NCP : अजित पवारांना परभणीत झटका! बडा नेता शरद पवारांच्या राष्ट्रवादीत

मुंबई तक

ADVERTISEMENT

बाबाजानी दुर्राणी यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबाजानी दुर्राणी यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला परभणीत खिंडार

point

बाबाजानी दुर्राणी यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

point

पाथरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक

Babajani Durrani : एकीकडे राजेश विटेकर यांना विधान परिषदेत आमदार करत अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला परभणी जिल्ह्यात ताकद दिली आहे. पण, त्याच परभणीमध्ये अजित पवारांना झटका बसला आहे. पक्षाचे माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी अजित पवारांची साथ सोडली आहे. बाबाजानी दुर्राणी यांनी तुतारी फुंकली आहे. (Babajani Durrani quits Ajit pawar Ncp and Joined Sharad Pawar NCP)

ADVERTISEMENT

परभणी लोकसभा मतदारसंघ अजित पवारांना महादेव जानकर यांना सोडवा लागला. पण, त्यानंतर या जागेवरून इच्छुक असलेल्या राजेश विटेकर यांना विधान परिषदेत घेत जिल्ह्यात पक्षाला बळकटी देण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीआधी अजित पवारांना जिल्ह्यात धक्का बसला आहे. 

बाबाजानी दुर्राणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये

पाथरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या बाबाजानी दुर्राणी यांनी अखेर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला राम राम केला आहे. बाबाजानी दुर्राणींनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी फुंकली आहे. शरद पवार छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना बाबाजानी दुर्राणी यांनी पक्षप्रवेश केला.

हे वाचलं का?

हेही वाचा >> नारायण राणेंची भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याची भूमिका 

स्नेह भोजनाच्या निमित्ताने जयंत पाटलांचा 'करेक्ट कार्यक्रम'

काही दिवसापूर्वी निष्ठावंतांचा मेळावा परभणी जिल्ह्यामध्ये पार पडला. या मेळाव्याच्या निमित्ताने जयंत पाटील हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी जयंत पाटील हे बाबाजानी दुर्राणी यांच्या घरी स्नेनभोजनासाठी गेले होते. त्यानंतर बाबाजानी दुर्राणी अजित पवारांची साथ सोडणार या चर्चेला तोंड फुटले होते. 

पाथरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार?

पाथरी विधानसभेची जागा शिवसेनेला घेऊ असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले, असे पक्षाच्या अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष सईद खान यांनी म्हटलेले आहे. त्यामुळे बाबाजानी दुर्राणींची चलबिचल वाढली होती. 

ADVERTISEMENT

हेही वाचा >> बापानेच पुसलं लेकीचं कुंकू! रस्त्यातच जावयाची हत्या

महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून पाथरी विधानसभा मतदारसंघावर दावा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडून या मतदारसंघावर दावा केला जाऊ शकतो. पण, बाबाजानी दुर्राणी हे पक्षात आल्याने शरद पवारांकडून ही जागा घेतली जाऊ शकते. त्या अनुषंगानेच बाबाजानी दुर्राणी यांचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT