Sharad Pawar : अजित पवार खोटं बोलताहेत का? पवार म्हणाले, “फक्त एकच तक्रार…”
भाजपसोबत जाण्याबद्दल शरद पवारांनी सातत्याने गाफील ठेवले, असा आरोप अजित पवारांनी केला. तसेच चोरडियांच्या घरी भेटायलाही बोलावलं होतं, असेही अजित पवार म्हणालेले. त्या सगळ्या दाव्यांना शरद पवारांनी उत्तर दिले.
ADVERTISEMENT
Sharad Pawar Ajit Pawar : सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटांत दावे-प्रतिदावे सुरू आहेत. कर्जत येथील मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी अनेक गौप्यस्फोट करत शरद पवारांना घेरले. त्याला शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले. पुण्यात शरद पवारांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार खोटं बोलत आहेत का? असा प्रश्न विचारला. त्यावर पवारांनी सविस्तर भूमिका विशद केली.
ADVERTISEMENT
अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटाबद्दल पवार म्हणाले, “माझ्या दृष्टीने मला पहिल्यांदा कळतंय. त्यात बरेचसे स्फोट होते. मग त्यात स्फोट होता का? बॉम्ब होता का? फटाकडा होता की दुसरं काही होतं? या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल.”
“माझ्याशी सुसंवाद ठेवण्याचा अधिकार”
अजित पवारांनी सांगितलं की, तुम्ही त्यांना वारंवार बोलावलं. त्यावर शरद पवार म्हणाले की, “असं आहे की माझ्याकडून कधीच बोलवणं नव्हतं. पक्षाचा अध्यक्ष होतो. पक्षाच्या कोणत्याही सदस्याला, कोणत्याही प्रश्नाच्या संदर्भात माझ्याशी सुसंवाद ठेवण्याचा अधिकार असतो.”
हे वाचलं का?
हेही वाचा >> ‘ज्यांना मोठं केलं त्यांनीच…’ शरद पवारांचा अजितदादांवर पलटवार
“ज्या काही मागण्या केल्या होत्या, त्यासंबंधी चर्चा झाली नव्हती, असे मी म्हणत नाही. चर्चा झाली. ते ज्या रस्त्याने जाण्याचा विचार करत होते, तो विचार आम्हाला लोकांना किंवा जनमानसात आम्ही जे शब्द दिले, त्यासंदर्भात सुसंगत नव्हता. विधानसभेच्या निवडणुकीत आम्ही जी मते मागितली, ती भाजपमध्ये जाण्यासाठी कधी नव्हती. ती निश्चित एका कार्यक्रमासाठी होती. मी एवढंच म्हणेन भाजप आणि त्यांचे प्रमुख यांच्याविरुद्ध होती. जे आमचे लोक निर्वाचित झाले, त्यांना या भूमिकेला लोकांचा पाठिंबा होता”, असे शरद पवार यांनी सांगितले.
मविआ सरकारमध्ये मंत्री होते, पवारांचा पलटवार
“आजही आमची भूमिका भाजपविरोधी आहे. तितकी शिवसेनेच्या विरोधी नाही. एवढंच नव्हे, जे लोक असं सांगतात की, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी एकत्र बसून सरकार बनवण्याचा कार्यक्रम घेतला. आज जे बोलताहेत, ते त्या सरकारमध्ये मंत्रिपदाची जबाबदारी घेऊन पदावर आरूढ झाले होते”, असे म्हणत शरद पवारांनी अजित पवारांच लक्ष्य केले.
ADVERTISEMENT
हेही वाचा >> खिचडी घोटाळ्यातील ‘ती’ कंपनी शिंदेंच्या नेत्याची! वाचा Inside Story
“राजीनामा दिल्यानंतर तो मागे घेण्यासाठी आंदोलन करायला लावलं, या अजित पवारांच्या दाव्यावरही पवारांनी भूमिका मांडली. ते म्हणाले, “मी राजीनामा देतो, पण याचं कारण काय? पक्षाचा अध्यक्ष मी होतो. सामूहिक निर्णय झालेला होता. सामूहिक निर्णयानंतर वेगळं वागण्याचं कारण नव्हतं. स्वच्छ आमची भूमिका होती की, भाजपसोबत जायला नको”, असे शरद पवार म्हणाले.
ADVERTISEMENT
खरं काय खोटं काय? शरद पवार म्हणाले…
अजित पवार खोटं बोलताहेत का? असा प्रश्न शरद पवारांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले, “असं आहे की, त्यांनी आज राजकीय निर्णय घेतला. तो त्यांचा अधिकार आहे. फक्त तक्रार एकच आहे की, हा निर्णय त्यांनी आत्ता घेण्याऐवजी ज्यावेळी निवडणुकीचा फॉर्म भरला, तो फॉर्म भरताना राष्ट्रवादीच्या नावाने घेतला. त्यांना देण्यात आलेलं तिकीट हे जयंतराव किंवा माझ्या मान्यतेचे होते. लोकांच्या समोर राष्ट्रवादीसाठी मत मागितले असेल, तर त्याच्याशी विसंगत भूमिका ही लोकशाही मध्ये योग्य नाही. एवढंच माझं म्हणणं आहे.”
हेही वाचा >> अजित पवारांशीच पंगा! रोहित पवार म्हणाले, “टीका मी पचवून घेईन, पण…”
जे दावे केले गेले ते खरे की खोटे? या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले, ” साधी गोष्ट आहे. जे दावा करतात, ते कालच्या निवडणुकीला राष्ट्रवादीचे तिकीट घेऊन उभे राहिले होते की नाही? याची चौकशी करा. इथे पुण्याला जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयात निवडणूक आयोगाचा विभाग आहे. तिथे कोण उमेदवार होते, कोणत्या पक्षाचे होते, त्यांचे चिन्ह काय? याची माहिती तुम्हाला मिळेल. त्यातून खरं कुणाचं आणि खोटं कुणाचं हे समोर येईल”, असे उत्तर शरद पवार यांनी दिले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT