Cabinet Expansion in Maharashtra : शाह, शिंदे आणि फडणवीसांमध्ये काय झाली चर्चा?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली.
ADVERTISEMENT
Maharashtra Cabinet Expansion Latest News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? हा प्रश्न गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. सुप्रीम कोर्टाच्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार, असंही म्हटलं गेलं. दरम्यान, आता शिंदे-फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग दिला आहे. रविवारी मध्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी खलबतं केली. या बैठकीनंतर लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर आली आहे. (maharashtra cabinet expansion in marathi)
ADVERTISEMENT
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही भेट काही विषयांवर चर्चा करण्यासाठी होती, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. पण, सूत्रांच्या माहितीनुसार अमित शाह, शिंदे आणि फडणवीस यांच्यात मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात चर्चा झाली.
शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार?
दिल्लीत झालेल्या भेटीगाठीनंतर शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 19 जूनपूर्वी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 19 जून रोजी शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. शाह यांच्यासोबतच्या बैठकीत शिवसेनेच्या वर्धापन दिनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार व्हावा, अशी भूमिका मुख्यमंत्री शिंदे यांनी मांडली असल्याचे वृत्त आहे.
हे वाचलं का?
हेही वाचा >> ‘भाजप कल्याणमध्ये उमेदवार देणार कोण म्हणालं?’, श्रीकांत शिंदे संतापले
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दिलं जाणार स्थान
भाजपकडून लोकसभा 2024 ची तयारी सुरू आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार करताना लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवूनच आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात 45 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. त्यामुळे पक्षाला निवडणुकीत अधिकाधिक यश मिळवून देण्यास फायदेशीर ठरणाऱ्या नेत्यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्याला प्राधान्य दिलं जाणार असल्याचे समजते. त्याचबरोबर मंत्रिमंडळ विस्तार करताना महिलांना संधी दिली जाणार आहे, त्यामुळे विस्तार झाल्यास कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार, हे बघावं लागेल.
‘मुंबईत महापौर भाजपचाच होणार’, शिंदेंनी शाहांकडे व्यक्त केली नाराजी
दरम्यान, बैठकीत एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांकडून केल्या जात असलेल्या विधानांचा मुद्दाही उपस्थित केल्याची माहिती सुत्रांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून भाजपचे नेते मुंबई महापालिका निवडणुकीबद्दल बोलताना मुंबई महापालिकेवर भाजपचा महापौर बसणार अशी विधानं करत आहेत.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> Odisha Train Accident : “मोदी सरकारची आवडती ‘स्टंटबाजी’ होती का?”
भाजप नेत्यांकडून केल्या जात असलेल्या विधानांमुळे शिंदेंच्या शिवसेनेतील नेत्यांमध्ये नाराजी असल्याचे समजते. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी याबद्दल अमित शाह यांच्याकडे नाराजी व्यक्त केली. अशा विधानांमुळे शिवसेनेत येऊ इच्छिणाऱ्या लोकांच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो, असंही शिंदेंनी शाहांकडे बोलल्याचं सूत्रांनी सांगितलं.
ADVERTISEMENT
शाहांची भेट कशासाठी, मुख्यमंत्री शिंदेंनी काय सांगितलं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या भेटीबद्दलची माहिती दिली आहे. शिंदेंनी ट्विट करत म्हटलं आहे की, काल, रविवारी रात्री मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली.”
“राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून, अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली”, असं शिंदेंनी सांगितलं.
काल, रविवारी रात्री मी आणि उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री @AmitShah यांची भेट घेतली.
कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले… pic.twitter.com/FUJefnkbP6
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 5, 2023
“राज्यात आगामी सर्व निवडणूका (ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, राखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार”, असा विश्वास शिंदेंनी भेटीनंतर व्यक्त केला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT