Lok Sabha : भाजपचं मिशन-80 काय?; खासदारांना फॉर्ममधून द्यावा लागणार हिशोब

मुंबई तक

ADVERTISEMENT

BJP is working on a strategy to make a clean sweep in the upcoming Lok Sabha elections 2024 in UP.
BJP is working on a strategy to make a clean sweep in the upcoming Lok Sabha elections 2024 in UP.
social share
google news

Bjp mission 80 for UP : दिल्लीतील सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असं नेहमी म्हटलं जातं. त्याच कारण म्हणजे उत्तर प्रदेशात असलेल्या खासदारांची सर्वाधिक संख्या. भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग दिला आहे. लोकसभेत सर्वाधिक खासदार उत्तर प्रदेशातून जातात, त्यामुळे पुन्हा सत्तेत राहायचं असेल, भाजपसाठी युपी महत्त्वाची आहे. त्यामुळेच भाजपने मिशन 80 वर काम सुरू केले आहे. या संदर्भात भाजपने उत्तर प्रदेशातील खासदारांकडून परफॉर्मन्स रिपोर्ट कार्ड मागवले असून, त्यासाठी त्यांना एक फॉर्मही पाठवण्यात आला आहे. या फॉर्ममध्ये सर्व खासदारांकडून जनसंपर्क अभियानाचा अहवाल मागवण्यात आला असून, किती कुटुंबापर्यंत पोहोचला आहात?, अशी विचारणा करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

भाजपने सर्व खासदारांना दोन पानांच्या सुचनेसह तीन फॉर्म पाठवले आहेत. हे फॉर्म भरल्यानंतर त्यांना तो राज्याच्या प्रदेश कार्यालयात किंवा दिल्लीतील संसदीय कार्यालयात जमा करावा लागणार आहे. यामध्ये खासदारांनी जनसंपर्क अभियानात किती काम केले? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला आहे. यासोबतच पुढील उद्दिष्टेही देण्यात आली आहेत. खासदारांकडून दिला जाणारा हा अहवाल त्याच्या 2024 च्या तिकीट देण्यात महत्वाचा असणार आहे.

खासदारांना द्यायची आहे ही माहिती

मिळालेल्या माहितीनुसार, खासदारांना सोशल मीडियावर प्रभाव असणाऱ्या म्हणजे 100-100 सोशल मीडिया इनफ्लून्सरची यादी पाठवायची आहे. तसेच त्यांचे मेळावे आयोजित करावे लागणार आहेत. यात किती सोशल मीडियावर प्रभावी असणारे भाजपसाठी चांगले लिहितात, किती नकारात्मक लिहितात आणि किती लोक तटस्थ आहेत, हेही खासदारांना सांगावे लागणार आहेत.

हे वाचलं का?

– खासदारांना त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील 1000 प्रतिष्ठित लोकांची यादी द्यावी लागणार आहे. यामध्ये पद्म पुरस्कार विजेते, खेळाडू, शिक्षक, डॉक्टर, शहिदांचे कुटुंबीय यांचा समावेश आहे. यासोबतच त्यांना त्यांच्या परिसरातील 40 ते 50 कार्यकर्त्यांची टीम तयार करायची आहे.

हेही वाचा >> Lok Sabha Election : मोदी-शाहांचा आता यांच्यावर ‘डोळा’! काय आहे स्ट्रॅटजी?

– प्रत्येक कार्यकर्त्याला सकाळी 20 लोकांशी आणि संध्याकाळी 20 लोकांशी म्हणजेच दररोज 40 लोकांशी संपर्क साधावा लागणार आहे. संपर्कात येणाऱ्या लोकांना मोदी सरकारच्या नऊ वर्षांच्या कामांची माहिती देऊन त्यांना एक पुस्तिका देण्यास सांगण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

खासदारांनी त्यांच्या भागात किती मेळावे घेतले आणि त्यात विविध घटकांचा किती सहभाग होता, याची आकडेवारीही फॉर्ममध्ये द्यावी लागणार आहे. विशेषत: लाभार्थ्यांची संख्या, व्यापारी, सामाजिक मेळावे यांची माहिती द्यावी लागणार आहे. त्यानंतर 27 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत, त्याची तयारीही भाजप खासदारांना करावी लागणार आहे.

ADVERTISEMENT

भाजपचा 2019 चा फॉर्म्युलाच

गमावलेल्या जागा जिंकण्यासाठी भाजप वेगळी रणनीती आखत आहे. दुसरीकडे पक्षाने अनेक जागांसाठी नवीन चेहऱ्यांचा शोध सुरू केला आहे, विशेषत: अशा जागांवर जिथे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी कमकुवत उमेदवार आहेत किंवा विजयी खासदारांविरुद्ध सत्ताविरोधी वातावरण आहे. अशा जागांवर भाजपची नजर आहे. त्यामुळे जे संकेत मिळत आहेत, त्यानुसार भाजप योगी सरकारमधील मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीत उतरवू शकतात.

हेही वाचा >> Pune : दर्शना पवारची हत्याच! दोघे राजगडावर गेले, पण राहुल एकटाच परतला

भाजपच्या म्हणण्यानुसार, असे सुमारे एक चतुर्थांश खासदार आहेत, ज्यांचे तिकीट बदलले किंवा कापले जाऊ शकते. योगींच्या मंत्रिमंडळातील काही मंत्री लोकसभा निवडणूक लढवू शकतात, तसेच काही खासदारांची तिकिटे कापली जातील आणि काही खासदारांचे मतदारसंघही बदलले जातील. हा फॉर्म्युला भाजपसाठीही नवीन नाही. 2019 च्या निवडणुकीचा फॉर्म्युला बघितला तर उत्तर प्रदेशात भाजपने हाच प्रयोग केला होता.

भाजपची मिशन-80 अजेंडा काय?

2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने 62 जागा जिंकल्या होत्या. पण, यावेळी भाजपने मोठं लक्ष्य ठेवलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजप क्लीन स्वीप करण्याच्या रणनीतीवर भाजप काम करत आहे. भाजपने मिशन-2024 साठी 2019 मध्ये यूपीत लोकसभेच्या हरलेल्या जागांवर सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे. या जागा पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा -2024 मध्ये जिंकण्यासाठी पक्षाने आधीच प्रयत्न सुरू केले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यूपीत मिशन-80 लक्ष्य लक्षात घेता, लोकसभेच्या गमावलेल्या 14 जागा जागा जिंकण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावण्याची तयारी केली आहे.

दिल्लीतून आणू शकतात तिकीट

ज्यांना योगींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नाही, मात्र त्यांचं भाजपच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींशी जवळचे संबंध आहेत, अशा चेहऱ्यांबद्दल बोलायचं झालं, तर त्यांना 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तिकीट दिलं जाऊ शकतं. अशा नेत्यांमध्ये माजी मंत्री सिद्धार्थनाथ सिंह श्रीकांत शर्मा, माजी उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा अशा अनेक दिग्गजांची नावेही चर्चेत आहेत. मात्र, सध्या पक्षात विचारमंथन सुरू असले, तरी आगामी काळात निवडणूक लढविण्याचे संकेत मिळू शकतात.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT