Ajit Pawar: ''विधानसभा महायुतीत लढू, पण...'', अजित पवारांचा कार्यकर्त्यांना ‘मेसेज’

मुंबई तक

Ajit Pawar शरद पवार हे माझं दैवत आहेत. मी त्यांचा अपमान कधीच करू शकत नाही. त्यांचा अपमान केला म्हणून काहीजण नेरिटीव्ह सेट करत आहेत, असं म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांनी केलेल वक्तव्य खोडून काढले आहे.

ADVERTISEMENT

पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते.
ajit pawar big statement on assembly election 2024 and mahanagar palika election pimpari chinchwad rally
social share
google news

बातम्या हायलाइट

point

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढायच्या आहेत

point

शरद पवार हे माझं दैवत आहेत.

point

मी त्यांचा अपमान कधीच करू शकत नाही.

Ajit Pawar Big Statement : लोकसभा निवडणूका आपण एकत्र लढलो आता विधानसभा निवडणूकाही एकत्रच लढणार आहोत. मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढायच्या आहेत, अशी घोषणा राष्ट्रवादीचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केली. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीचं काय होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. (ajit pawar big statement on assembly election 2024 and mahanagar palika election pimpari chinchwad rally) 

पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. विधानसभा निवडणुका ऑक्टोबर शेवटापर्यंत किंवा नोव्हेंबर पहिला आठवड्यात होतील, असे अजित पवारांनी म्हटले. मात्र, त्यासोबतच, लोकसभा- विधानसभा आपण एकत्र लढत असलो, तरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आपण स्वबळावर लढायच्या आहेत, अशी घोषणाच कार्यकर्त्यांसमोर अजित पवारांनी केली. त्यामुळे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती एकत्र नसणार असल्याचे स्पष्ट झालं आहे. 

हे ही वाचा : Amit Shah : ''बाळासाहेबांचा वारसा सांगणारे ठाकरे औरंगजेबाचे...'', पुण्यातून शाहा कडाडले!

शरद पवार हे माझं दैवत आहेत. मी त्यांचा अपमान कधीच करू शकत नाही. त्यांचा अपमान केला म्हणून काहीजण नेरिटीव्ह सेट करत आहेत, असं म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांनी केलेल वक्तव्य खोडून काढले आहे. 

 पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक काल पुण्यात पार पडली. निधी वाटपावरून सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांवर टीका केली होती. 2004 पासून मी पालकमंत्री म्हणून काम केलं, आरोप प्रत्यारोपला मी उत्तर देत नाही. मावळात पैसे गेले मावळात पैसे गेले अस बोललं जात होतं,आधी बारामती शिरूरला निधी दिला त्यावर कोणी बोलत नाहीत. सगळ्या आमदार खासदारांना मी बोलू दिलं,कारण नसताना नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला जातो, असे म्हणत अजित पवारांनी खासदार सुप्रिया सुळेंवर  पलटवार केला.

तसेच, मीडिया पुढे काही तरी वेगळं मांडण्यात आल,वडीलधाऱ्यांना बोलू दिलं जातं नाही अस सागितले. पण तसे काही नाही, सुस्कृत महाराष्ट्राची शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी आपल्याला दिली आहे, असेही अजित पवार म्हणाले. 

हे ही वाचा : Amit Shah : ''शरद पवार भ्रष्टाचाराचे सर्वांत मोठे सुत्रधार'', अमित शाहांची बोचरी टीका

हे वाचलं का?

    follow whatsapp