Maharashtra Vidhan Sabha : बच्चू कडू महाविकास आघाडीच्या वाटेवर? पवारांची घेतली भेट

मुंबई तक

ADVERTISEMENT

बच्चू कडू महाविकास आघाडीमध्ये सामील होण्याची शक्यता आहे.
बच्चू कडू आणि शरद पवार
social share
google news

बातम्या हायलाइट

point

बच्चू कडू यांनी शरद पवारांची भेट घेतली

point

महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याचे संकेत

point

विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय होण्याची चर्चा

Bacchu Kadu Sharad Pawar : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडीपासून दूर गेलेले बच्चू कडू पुन्हा परतीच्या वाटेवर दिसत आहेत. बच्चू कडू यांनी शनिवारी (१० ऑगस्ट) सकाळी शरद पवार यांची निवासस्थानी भेट घेतली. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले, शेतमजूर, दिव्यांगांसाठी आम्ही काहीही करू शकतो, असे म्हणत त्यांनी मविआमध्ये सामील होण्याचे संकेत दिले. (Bacchu Kadu may be join maha vikas Aghadi)

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू कामाला लागल्याचे दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी (९ ऑगस्ट) मोर्चा काढल्यानंतर बच्चू कडू यांनी शनिवारी (10 ऑगस्ट) पुण्यात शरद पवारांची मोदीबाग येथे भेट घेतली. 

चांगल्या लोकांनी एकत्र यायला हवं -सुप्रिया सुळे

शरद पवार-बच्चू कडू यांच्या चर्चा झाली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्यासोबत बच्चू कडूंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुप्रिया सुळेंनी केलेल्या विधानाने लक्ष वेधून घेतले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> अजितदादांचा पॅटर्नच वेगळा, आता गुलाबी जॅकेट नाही तर थेट... 

खासदार सुळे म्हणाल्या की, "महाराष्ट्रात जे काही प्रशासन व्हावं, ते उत्तमच असावं. यासाठी सगळ्या चांगल्या लोकांनी, ज्यांना खरंच महाराष्ट्राचे हित जपायचे आहे. अशा लोकांनी एकत्र येणे-हे राज्यासाठी आणि देशासाठी चांगले आहे."

शरद पवारांच्या भेटीनंतर बच्चू कडू काय म्हणाले?

बच्चू कडू म्हणाले, "ही लढाई मुद्द्यांची आहे. राज्यात काही महत्त्वाचे मुद्दे आहेत. त्या मुद्द्यांवर चर्चा होणे फार महत्त्वाचे आहे. ती चर्चा राजकीय वर्तुळात झाली पाहिजे. शेतकरी, मजूर, कामगार यांची चर्चा झाली पाहिजे."

ADVERTISEMENT

याच मु्द्द्यावर एकनाथ शिंदेंबरोबर गेला होतात, या प्रश्नावर बोलताना बच्चू कडू म्हणाले, "तेव्हा दिव्यांग मंत्रालय मिळालं. आता त्या दिव्यांग मंत्रालयाला बजेट आणि चांगल्या योजना निर्माण झाल्या पाहिजे. हा एक प्रयत्न आमचा आहे."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> ''कपडे काढले तरी...'', जरांगेंवर पलटवार करताना राणे काय बोलले? 

उद्धव ठाकरेंची भेट घेणार का? या प्रश्नाला उत्तर देताना बच्चू कडू म्हणाले की, "काय हरकत आहे. ज्या पीडित लोकांचे प्रतिनिधी म्हणून माझं म्हणणं असं आहे की, कष्टकऱ्यांसाठी योजना असली पाहिजे की, नाही? महायुतीच्या कारभारावर समाधानी, असमाधानी असण्याचा नाहीये."

लोकसभा निवडणुकीपूर्वी झाली होती भेट

लोकसभा निवडणुकीपूर्वी म्हणजे डिसेंबर २०२३ मध्ये शरद पवार बच्चू कडू हे अमरावती दौऱ्यावर होते. त्या दौऱ्यात शरद पवारांना बच्चू कडूंनी चहापाणासाठी घरी बोलावले होते. त्यावेळी दोन्ही नेत्यांची चर्चाही झाली होती. 

bachchu kadu meets Sharad pawar in pune.
डिसेंबर २०२३ मध्ये शरद पवार चहापाणासाठी बच्चू कडू यांच्या घरी गेले होते.

त्यानंतर बच्चू कडू महायुतीपासून दूर जाताना दिसले. अमरावती लोकसभा मतदारसंघातून बच्चू कडू यांनी प्रहार संघटनेकडून उमेदवारही दिला होता. बच्चू कडूंनी महायुतीसोबत नसल्याचेही यापूर्वीच जाहीर केलेले असून, ते सध्या महाविकास आघाडी येण्याच्या प्रयत्नात आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT