संभाजीराजेंचं ठरलं! ‘या’ मतदारसंघातून लढविणार निवडणूक, बोलणी फायनल…
संभाजीराजे यांनी लोकसभा निवडणूक आता कोल्हापूरमधूनच लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याबाबत आता काँग्रेसबरोबर बोलणी झाल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे मविआ पुरस्कृत संभाजीराजेच उमेदवार असणार की आणखी काही होणार हे आता येणारा काळच ठरवणार आहे.
ADVERTISEMENT

संभाजीराजे रिंगणात
गेल्या काही दिवसांपासून संभाजीराजे यांच्या उमेदवारीबाबत जोरदार चर्चा सुरु होत्या. ते कोणत्या पक्षातून निवडणूक लढणार याबद्दल अनेकांना उत्सुकता होती. मात्र आता लोकसभा निवडणुकीसाठी ते कोल्हापूरातूनच आणि स्वराज्य पक्षातूनच रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्या उमेदवारीच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
हे ही वाचा >> गर्लफ्रेंडसोबत 2 मुलांच्या बापाची आत्महत्या, पण ट्रेन येताच प्रेयसी फिरली मागे, अन्…
स्वराज्य आणि काँग्रेसची चर्चा
काँग्रेस आणि स्वराज्य पक्ष यांच्यातील युतीची चर्चा जवळपास अंतिम झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आणि संभाजीराजे यांचा स्वराज्य पक्ष रिंगणात उतरणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
भाजपचा निर्णय काय?
संभाजीराजे यांच्या उमेदवारीची साऱ्या राज्यात जोरदार चर्चा सुरु होती. त्यामुळे आता त्या गोष्टीवर पडदा पडल्याने आता कोल्हापूरच्या जागेवर भाजप कोणाचा विचार करणार याकडेही साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
राजकारणाचे भविष्य ‘स्वराज्य’
संभाजीराजे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत आपली भूमिका स्पष्ट करत ‘स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असेल’ असंही त्यांनी स्पष्ट केले आहे.