Ajit Pawar Exclusive: '...त्यावेळी चूक झाली तर पवार साहेब सावरून घ्यायचे', अजितदादांची बेधडक मुलाखत

साहिल जोशी

ADVERTISEMENT

अजितदादांची बेधडक मुलाखत
अजितदादांची बेधडक मुलाखत
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवार यांची मुंबई Tak सोबत खास बातचीत

point

अजित पवारांची संपूर्ण मुलाखत

point

अजित पवारांनी जनसन्मान यात्रा नेमकी का केली सुरू?

Ajit Pawar Jan Sanman Yatra: नाशिक: विधानसभा निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी थेट जनतेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांच्या पक्षाच्या वतीने जनसन्मान यात्रेचं नियोजन हे करण्यात आलं आहे. ज्याची सुरुवात ही नाशिक जिल्ह्यातून करण्यात आली आहे. याच यात्रेच्या सुरुवातीला अजित पवार यांनी मुंबई Tak ला एक विशेष मुलाखत दिली. ज्यामध्ये त्यांनी अनेक विषयांवर त्यांची रोखठोक मतं व्यक्त केली. (ajit pawar exclusive if there was a mistake at that time sharad pawar saheb would take care of me ajitdada fearless interview)

सुरुवातीलाच अजित पवार यांनी हे देखील मान्य केलं की, आतापर्यंत त्यांच्याकडे पक्षाची जबाबदारी नव्हती. त्यामुळे काही चूक झाली की पवार साहेब त्यांना सावरून घेत होते. पण आता मात्र, जबाबदारी असल्याने तोलून-मापून बोलावं लागतं. याशिवाय इतरही अनेक प्रश्नांची अजितदादांनी दिलखुलास उत्तरं दिलं आहेत. 

अजित पवारांची संपूर्ण मुलाखत जशीच्या तशी...

1. प्रश्न: अजितदादा सध्या तुम्ही खूप हसत आहात, महिलांशी चर्चा करत आहात.. एक नवीन रुप पाहायला मिळतंय, हा मेकओव्हर नेमका काय?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

अजित पवार: साहिलजी, चर्चा होणार.. कोणत्याही गोष्टीची चर्चा होणार. मी अत्यंत नम्रतापूर्वक सांगतो. इतके दिवस मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारण्याआधी आदरणीय नेते पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत होतो. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या नेत्याच्या किंवा वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात तेव्हा त्यावेळेस तुमच्यावर जबाबदारी नसते.

हे ही वाचा>> Supriya Sule : "अजित पवार अमित शाहांना चोरून भेटायला का येत होते?", सुप्रिया सुळेंनी पकडले कात्रीत

ज्यावेळेस तुमच्यावर जबाबदारी येते त्यावेळेस प्रत्येक गोष्टीकडे आजूबाजूच्या लोकांचं बारकाईने लक्ष असतं. त्याकाळात माझ्याकडून एखादी चूक झाली तरी साहेब त्यावेळेस सावरून घ्यायचे त्यातून त्यांना जी काही प्रतिक्रिया द्यायची असेल ती ते द्यायचे आणि त्यातून मार्ग निघायचा. 

ADVERTISEMENT

पण आता मलाच माझं प्रत्येक गोष्ट तोलून-मापून बोलण्याची जबाबदार आहे. त्याचं भान ठेवून काम केलं पाहिजे असं माझं मत आहे. 

ADVERTISEMENT

प्रत्येक माणूस ठेच लागल्यानंतर पुन्हा ठेच लागू नये म्हणून काळजी घेतो. तसं कुठल्याही निवडणुकीत यश-अपयश असतं. यावेळेस आम्हाला महायुतीला काहीच मतं कमी पडली. आम्हाला जनतेसाठी काम करायचं आहे.

2. प्रश्न: लोकसभेत हरल्यानंतर योजना का आणल्या गेल्या? याच योजनेने शिवराजसिंह चौहान यांनी मध्यप्रदेशमध्ये विजय मिळवला होता.

अजित पवार: याच्याआधी देखील वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणल्या आहेत. ज्या वेळेस आम्हाला ती योजना चांगली वाटली, महिलांचं सबलीकरण झालं पाहिजे. हे आम्हाला वाटलं. बांग्लादेशामध्ये काय घडलं हे आपण पाहिलं. यामुळे कधी कुठली गोष्ट अशी घडते की, काय चित्र बदलेल हे सांगता येत नाही. 

3. प्रश्न: राष्ट्रीय स्वयंसेवकाच्या मुखपत्रांमधून तुमच्यावर लोकसभेतील पराभवाचं खापर फोडलं गेलं. तुम्हाला सोबत घेतलं नसतं तर एवढं नुकसान झालं नसतं. 

अजित पवार: ज्यावेळेस लोकशाहीत काम करतात तेव्हा प्रत्येकाला आपली मतं व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्या लोकांना जसं वाटलं.. त्यामुळे त्यांनी तसं म्हटलं आहे. मी चर्चा केली आहे ती भाजपच्या प्रमुखांशी. आम्ही बोलणार ते भाजपशीच बोलणार. त्यामुळे मी इतरांचा विचार का करायचा?

हे ही वाचा>> Maharashtra Vidhan Sabha : अजित पवारांच्या आमदाराचा राजकीय संन्यास, वारसदारही ठरला!

यावेळेस मी ठरवलं आहे की, मला कोणावरही टीका-टिप्पणी करायची नाही. कोणी माझ्यावर टीका केली तरी त्याला महत्त्व देणार नाही. 

4. प्रश्न: आता ज्या योजना आणल्या आहेत त्या खरंच शाश्वत आहेत का? कारण त्यासाठी प्रचंड पैसा लागणार आहे. 

अजित पवार: पूर्वी वन नेशन वन टॅक्स जीएसटी नव्हता. पण आता ते आहे. पूर्वी व्हॅटमध्ये एवढं कलेक्शन नव्हतं. पण आता जीएसटीमुळे मोठ्या प्रमाणात टॅक्स गोळा होतो. यामुळे राज्याला देखील मोठी रक्कम मिळते. बाकीच्या गोष्टींचा विचार केल्यास महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या सक्षम राज्य आहे. 

यासंदर्भात विचार करूनच या योजना आणण्यात आल्या आहेत. आणि त्या योजना पुढेही सुरू राहतील. हा शब्द माझा अजितदादाचा वादा म्हणून लोकांना आहे. 

5. प्रश्न: ही यात्रा तुम्हाला मुख्यमंत्रीपदाकडे घेऊन जाईल असं वाटतं का? काल तुमच्या मनातील थोडी मळमळ निघाली

अजित पवार: अरे नाही रे.. कसं आहे ना.. एखादी गोष्ट गंमतीने बोललो तरी त्याला तुम्ही वेगळं स्वरूप देता. काल तो एक वेगळा कार्यक्रम होता. त्यात गंमतीने म्हणालो की, मी सगळ्यात पहिल्यांदा आमदार झालो.. प्रत्येक वेळेस गांभीर्यानेच भाषणं करायची नसतात. थोडंसं हसून वातावरण जरा.. 

6. प्रश्न: मुख्यमंत्री व्हायची इच्छा तर तुम्हाला आहेच ना... 

अजित पवार: मागे किती वेळा हे बोलून दाखवलं आहे. पण जोपर्यंत माझ्याकडे 145 ची फिगर होऊ शकत नाही.. तोपर्यंत कोणीही.. उद्या तुम्हालाही मुख्यमंत्री व्हायचं असेल तर तुम्हाला पण 145 चा आकडा गाठावा लागेल तरच मुख्यमंत्री होऊ शकता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT