ करणे, याला म्हणतात कलंक!)

हे वाचलं का?

2) ‘मन की बात’ उर्दूतून प्रसिद्ध करणे, मशिद भ्रमण करणे आणि पुन्हा स्वतःला हिंदुत्वाचा पाईक म्हणणे, याला म्हणतात कलंक!

3) समुद्रात झेप घेऊन मर्सिलिस बंदर गाठणाऱ्या वीर सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्कार न देणे, याला म्हणतात कलंक!

ADVERTISEMENT

4) राम मंदिर आंदोलनात कारसेवकांवर गोळ्या झाडण्याचे आदेश देणाऱ्या व्यक्तीला ‘पद्मविभूषण’ देणे, याला म्हणतात कलंक!

ADVERTISEMENT

वाचा >> Crime News : “छगन भुजबळांना मारायची सुपारी मिळालीये, उद्या संपवणार”

5) आपल्या विरुद्ध बोलणाऱ्या व्यक्तींना दडपण्यासाठी पोलिसांचा वापर करणे, वारकऱ्यांवर लाठ्या चालवणे, याला म्हणतात कलंक!

6) महाराष्ट्रातून दरदिवशी ७० महिला बेपत्ता होतात आणि त्यांचा थांगपत्ता लावण्यात पोलिसांना यश येत नाही, हा आहे कलंक!

7) कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार न करता त्यांचे शव गंगेत वाहू देणे, पीएम केअर फंडाचा हिशेब जनतेपुढे न ठेवणे, याला म्हणतात कलंक!

8) कोरोना महामारी शिखर गाठत असताना पश्चिम बंगालसारख्या दाट लोकसंख्येच्या राज्यात हट्टीपणाने निवडणुकांच्या प्रचारसभा घेणे, परिस्थिती अनुकूल नाही म्हणून महाराष्ट्रात निवडणूका न घेणे, याला लोकशाहीवर कलंक म्हणतात!

वाचा >> अजित पवार एन्ट्री, शिंदे, फडणवीसांसह BJP च्या मंत्र्यांना बसणार मोठा फटका!

“कलंक नसताना तो दिसणे त्याला नजरेतील दोष म्हणतात, दिसून न दिसल्यासारखं करणे त्याला ढोंगीपणा म्हणतात. उपचार आता भाजपवर होतील आणि ते जनताच करणार आहे. त्रिशूळ असल्याचे सोंग तुम्ही आणता, मात्र तिसरा डोळा मतदारांकडेच आहे. ते योग्यवेळी तो उघडतील आणि कलंक पुसतील”, असा टोला दानवे यांनी फडणवीसांना लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना काय म्हणाले होते?

‘कलंकीचा काविळ’, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर ठाकरेंवर टीकेची तोफ डागली.

1) ज्यांच्यावर शेण खाल्ल्याचा आरोप केला, त्यांच्याचसोबत पंक्तीला बसून खाणे याला म्हणतात कलंक!
2) आमच्या हृदयस्थानी असलेल्या हिंदूहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना जनाब संबोधन सहन करणे, याला म्हणतात कलंक!
3) सकाळ, दुपार, संध्याकाळ वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या मांडीला मांडी लावून बसणे याला म्हणतात कलंक!
4) सकाळी वीर सावरकरांचा अपमान करणार्‍यांच्या गळ्यात त्याचदिवशी रात्री गळे घालणे, याला म्हणतात कलंक!
5) ज्यांच्यावर राज्याच्या संरक्षणाची जबाबदारी, त्यांनीच पोलिसांना चक्क वसुलीला लावणे, याला म्हणतात कलंक!
6) पोलिस दलातील स्वपक्षीय कार्यकर्त्याकडून उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवल्यावर त्याची पाठराखण करणे, तो लादेन आहे का असे विचारणे, याला म्हणतात कलंक!

वाचा >> BJP: उद्धव ठाकरेंना नितीन गडकरींनी सुनावलं, म्हणाले; जरा तुमची भाषा…

7) कोरोनाच्या काळात मुंबईत लोक मरत असताना मृतदेहांच्या बॅगांमध्ये सुद्धा घोटाळा करणे, याला म्हणतात कलंक!
8) लोकशाहीच्या सर्वोच्च मंदिरात न बसता लोकशाहीच्या पोकळ गप्पा मारणे, याला म्हणतात कलंक!

“असो, स्वत: कलंकित असले की इतरही कलंकित दिसायला लागतात. तुम्हाला ‘कलंकीचा काविळ’ झाला असेल तर एकदा उपचार करुन घ्या उद्धवजी”, असं फडणवीस म्हणाले होते.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT