Ajit Pawar: नॉट रिचेबल असलेले अजितदादा नेमके होते तरी कुठे?; म्हणाले, पित्त…

मुंबई तक

ADVERTISEMENT

NCP Leader Ajit Pawar Speaks on NCP and Chief minister post clam in 2024
NCP Leader Ajit Pawar Speaks on NCP and Chief minister post clam in 2024
social share
google news

Ajit Pawar in Pune: पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) हे काल (7 एप्रिल) अचानक नॉट रिचेबल असल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यामुळे अनेक राजकीय नेत्यांचे धाबे दणाणले होते. कारण आजवर जेव्हा-जेव्हा अजित पवार हे नॉट रिचेबल झाले आहेत तेव्हा-तेव्हा राज्याच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. असं असल्याने अजित पवार हे काल अचानक आपले पुण्यातील कार्यक्रम रद्द करून नॉट रिचेबल झाले होते. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, आज सकाळी पुण्यात एका सोने दुकानाच्या उद्घाटनासाठी अजित पवार हे सपत्नीक आले आणि सगळ्या चर्चांवर पडदा पडला. मात्र, यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी आपण नेमके कुठे होतो आणि काय करत होतो याबाबत माहिती दिली आहे. (as health was not good resting by taking medicines on doctors advice ncp leader ajit pawar who is not reachable gave an explanation)

ADVERTISEMENT

एकीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिलेली मुलाखतीत उद्योजक गौतम अदाणी (Gautam Adani) यांच्याबाबत केलेलं भाष्य यामुळे राज्याच्या राजकारण वेगळ्या दिशेने सुरू झालेलं असताना अचानक अजित पवार हे नॉट रिचेबल झाल्याच्या चर्चांना धरलेला जोर यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती.

अधिक वाचा- शरद पवारांची ‘ती’ मुलाखत, अजित पवार खरंच नॉट रिचेबल?; पुन्हा राजकीय भूकंपाची चर्चा

2019 विधानसभा निवडणुकीपासून राज्यातील राजकारण हे अत्यंत नाजूक झालं आहे. नेत्यांची प्रत्येक राजकीय हालचाल ही त्यामुळेच महत्त्वाची ठरत आहे. त्यातही अजित पवार यांच्या राजकीय निर्णायकडे प्रत्येकाचं लक्ष लागून असतं. अशातच काही तासांसाठी त्यांनी नॉट रिचेबल होणं यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र, आज सकाळी मीडियासमोर येऊन त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पाहा अजित पवार नेमकं काय म्हणाले:

‘गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महाराष्ट्रभर दौरे झाले, धावपळीत विश्रांती व्यवस्थित मिळाली नाही. दौऱ्याची दगदग, झोप व्यवस्थित न मिळाल्याने पित्ताचा त्रास वाढून प्रकृती बिघडली. त्यामुळे दौरा सोडून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेऊन पुण्यातल्या जिजाई निवासस्थानी विश्रांती घेत होतो.’ अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

अधिक वाचा- अदाणींची पाठराखण करताच गदारोळ, शरद पवारांनी बोलावली तातडीची पत्रकार परिषद; म्हणाले…

यावेळी माध्यमांनी ‘नॉट रिचेबल’च्या चुकीच्या बातम्या दाखवल्या असं म्हणत अजित पवार यांनी नाराजी देखील व्यक्त केली. यापुढे माध्यमांनी खात्रीकरुनच बातम्या दाखवाव्या असंही अजित पवार यावेळी म्हणाले.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

अजित पवार म्हणाले, ‘काल शुक्रवारी पुण्यात होतो, दुपारपर्यंत नियोजित वेळापत्रकानुसार माझा कार्यक्रम सुरु होता. मात्र गेल्या काही दिवस मी महाराष्ट्रभर दौऱ्यावर होतो. या दौऱ्याच्या काळात प्रचंड दगदग झाली, विश्रांती मिळाली नाही, झोपही पूर्ण होत नव्हती. त्याचा प्रतिकूल परिणाम माझ्या प्रकृतीवर झाला, पित्त वाढले. त्यामुळे काल दुपारी अचानक अस्वस्थ वाटायला लागले. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेत औषधे घेऊन पुण्यातल्या ‘जिजाई’ या निवास्थानी विश्रांती घेतली.’

अधिक वाचा- शरद पवारांचा थेट राहुल गांधींवर हल्ला, अदाणींवरील आरोपांवरून पिळले कान

‘मात्र या काळात मी ‘नॉट रिचेबल’ असल्याच्या चुकीच्या बातम्या माध्यमांनी चालविल्या. कोणतीही खातरजमा न करता अशा बातम्या चालवल्या गेल्या. माध्यमात माझ्याविषयी आलेल्या बातम्या बघून मी व्यथित झालो. आम्ही पब्लिक फिगर असल्याने आमच्या विषयी बातम्या करण्याचा माध्यमांना अधिकार आहे. मात्र, कोणतीही खातरजमा न करता चुकीच्या बातम्या चालविणे योग्य नाही.’ अशा शब्दात अजित पवार यांनी आपली नाराजी व्यक्त केली. पुणे येथे एका नियोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT