Beed: थेट धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, मोर्च्यात नेत्यांचा प्रचंड संताप

मुंबई तक

Dhananjay Munde Resignation Demand: सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी बीडमध्ये 28 डिसेंबरला सर्वपक्षीय मूक मोर्च्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्यामध्ये अनेक नेत्यांनी मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली.

ADVERTISEMENT

थेट धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी
थेट धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी
social share
google news

बातम्या हायलाइट

point

सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणी बीडमध्ये मूक मोर्चा

point

सर्वपक्षीय नेत्यांकडून मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

point

वाल्मिक कराडच्या अटकेची जोरदार मागणी

Santosh Deshmukh Murder Case: बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यातील वातावरण बरंच तापलं आहे. त्यामुळे या प्रकरणी मुख्य आरोपी आणि मास्टरमाईंडला अटक करावी या मागणीसाठी बीडमध्ये आज (28 डिसेंबर) सर्वपक्षीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलं. मूक मोर्चाला सकाळी 11 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून अभिवादन करून सुरुवात होणार झाली. (beed live direct demand for dhananjay munde resignation huge anger among leaders in the silent march sarpanch santosh deshmukh murder case )

या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नेते सहभागी झाले. ज्यामध्ये सत्ताधारी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी यावेळी थेट मुंडे भाऊ-बहिणीवर तुफान टीका केली आहे. याचवेळी अनेक नेत्यांनी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची थेट मागणी केली आहे.

हे ही वाचा>> 'आमचा परळी पॅटर्न, इथे रश्मिका आणि प्राजक्ता माळीही येतात...', सुरेश धसांचं बोचरं विधान

हा मोर्चा नगर रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर येणार आहे आणि याच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये या घटनेच्या अनुषंगाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. 

बीडमधील मोर्च्यात अनेक नेत्यांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी

यावेळी अनेक नेत्यांनी आपलं भाषणं केलं. पण विशेष म्हणजे सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलीनेही ही या ठिकाणी भाषण केलं.

या मोर्चामध्ये भाजपाचे आमदार सुरेश धस, नमिता मुंदडा तर शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर, अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके, विजयसिंह पंडित राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड, मराठा आरक्षणासाठी आग्रही असलेले मनोज जरांगे आणि संभाजीराजे छत्रपती हे देखील इथे उपस्थित होते.

संभाजीराजे छत्रपती संतापले

याचबाबत संभाजीराजे म्हणाले की, 'संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली. महाराष्ट्रमध्ये भीषण परिस्थिती झाली आहे, मला बोलायला लाज वाटते.. 19 दिवस झाले अजून अटक नाही.. वाल्मिक कराड बेपत्ता आहे.'

हे ही वाचा>> Sandeep Kshirsagar : " वाल्मिक कराडच मास्टरमाईंड...", NCP पवार गटाच्या आमदाराने उडवली खळबळ

अजितदादा परखड बोलतात.. पण त्यांना संरक्षण देताय ते तुम्हाला पटतंय का? महाराष्ट्रामध्ये काय चालले आहे? मुख्यमंत्र्यांना विनंती आहे कौशल्य दाखवा, खऱ्या आरोपीला अटक करून दाखवा. कराड याला संरक्षण देणारे तिथले मंत्री यांची हकालपट्टी का झाली नाही? त्यांचा राजीनामा का घेतला नाही हा आमचा सवाल आहे. या मोर्चाला जातीय वळण नाही, हा सर्वधर्मीय मोर्चा आहे.

स्वतः पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. वाल्मिकशिवाय धनंजय मुंडे यांचे पान हलत नाही बीडमध्ये जे चाललं आहे ते तुम्हाला पटते का?

बीडची गुन्हेगारी पाहून मी चकित झालो, स्वतः मुंडे यांचा हातात बंदूक घेऊन फोटो आहे. हे काय दहशत माजवण्याचा प्रकार आहे का. त्यांना मंत्रिपद देऊ नका असे माझे म्हणणे होते त्यांचा राजीनामा घ्यायलाच हवा.

'धनंजय मुंडे ला वाल्मिक कराड कुठं आहे हे माहिती नसणे हे पटणारे नाही. त्यामुळे बीड पॅटर्न कुठं होऊ नये याची दक्षता मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी घ्यावी. कंपनीत भागीदारी आहे, त्यांचे सातबारा पुढे आले आहेत.' असं म्हणत संभाजीराजेंनी सरकारवर जोरदार हल्ला चढवला.
 

हे वाचलं का?

    follow whatsapp