Iqbal Singh Chahal : हिशोब तर द्यावाच लागेल! सोमय्यांचा BMC आयुक्तांवर गंभीर आरोप
कोविड ऑक्सिजन प्लांट घोटाळ्यात कंत्राटदार रोमिल छेडा याला अटक झाली आहे. या अटकेनंतर किरीट सोमय्या यांच्या या गंभीर आरोपांनंतर बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
ADVERTISEMENT
kirit somaiya serious allegations on iqbal singh chahal : दिपेश त्रिपाठी, मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल (iqbal singh chahal) यांच्यावर मुंबई महापालिकेशी कोविडशी संबंधित सर्व घोटाळ्यांमध्ये सामील असल्याचा गंभीर आरोप केला आहे. तसेच याबाबत कारवाई करण्यासाठी किरीट सोमय्या यांनी दिल्लीत भारत सरकारच्या उच्च अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. या भेटीत त्यांनी कोविड घोटाळ्यांमध्ये इक्बाल सिंग चहल यांच्या कथित भूमिकेबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे आता इक्बाल सिंग यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (kirit somaiya serious allegations against the BMC commissioner iqbal singh chahal covid scam )
ADVERTISEMENT
मुंबई महापालिकेत 4 हजार कोटींचा कोविड घोटाळा झाला आहे. खिचडी, घोटाळा, कोविड सेंटर घोटाळा, ऑक्सिजन प्लांट घोटाळा, डेड बॉडी बॅग घोटाळा, रेमडीसीवीर घोटाळा, कोविड सेंटर कस्ट्रक्शन घोटाळा या सर्व प्रकरणात डिझास्टर मॅनेजमेंट प्रोटेक्शन अॅक्टचा बहाना करून तुम्ही वाचू शकत नाही, हिशोब तर द्यावा लागेल, असे थेट आव्हानच सोमय्या यांनी इक्बाल चहल यांना दिले आहे.
कोविड ऑक्सिजन प्लांट घोटाळ्यात कंत्राटदार रोमिल छेडा याला अटक झाली आहे. या अटकेनंतर किरीट सोमय्या यांच्या या गंभीर आरोपांनंतर बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Rule Change : 1 डिसेंबरपासून ‘हे’ नियम बदलले, सर्वसामान्यांच्या खिशावर काय होणार परिणाम ?
ऑक्सिजन जनरेशन प्लांट घोटाळ्याशी संबंधित एक पत्र देखील आहे. ज्यामध्ये मुंबईचे तत्कालीन पालकमंत्री अस्लम शेख यांनी जून 2021 मध्ये चहल यांना पत्र लिहून छेडा यांच्या कंपनीबद्दल इशारा दिला होता. या पत्रात अस्लम शेख यांनी लिहले होते की, छेडा यांची कंपनी जयपूरला हस्तांतरित करावी. तसेच पहिल्या पेंग्विन घोटाळ्यातही बीएमसीने कॉन्ट्रॅक्टर काळ्या यादीत टाकले होते आणि दंडही ठोठावला होता. मात्र बीएमसी आयुक्तांनी याकडे दुर्लक्ष करूनही छेडा यांच्या कंपनीला ऑक्सिजन प्लांटचे टेंडर का पास केले? असा सवाल उपस्थित केला आहे. दरम्यान या आरोपांवर इक्बाल सिंग चहलने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
दरम्यान यापूर्वी बीएमसी आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्यावरही उद्धव ठाकरे सरकारच्या जवळचे असल्याचा आरोप करण्यात आला होता. विशेष म्हणजे, अंमलबजावणी संचालनालय ईडी देखील कोविड घोटाळ्यांशी संबंधित आरोपांची चौकशी करत आहे. यामध्ये त्यांनी इक्बाल चहलची देखील चौकशी केली होती.यासोबत मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा बॉडी बॅग घोटाळा आणि ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प घोटाळ्याचाही तपास करत आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Datta Dalvi : ठाकरेंच्या नेत्याला जामीन, शिंदेंवर बोलण्यास बंदी, कोर्टाने घातल्या 5 अटी
अशा परिस्थितीत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप जर तथ्य आढळलं तर इक्बाल सिंग चहल यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT