602 मध्ये ऑफिस नको रे बाबा!; अजित पवारच अंधश्रेद्धेचे ‘बळी’, प्रकरण काय?
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोरील ही खोली अजित पवारांना मिळणार होती, मात्र त्यांनी नकार दिल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे.
ADVERTISEMENT
Ajit Pawar Latest News : ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण’, हा तुकोबारायांचा अभंग राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवारांना अगदी हुबेहुब लागू होतोय. ‘महाराष्ट्र हे प्रगतशील विचारांचं, पुरोगामी राज्य आहे. देशाला, जगाला आदर्श ठरतील अशा कितीतरी सामाजिक सुधारणांची सुरुवात महाराष्ट्रात झाली आहे’, असं सांगणारे अजित पवार विचाराला साजेशी कृती करायला कचरतात, हेच समोर आलंय. मंत्रालयातील 602 क्रमांकाचे कार्यालया मिळताच अजित पवारांनी ते कार्यालय नाकारलं, याचं कारण म्हणजे अंधश्रद्धा. 602 क्रमांकाचे कार्यालय का नाकारलं? हा प्रकार नेमका काय आणि 602 चा इतिहास काय? हेच समजून घेऊयात…
ADVERTISEMENT
अंधश्रद्धा आणि राजकारणी यांच्या कथा तुम्हीही कधीतरी ऐकल्या असतील. कधी मंत्र्यांना मिळणाऱ्या बंगल्याच्या, तर कधी कार्यालयाच्या… अजित पवार यांच्याशी संबंधित असाच एक नवीन किस्सा समोर आला आहे. उपमुख्यमंत्री झालेले अजित पवारांनी मुंबईतील मंत्रालयाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोर असलेलं कार्यालय घेण्यास नकार दिल्याचं वृत्त आहे. या गोष्टीची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
वाचा >> Politics: भारतातील राजकीय नेत्यांच्या ‘रिटायरमेंट’चा इतिहास नेमका आहे तरी काय?
तुम्हालाही वाचायला हे वेगळं वाटत असेल, पण अजित पवार यांना सहाव्या मजल्यावरील 602 क्रमांकाच्या खोलीत कार्यालय बनवायचे नाही, असे सूत्रांचे म्हणणे आहे. वृत्तानुसार, त्यांनी सहाव्या मजल्यावरील दुसर्या एका खास खोलीत आपले कार्यालय बनवण्याचा निर्णय घेतला आहे.
हे वाचलं का?
सहावा मजला, खोली क्रमांक 602
602 क्रमांकाची खोली अगदी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोरच आहे. ही खोली 3000 स्क्वेअर फूट इतकी आहे आणि आणि केबिनही खूप मोठी आहे. यात एक मोठी कॉन्फरन्स रूमही आहे आणि ऑफिस केबिनसाठीही पुरेशी जागा आहे. याशिवाय मुख्यमंत्र्यांचे कार्यालय मंत्रालयाच्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आहे, त्यामुळे हा मजला सत्ता केंद्र मानला जातो.
वाचा >> अजित पवार एन्ट्री, शिंदे, फडणवीसांसह BJP च्या मंत्र्यांना बसणार मोठा फटका!
मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयासमोरील ही खोली अजित पवारांना मिळणार होती, मात्र त्यांनी नकार दिल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. ही खोलीबद्दल काही अंधश्रद्धा राजकीय वर्तुळात पसरलेल्या आहेत आणि त्यामुळेच अजित पवारांनी या खोलीत कार्यालय थाटण्यास नकार दिल्याचं सांगण्यात आले.
ADVERTISEMENT
छोट्या खोलीत थाटणार कार्यालय
अजित पवारांना कार्यालयाचे वाटप करण्यात आले असून, त्यांना आता 602 क्रमांकाच्या खोलीऐवजी आता मुख्य सचिवांसाठी असलेल्या त्याच मजल्यावरच्या 502 क्रमांकाच्या छोट्या केबिनमध्ये जाणार आहे. या मजल्यावर मुख्य सचिव आणि अतिरिक्त मुख्य सचिवांचीही केबिन आहे.
ADVERTISEMENT
खोली क्रमांक 602 मागची कथा काय?
अजित पवारांनी या खोलीत कार्यालय करण्यास नकार दिल्याने 602 ची नेमकी कथा आणि इतिहास काय? अजित पवार तिथे बसण्यास का घाबरले, याची एक कथा आहे. 2014 मध्ये भाजप नेते एकनाथ खडसे यांनी कृषी, महसूल आणि अल्पसंख्याक व्यवहार खात्याचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचं कार्यालय या 602 च्या कक्षात होते.
पक्ष आणि मंत्रिमंडळातील ज्येष्ठतेच्या आधारावर त्यांना हे विशेष केबिन देण्यात आले होते. मात्र दोनच वर्षांनंतर भाजपच्या या ज्येष्ठ नेत्याला जमीन घोटाळ्यातील कथित सहभागामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
वाचा >> Sharad Pawar: दिलीप वळसे पाटलांच्या विरोधात पवारांचा ‘हा’ शिलेदार उभं करणार आव्हान?
भाजप नेते पांडुरंग फुंडकर कृषीमंत्री असताना त्यांना ही खोली देण्यात आली होती. मे 2018 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्याच वर्षी अनिल बोंडे यांच्याकडे कृषी मंत्रालयाचा कार्यभार आला आणि त्यांनाही त्याच खोलीचे वाटप करण्यात आले. मात्र पुढे विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
अजित पवार काय म्हणाले?
602 क्रमांकाची खोली सोडून दुसरी छोटी खोली घेण्याबाबत प्रश्न विचारला असता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, नवीन खोली मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाजवळ आहे. तेथे राहणे चांगले जेणेकरून संवाद सुरळीत चालेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT