NCP: अजित पवार गटानं ‘या’ चार आमदारांची नाव का वगळली?

मुंबई तक

ADVERTISEMENT

ncp ajit pawar faction dropped names of 4 mla from sharad pawar faction raising eyebrows maharashtra politics
ncp ajit pawar faction dropped names of 4 mla from sharad pawar faction raising eyebrows maharashtra politics
social share
google news

NCP MLA: निलेश झाल्टे, मुंबई: शिवसेना पक्षातील फुटीनंतर आमदारांच्या अपात्रतेच्या (Disqualification action) याचिकेवर कारवाई सुरू आहे. असं असताना दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar)गटामधील संघर्ष आता तीव्र होण्याची चिन्हं आहेत. शरद पवार गटाकडून अजित पवार गटाच्या विरोधात कारवाईला वेग आल्यानंतर आता अजित पवार गट देखील शरद पवार गटाविरोधात आक्रमक झाला आहे. शरद पवार गटातील आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भात याचिका दाखल केली आहे. पण या सगळ्यात विशेष बाब म्हणजे शरद पवार गटातील चार आमदारांची नावं अजित पवार गटाकडून वगळण्यात आली आहेत. (ncp ajit pawar faction dropped names of 4 mla from sharad pawar faction raising eyebrows maharashtra politics)

ADVERTISEMENT

अजित पवार गटाच्या वतीने गुरुवारी विधिमंडळात शरद पवार गटातील नऊ विधानसभेच्या आमदारांविरोधात आणि विधानपरिषदेच्या तीन आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करणारी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे. पक्षविरोधी कृती केल्यामुळे सदर आमदारांवर कारवाई करावी अशी मागणी अजित पवार गटाच्या वतीने करण्यात आली आहे.

हे ही वाचा>> Parliament Special Session: ‘ऐ @#%$…’ भाजप खासदाराची लोकसभेत दुसऱ्या खासदाराला शिवीगाळ

अजित पवार गटाकडून विधानसभेच्या 9 आणि तीन विधानपरिषदेच्या आमदारांविरोधात याचिका दाखल केली. यामध्ये विधानसभेतील

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

1) जयंत पाटील

2) जितेंद्र आव्हाड

ADVERTISEMENT

3) रोहित पवार

ADVERTISEMENT

4) सुनील भुसारा

5) प्राजक्त तनपुरे

6) बाळासाहेब पाटील

7) अनिल देशमुख

8) राजेश टोपे

9) संदीप क्षिरसागर

या आमदारांची नावं आहेत.

विधान परिषदेतील या आमदारांविरोधात याचिका

1) शशिकांत शिंदे

2) अरुणकाका लाड

3) एकनाथ खडसे

यांची नावं देण्यात आली आहेत.

अजित पवार गटाने विधिमंडळाकडे याचिका दाखल करताना शरद पवार गटातील चार आमदारांची नाव मात्र वगळली आहेत. ज्यामध्ये आमदार अशोक पवार, सुमनताई पाटील, नवाब मलिक आणि चेतन तुपे यांचा समावेश आहे. यावरुन आता वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.

हे ही वाचा>> Maharashtra Political crisis: सुप्रीम कोर्टानं वापरलेले ‘हे’ दोन शब्द… अन् CM शिंदेंचं भवितव्य

मात्र, राष्ट्रवादीतील दोन गटातील ही लढाई आता चुरशीची होणार अशी चर्चा आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT