INDIA आघाडीचा अँकर्सवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय, भाजपचा हल्लाबोल

रोहित गोळे

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

India aghadi boycott anchors: नवी दिल्ली: भाजपच्या (BJP) विरोधात इंडिया (INDIA) आघाडी तयार झाली आहे. या इंडिया आघाडीची काल (13 सप्टेंबर) राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या दिल्लीतील घरी एक महत्त्वाची बैठक पार पडली. याच बैठकीत काही न्यूज शोवर बहिष्कार घालण्याचा निर्णय इंडिया आघाडीने घेतला. इंडिया आघाडीने असा निर्णय का घेतला? हेच आपण समजून घेऊयात. (india aghadis decision to boycott anchors bjps attack on the opposition)

ADVERTISEMENT

काही माध्यम संस्थांच्या न्यूज अँकर्सच्या शोमध्ये इंडिया आघाडीचे नेते जाणार नाहीत, असा निर्णय इंडिया आघाडीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानंतर कोणत्या अँकर्सच्या शोवर इंडिया आघाडीने बहिष्कार घातला त्याची यादीही जाहीर करण्यात आली. पण, इंडिया आघाडीने असा निर्णय का घेतला? याचं कारण काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पवन खेडा यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Shiv Sena MLA Disqualification : शिंदे विरुद्ध ठाकरे! विधानसभा अध्यक्षाच्या कोर्टात काय झालं?

इंडिया आघाडीने अँकर्सची यादी जाहीर करताच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देखील इंडियावर टीका केली. मीडियाला धमकावणे, गुन्हे दाखल करणे, पत्रकारांना धमकी देणे, त्यांची यादी तयार करणे अशा गोष्टी इंडिया आघाडी करत असून हे नाझीसारखं वागणं असल्याचं जे. पी. नड्डा म्हणाले. इतकंच नाहीतर ही आणीबाणीच्या काळातली मानसिकता असल्याचा हल्लाबोलही जे. पी. नड्डा यांनी केला आहे.

माध्यमांच्या शोवर बहिष्कार टाकण्याचा इंडिया आघाडीच्या या निर्णयाबद्दल आता वेगवेगळी मतं मांडली जात आहेत. पण विरोधकांचा हा निर्णय कितपत योग्य आहे, याबाबत जनतेला काय वाटतं हे आगामी निवडणुकीत नक्कीच दिसून येईल.

ADVERTISEMENT

इंडियाच्या बैठकीत नेमके काय-काय निर्णय झालेले?

दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची काल जी बैठक पार पडली होती त्या बैठकीला केसी वेणुगोपाल (काँग्रेस), टीआर बालू (डीएमके), तेजस्वी यादव (आरजेडी), संजय राऊत (शिवसेना युबीटी), संजय झा (जेडीयू), हेमंत सोरेन (जेएमएम),राघव चढ्ढा (आप), डी राजा (सीपीआय), उमर अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फ्रेन्स), मेहबूबा मुफ्ती (पीडीपी) आणि जावेद अली (सपा) आदी नेते उपस्थित होते.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Mumbai Plane Crash Video: मुंबई विमानतळावर 8 प्रवाशांसह चार्टर विमान कोसळलं, नेमकं काय घडलं?

या बैठकीत जागावाटपाबाबत चर्चा झाली होती. यासोबतच इंडिया आघाडी देशाच्या विविध भागात जाहीर सभा घेणार असल्याचंही ठरलं. या सभांना ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरूवात होणार आहे. या सभेची अधिकृत तारीख अद्याप निश्चित झाली नाही आहे. पण इंडिया आघाडीची ही पहिली सभा मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये पार पडणार आहे. हे बैठकीत निश्चित झाले. तसेच इंडिया आघाडी या जाहीर सभेच्या माध्यमातून वाढती महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न करणार आहे.

विशेष म्हणजे न्यूज चॅनल्सचे अँकर्स पक्षपाती आहेत त्यांच्या चर्चेच्या कार्यक्रमाला ‘इंडिया’ आघाडीतील राजकीय पक्षाने आपले प्रतिनिधी पाठवायचे नाहीत, असा मोठा निर्णय देखील बैठकीत घेण्यात आला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT