PM Modi speech : ‘जेव्हा कुटुंब जुनं घर सोडून….’, मोदींचं भावनिक भाषण
Modi Speech in parliament special session 2023 : संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाला 18 सप्टेंबरपासून सुरूवात झाली. अधिवेशनाच्या सुरूवातीला पंतप्रधान मोदींनी सभागृहाला संबोधित केले.
ADVERTISEMENT
Parliament Special Session 2023 PM Modi Speech live Marathi : संसदेचं विशेष अधिवेशन सुरू झाले. जुन्या संसदेतील हे शेवटचं अधिवेशन असून, यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी भावूक झाले. जुन्या संसदेच्या आठवणींना उजाळा देताना पंतप्रधान मोदींनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. (Prime Minister Narendra Modi’s Speech in Parliament Today)
ADVERTISEMENT
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “75 वर्षांचा संसदीय प्रवास पुन्हा एकदा आठवण्याची… नव्या सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी ते प्रेरणादायी क्षण आणि इतिहासातील महत्त्वाचे क्षण आठवून पुढे जाण्याची ही संधी आहे. या ऐतिहासिक वास्तूला आपण सर्वजण निरोप देत आहोत.”
“स्वातंत्र्यानंतर या इमारतीला संसद म्हणून मान्यता मिळाली. ही इमारत बांधण्याचा निर्णय परकीय राज्यकर्त्यांचा होता. या वास्तूच्या उभारणीत माझ्या देशवासीयांचा घाम आणि श्रम आहेत, असे आपण अभिमानाने सांगू शकतो”, असे नरेंद्र मोदी म्हणाले.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
G20 चे यश संपूर्ण देशाचे आहे – PM मोदी
“चांद्रयान 3 च्या यशाचा देश आणि जगावर नवा प्रभाव पडणार आहे. या सदनातून मी पुन्हा एकदा देशातील शास्त्रज्ञांना अभिनवादन आणि अभिनंदन करतो. आज तुम्ही G20 च्या यशाचे सर्वानुमते कौतुक केले आहे, मी तुमचे आभार मानतो. G20 चे यश हे कोणत्याही पक्षाचे नाही तर संपूर्ण भारताचे आणि 140 कोटी भारतीयांचे यश आहे”, असे मोदी म्हणाले.
“देशातील विविध सरकारांनी G20 बैठकांचे आयोजन भव्य पद्धतीने केले. याचा संपूर्ण देशावर परिणाम झाला. भारताला अभिमान वाटेल की ज्या वेळी भारत G20 चा अध्यक्ष झाला, आफ्रिकन युनियन G20 चा सदस्य झाला. हे ऐतिहासिक आहे”, असे मोदी यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
Narendra Modi Net Worth : मोदींकडे किती आहे संपत्ती? कुठे केलीये गुंतवणूक?
“या सभागृहाचा निरोप घेणे, हा खूप भावनिक क्षण आहे. कुटुंबही जेव्हा जुनं घर सोडून नव्या घरी जातं, तेव्हा खूप साऱ्या आठवणी काही क्षणांसाठी त्याला भावनिक करतात. आपण हे सभागृह सोडून जात आहोत, तेव्हा आपलं मन आणि मेंदूही त्या भावनांनी ओतप्रोत भरलेलं आहे. आंबट गोड आठवणी आहेत. वादविवाद झाले. कधी वादाचं वातावरण राहिलं, तर कधी उत्साह आणि आनंदाचं वातावरण राहीलं. या आपल्या सगळ्यांच्या आठवणी आहेत. त्यामुळे त्याचा गौरवही आपल्या सगळ्यांचा आहे”, असं मोदी म्हणाले.
ADVERTISEMENT
पंतप्रधान मोदी म्हणाले, “हे सभागृह सर्वसमावेशक”
मोदी म्हणाले, “जसजसा काळ बदलला, तसतशी आपल्या सभागृहाची रचनाही बदलत गेली. संसद अधिक समावेशक होत गेली. समाजातील प्रत्येक घटकाचे प्रतिनिधी या सभागृहात दिसतात. सभागृहात सर्व काही आहे. येथे समाजातील सर्व स्तरातील लोक आहेत. एक प्रकारे येथील पूर्णपणे सर्वसमावेशक वातावरण लोकांच्या आशा-आकांक्षांना प्रेरणा देणारे आहे.”
Ajit Pawar: ‘मी 10 वीला नापास झालेलो..’, अर्थमंत्री अजितदादांचं नेमंक शिक्षण किती?
“सुरुवातीला महिलांची संख्या कमी होती, पण हळूहळू माता-भगिनींनीही या सभागृहाची प्रतिष्ठा वाढवली आहे. या संपूर्ण कालावधीत साडेसात हजारांहून अधिक प्रतिनिधींनी दोन्ही सभागृहांत योगदान दिलं आहे. या काळात सुमारे 600 महिला खासदारांनीही योगदान दिले आहे. हे तेच सभागृह आहे ज्यात 93 वर्षांचे शफीकुर रहमान जी देखील योगदान देत आहेत”, असं नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.
ADVERTISEMENT