Mahesh Landage: भाजप आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी, यामागचं कारण काय?
BJP MLA Mahesh Landage Death Threat : राजकीय वर्तुळातून खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
भाजपच्या 'त्या' आमदाराला जीवे मारण्याची धमकी
आमदाराला जीवे मारण्याची धमकी दिल्यानं भाजपच्या गोटात खळबळ
पोलीस कंट्रोल रुमला फोन करताच आरोपीला ठोकल्या बेड्या
BJP MLA Mahesh Landage Death Threat : राजकीय वर्तुळातून खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. शनिवारी दुपारी हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी उदयकुमार राय या व्यक्तीला अटक केली आहे. भोसली पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे. (A shocking news has come out from the political circles. Bhosari assembly MLA Mahesh Landge was threatened with death)
ADVERTISEMENT
हे ही वाचा >> Lucknow Building Collapse: बघता बघता इमारत पत्त्यांसारखी कोसळली! 8 जणांचा मृत्यू, पाहा VIDEO
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. महेश लांडगेची सुपारी मिळाली आहे, असं उदय कुमार नावाच्या इसमाने पोलीस कंट्रोल रुमला फोन करून सांगितलं. पोलिसांना या घटनेबाबत माहिती मिळताच याप्रकरणी त्यांनी तपास सुरु केला. त्यानंतर काही तासांच्या आतच उदय कुमारला अटक केली. उदय कुमार छत्तीसगढचा रहिवासी आहे. गेल्या पाच वर्षांपासून तो भोसरी येथे राहत आहे. त्याला भोसरी एमआयडीसी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धमकीचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही.
यापूर्वीही देण्यात आली होती जीवे मारण्याची धमकी
भाजप आमदार महेश लांडगे यांना याआधीही जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समजते. एका अज्ञात व्यक्तीने 30 लाखांची खंडणीची मागणी करत लांडगे यांना धमकी दिली होती. महेश लांडगे भोसरी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार असून त्यांनी जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी हेल्पलाईन सुरु केली होती. या हेल्पलाईन क्रमांकावर नागरिक त्यांच्या समस्यांबद्दल माहिती देतात. परंतु, याच हेल्पलाईनच्या माध्यमातून लांडगे यांना धमकी देण्यात आली होती.
हे वाचलं का?
हे ही वाचा >> Viral Video: पुण्यातील गणेशोत्सवात तृतीयपंथीयांचा धमाका! असं नृत्य कधी पाहिलं नसेल
त्या हत्येमुळं पुण्यात खळबळ
पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भर चौकार हत्या करण्यात आली होती. कुंटुबातील काही सदस्यांनी वनराज यांच्या हत्येचा कट रचला होता. संपत्तीच्या वादातून वनराजची हत्या केल्याचं समोर आलं होतं. आंदेकर यांच्यावर गोळीबार करून कोयत्याने वार करण्यात आले होते. आंदेकरांच्या हत्या प्रकरणात वनराजच्या बहिणीसह दाजी, भाच्यासह 10 ते 15 जणांना अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT