NCP Split : राष्ट्रवादी कुणाची? निकालाआधीच अजित पवारांचं मोठं विधान
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आय़ोगाकडे अर्ज केला आहे. त्यामुळे निवडणूक आय़ोग जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल, असे अजित पवार म्हणाले आहेत. त्याचसोबत आमचं सपूर्ण प्रकरण निवडणूक आयोगासमोर आहे.
ADVERTISEMENT
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) बंडखोरीनतर राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसमध्ये फुट पडली होती. मात्र ही फुट दोन्ही गटाचे नेते मान्य करत नव्हते. असे असले तरी दोन्ही गटाच्या नेत्याने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा ठोकत निवडणूक आयोगाकडे वेगवेगळा अर्ज केला होता. या अर्जानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीत फुट पडल्याचे जाहीर केले होते. यासोबत राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हावर येत्या 6 ऑक्टोबरला निर्णय जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. असे असताना आता निवडणूक आयोगाच्या निकालाआधीच अजित पवारांनी मोठं विधान केले आहे. त्यामुळे नेमकं अजित पवार काय म्हणाले आहेत, हे जाणून घेऊयात. (ncp split after election commision result ajit pawar big statement)
ADVERTISEMENT
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली आज कांद्याच्या प्रश्नावर बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मंत्री उपस्थित होते. नाफेडने शेतकऱ्यांचा कांदा घेणे बंद केले होते. या संदर्भात अनेक प्रश्न होते. मी पियुष गोयल यांच्याशी फोनवर चर्चा करून वेळ मागितला आहे. त्यानुसार 5 व्यापारी, मंत्री आणि 5 मार्केट कमिटी मेंबरला चर्चेसाठी 7 वाजताची वेळ देण्यात आली आहे. त्यामुळे ही बैठक झाल्यावर निर्णय कळवू असे अजित पवार यांनी सांगितले आहे.
हे ही वाचा : Garware Club Election: शरद पवारांना धक्का.. ‘या’ निवडणुकीत मोठा पराभव
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत निवडणूक आय़ोगाकडे अर्ज केला आहे. त्यामुळे निवडणूक आय़ोग जो निर्णय देईल, तो आम्हाला मान्य असेल, असे अजित पवार म्हणाले आहेत. त्याचसोबत आमचं सपूर्ण प्रकरण निवडणूक आयोगासमोर आहे. वकीलामार्फत आम्ही आमचं म्हणणं मांडू, असे देखील अजित पवारांनी सांगितले. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसबाबत कार्यकर्त्यांमध्ये जो संभ्रम आहे, तो निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर दूर होईल, असे देखील अजित पवार म्हणाले आहेत.
हे वाचलं का?
निवडणूक आयोग काय म्हणाले?
2 जुलै रोजी अजित पवार बंड करून सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर शरद पवार गटाच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगात कॅव्हेट दाखल केली होती. ज्यामध्ये अशी मागणी करण्यात आली होती की, सुनावणी आधी आमची बाजू ऐकून घ्यावी. या आधारे 8 सप्टेंबरला दोन्ही गटाला आपआपलं म्हणणं मांडण्याचा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाला दिला होता. त्यानंतर दोन्ही बाजूने आपलं म्हणणं लिखित स्वरूपात आयोगासमोर मांडलं गेले होते.
हे ही वाचा : Crime : धक्कादायक! प्रेयसीच्या मैत्रिणीने घेतला तरूणाच्या प्रायव्हेट पार्टचा चावा, कारण…
त्यानंतर आता आज (14 सप्टेंबर) निवडणूक आयोगाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. हा महत्त्वाचा निर्णय म्हणजे निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडल्याचे मान्य केलं आहे. यासोबत निवडणूक आयोगाने हे देखील स्पष्ट केलं आहे की, पक्षाचं नाव आणि चिन्ह याबाबत निश्चित निर्णय 6 ऑक्टोबरला घेतला जाणार आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निकाल देतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT