Chhagan Bhujbal : महायुतीत वाद! शिंदेंच्या आमदारांनी मागितला भुजबळांचा राजीनामा

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

After publishing the draft notification, Chhagan Bhujbal is directly targeting Chief Minister Eknath Shinde. Therefore, Shinde's displeasure with MLAs was not hidden.
After publishing the draft notification, Chhagan Bhujbal is directly targeting Chief Minister Eknath Shinde. Therefore, Shinde's displeasure with MLAs was not hidden.
social share
google news

Chhagan Bhujbal News : महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष दिसून येत आहे. यातून आता सत्तेतील तीन पक्षांमधील नेते आमने-सामने आले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी सरकारने काढलेल्या अधिसूचनेच्या मसुद्यालाच विरोध केला आहे. भुजबळ थेट शिंदे सरकारला धारेवर धरत आहेत. त्यामुळे आता शिंदेंच्या आमदारांनी त्यांचा राजीनामा मागितला आहे. त्यामुळे महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

ADVERTISEMENT

छगन भुजबळांनी मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिका अनेकदा स्पष्ट केली आहे. मराठा समाजाला मागास सिद्ध करून स्वतंत्र आरक्षण द्या असं भुजबळ म्हणत आहेत. तर मनोज जरांगे यांनी कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना ओबीसी आरक्षण देण्याची मागणी केलीये. यावरूनच आता शिंदे सरकारमध्ये संघर्ष सुरू झाला आहे.

‘मंत्रिमंडळात ठेवलं नाही पाहिजे’

अधिसूचनेचा मसुदा प्रसिद्ध केल्यानंतर छगन भुजबळांकडून थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाच लक्ष्य केलं जात आहे. त्यामुळे शिंदेंचे आमदारांची नाराजी लपून राहिली नाही. शिवसेना (शिंदे) आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्टपणे भुजबळांचा राजीनामा घेण्याची मागणी केली.

हे वाचलं का?

हेही वाचा >> ठाकरेंना मुंबईतील’या’ दोन जागा सोडाव्या लागणार?

संजय गायकवाड काय म्हणाले तेही वाचा… ते म्हणतात, “एक मंत्रिमंडळातील सदस्य छगन भुजबळ तिरस्काराची भूमिका घेत आहेत. हा तिरस्कार बरोबर नाहीये. अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवायलं नाही पाहिजे. त्याला बाहेर केलं पाहिजे. तू शपथ घेताना राज्याच्या सगळ्या लोकांच्या हिताच्या गोष्टी करेन म्हणतो आणि इथे एका समाजाचा तिरस्कार करतो.”

“अरे उलट तर 70 वर्षे तुम्ही या समाजाच्या नोंदी काढल्या नाही म्हणून तो समाज 70 वर्षांपासून सोयींपासून वंचित राहिला आहे. ते गेलं एकीकडे आणि आज त्यांचं मूळ रेकॉर्ड सापडत आहे, तर त्यांना प्रमाणपत्र देण्यापासून कुणाचा बाप रोखू शकत नाही.”

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ठाकरेंच्या आमदारांना शिंदेंचा व्हीप पाळावा लागणार?

“सरकार त्यांना पक्षातून काढणार नाही, त्यांचा पक्षाचा वैयक्तिक निर्णय आहे, ते अजित पवार ठरवतील. त्या एका मंत्र्याच्या विरोधाने आमच्या सरकारला काही फरक पडत नाही. हे जाहीरपणे सांगतो. त्याने काय भूमिका घेतली? त्याची भूमिका सरकारची नाहीये, राष्ट्रवादीची पण नाहीये. त्यामुळे एक मंत्री विरोधही करत असेल, तरी सरकारला फरक पडत नाही.”

ADVERTISEMENT

शिवसेना प्रवक्ते शिरसाटांचा भुजबळांना डोस

बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड यांनी मांडलेल्या भूमिकेला शिवसेना प्रवक्ते संजय शिरसाट यांनी समर्थन दिलं. ते म्हणाले, “संजय गायकवाड यांनी केलेलं विधान हे वैयक्तिक जरी असलं, तरी मराठा आरक्षण हा विषय वेगळा आहे आणि ओबीसींचा विषय वेगळा आहे.”

“काही लोकांना जर राजकारण करायचं, नेते बनायचे आहे. आम्ही ओबीसी समाजाचे पाठीराखे आहोत, आम्ही या समाजाचे पाठीराखे, आम्ही त्या समाजाचे पाठीराखे आहोत, ही जी काही भूमिका घेऊन ते राजकारण करत आहेत. त्यामुळे दोन्ही समाजात अत्यंत वाईट संदेश जात आहे.”

“माध्यमांसमोर सरकारच चुकत आहे, असं म्हणत असाल तर हे योग्य नाहीये. सरकारमध्ये असून तुम्ही असं बोलत असाल, तर त्याचा राजीनामा मागितला, तर काही गैर नाहीये”, अशी भूमिका मांडत शिरसाट यांनी भुजबळांचा राजीनामा घेण्याच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

सरकारमध्ये विसंवाद

शिंदेंचे आमदार विरुद्ध भुजबळ अशी परिस्थिती गेल्या काही महिन्यांपासून निर्माण झाली आहे. काही महिन्यांपूर्वी भुजबळ आणि शिंदेंचे मंत्री शंभूराज देसाई यांच्यात वाद झाला होता. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही अप्रत्यक्षपणे भुजबळांना संयम पाळण्याचा सल्ला दिला होता. पण, दिवसेंदिवस भुजबळ आक्रमक होताना दिसत असून, सरकारमधील विसंवाद प्रकर्षाने समोर येत आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT