Baba Siddique Murder : सिद्दीकी हत्याकांडात मोठी अपडेट! शूटरच्या टार्गेटवर होते आमदार झिशानही...

मुंबई तक

ADVERTISEMENT

baba siddiqui murder update shooters had to supari zeeshan siddiqui mumbai police sources lawrence bishnoi gang
सिद्दीकी हत्याकांडात मोठी अपडेट
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सिद्दीकी हत्याकांडात मोठी अपडेट

point

आरोपींच्या चौकशीत धक्कादायक खुलासा

point

झिशान सिद्दीकीच्या हत्येचा देखील कट होता.

Baba Siddique Murder Update : राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्याकांड प्रकरणात नवनवीन धागेदोरे समोर येते आहे. त्यात या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपींची ओळख पटलीय. यातील तिघांना अटक झाली आहे, तर अद्याप तिघे हे फरार आहे. या दरम्यान अटकेत असलेल्या आरोपींच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे समोर आहेत. असाच एक खुलासा आता समोर आला आहे. बाबा सिद्दीकी यांच्यासोबत त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या हत्येचा देखील कट रचण्यात आला होता. मात्र या हल्ल्यातून नेमके ते कसे बचावले हे जाणून घेऊयात. (baba siddiqui murder update shooters had to supari zeeshan siddiqui mumbai police sources lawrence bishnoi gang) 

खरं तर घटनेच्या काही दिवसांपूर्वीच झिशान सिद्दीकीला हत्येची धमकी देण्यात आली होती. या धमकीच्या काही दिवसानंतरच बाबा सिद्दीकीच्या हत्येची घटना घडली होती. या घटनेत अटकेत असलेल्या आरोपींनी चौकशीत सांगितले की, झिशान आणि बाबा सिद्दीकी हे दोघेही टार्गेटवर होते, आणि जो मिळेल त्याची गोळ्या झाडून हत्या करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामुळे हल्लेखोरांना बाबा सिद्दीकी यांच्यासोबत झिशान सिद्दीकीच्या हत्येची सुपारी देण्यात आली होती. 

हे ही वाचा : Baba Siddiqui : मिरचीचा स्प्रे मारून..., सिद्दीकींच्या हत्येचा 'हा' होता खरा प्लान?

झिशान कसा वाचला? 

मीडिया रिपोर्टनुसार,  एका फोन कॉलमुळे झिशान सिद्दीकीचा जीव वाचवला आहे. खरं तर झालं असं की ज्यावेळेस बाबा सिद्दीकी आणि झिशान सिद्दीकी हे त्यांच्या ऑफिसमधून बाहेर पडत होते. त्याचवेळेस नेमका झिशानला एक फोन कॉल आला आणि तो पुन्हा ऑफिसात गेला होता. त्यामुळे बाबा सिद्दीकी ऑफिसबाहेर होते. हीच संधी साधत तीन शार्प शुटर्सनी सिद्दीकींवर 6 गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर झिशान ज्यावेळेस पुन्हा ऑफिसबाहेर आले तिथपर्यंत बाबा सिद्दीकींवर हल्ल्याची घटना घडून गेली होती. त्यामुळेच एका फोन कॉलने झिशानचा जीव वाचला होता. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान या घटनेनंतर रविवारी सकाळी बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारल्याची सुत्रांची माहिती आहे. कारण पुण्यातील एका शुबू लोणकर नावाच्या तरूणाने फेसबूकवर पोस्ट टाकून बिश्नोई गँगने हा हल्ला केल्याचा दावा केला होता. या दाव्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीला अटक करायला सूरूवात केली आहे.

हे ही वाचा : Baba Siddique : सिद्दीकींच्या मारेकरांना हत्यार, वाहन कुणी पुरवली? कोर्टाच्या सुनावणीत काय झाला उलगडा?

तिघांना अटक आणि तीन मोकाट

आतापर्यंत या प्रकरणात पोलिसांनी घटनास्थळावरून धर्मराज कश्यप, गुरुमेल सिंह यांना अटक केली होती. या दोघांसोबतचा शिवा गौतम हा फरार झाला होता. या तिघांना डायरेक्शन देणारा मोहम्मद झिशान अख्तर याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणात पोलिसांनी शुबू लोणकरचा भाऊ प्रविण लोणकरलाही अटक केली आहे. शुबू लोणकर अद्याप पोलिसांच्या हाती आला नाही. त्यामुळे तीन आरोपी पोलिसांच्या हाती लागले आहेत तर तिघे फरार आहेत. या प्रकरणाचा तपास सूरू आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT