Tejpratap Yadav यांच्या आदेशावर डान्स करणाऱ्या पोलिसावर कारवाई, 'त्या' स्कूटरचंही चलन फाडलं
व्हायरल व्हिडीओमध्ये तेज प्रताप यादव स्टेजवरून पोलीस कर्मचाऱ्याचं नाव घेतात. तेजप्रताप यादव त्याला डान्स करायला सांगतत. तेज प्रताप पोलीस कर्मचाऱ्याला म्हणाले, 'तुम्ही नाचला नाहीत, तर तुम्हाला निलंबित केलं जाईल, बुरा ना मानो होली है'
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

तेजप्रताप यादव यांचा होळीच्या दिवशीचा व्हिडीओ

सुरक्षेत तैनात पोलीस कर्मचाऱ्याला डान्स करायला लावला

डान्स न केल्यास सस्पेंड करण्याची दिली धमकी
Tejpratap Yadav Holi Police Dance : तेज प्रताप यादव यांनी होळीच्या दिवशी केलेल्या कारनाम्याची चर्चा सध्या देशभर सुरू आहे. त्यानंतर आता तेजप्रताप यांच्या आदेशावरुन नाचणाऱ्या पोलीस हवालदाराच्या प्रकरणाची पाटणा पोलिसांनी गांभीर्यानं दखल घेतली आहे. आरजेडी नेते तेजप्रताप यांच्या सुरक्षेत असलेल्या डान्स करणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं आहे. तसंच, ज्या स्कूटीवरून तेज प्रताप मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी गेले होते, त्या स्कूटीवर पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलीस हवालदार निलंबित
हे ही वाचा >>शरद पवारांनी दिल्लीतील 'तालकटोरा'मध्ये मराठा योध्यांचे पुतळे बसवण्याची मागणी का केली? इतिहास काय?
पाटणा येथील वरिष्ठ पोलीस अधीक्षक कार्यालयानं सांगितलं की, आमदार तेज प्रताप यादव यांच्या सूचनेनुसार सार्वजनिक ठिकाणी वर्दीमध्ये नाचताना दिसणारे कॉन्स्टेबल दीपक कुमार (बॉडीगार्ड) यांना आता निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्या जागी आता दुसऱ्या हवालदाराची नियुक्ती करण्यात आली आहे.
काय म्हणाले होते तेजप्रताप?
या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये तेज प्रताप यादव स्टेजवरून पोलीस कर्मचाऱ्याचं नाव घेतात. तेजप्रताप यादव त्याला डान्स करायला सांगतत. तेज प्रताप पोलीस कर्मचाऱ्याला म्हणाले, 'तुम्ही नाचला नाहीत, तर तुम्हाला निलंबित केलं जाईल, बुरा ना मानो होली है'
पोलिसांचा तेज प्रताप यादव यांना दणका
तेज प्रताप यादव यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली आहे. ज्या स्कूटीवरून तेज प्रताप मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निवासस्थानी पोहोचले त्या स्कूटीवर पोलिसांनी चालान जारी केले आहे.
हे ही वाचा >> Nanded Accident Video : भरधाव स्कॉर्पिओने एकाला उडवलं, दुभाजक ओलांडून ट्रकला धडकली, दोन जागीच ठार
दरम्यान, 15 मार्चला होळीच्या निमित्तानं तेज प्रताप यादव मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारी निवासस्थानी होळी मिलन समारंभानंतर स्कूटीवरून त्यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर त्यांनी नितीश कुमार यांना पल्टू चाचा असं म्हटलं होतं.
हेल्मेटविना स्कूटर चालवल्याप्रकरणी पोलिसांनी तेजप्रताप यादव यांना चालान बजावलं आहे. तेजप्रताप ज्या स्कूटीवर हेल्मेटशिवाय गेले होते, ती स्कूटी मोहम्मद कमरूद होडा यांच्या नावावर आहे.