Jayashree Thorat: 'तुला सुद्धा पोरं कशी झाली?', थोरातांच्या मुलीबद्दल बोलताना विखेंच्या समर्थकाने पातळीच सोडली!

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

नेमकं काय घडलं?

point

सुजय विखे पाटील काय म्हणाले? 

Vasantrao Deshmukh Controversial statement About Jayashree Thorat : सध्या महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. अशातच आता राजकीय वातावरण प्रचंड तापलं आहे. शुक्रवारी (25 ऑक्टोबर 2024) अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमधील धांदरफळ येथे माजी खासदार, भाजप नेते, सुजय विखे पाटील यांची संकल्प सभा झाली. या सभेत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची लेक जयश्री थोरात यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं आहे. सुजय विखेंचे समर्थक, भाजपचे नेते वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरातांबद्दलचं हे आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यामुळे संगमनेर मतदारसंघात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. 

नेमकं काय घडलं?

संगमनेर येथे सुजय विखे पाटील यांची संकल्प सभा सुरू असताना भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी वादग्रत वक्तव्य केलं. ते म्हणाले, "भाऊसाहेब थोरात यांची नात, ती तर बोलती म्हणत्यात. माझा बाप सगळ्याचा बाप… काही कळत नाही. तुला सुद्धा पोरं कशी झाली? हा प्रश्न आहे. आपल्या कन्येला समजवा. नाहीतर आम्ही जर निवडणूक काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही. सुजयदादा तिला प्रेमाने ताई म्हणतात. बरोबर आहे, त्यांची संस्कृती आहे. पण दादा, या ताईचे पराक्रम जर पाहिले ना, सगळ्या तालुक्याला माहिती आहेत", असं वसंतराव देशमुख सभेत म्हणाले.

हेही वाचा : Congress Candidates 2nd List: काँग्रेसची दुसरी यादी आली समोर, MVA मध्ये नवं राजकारण?

वसंतराव देशमुख यांच्यावर आता गुन्हा दाखल झाला आहे. काल रात्री काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाडीची तोडफोडही केली आहे. राजकीय वर्तुळात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. सभा आटोपून परत जाणाऱ्या सुजय विखे पाटील यांच्या ताफ्यातील काही गाड्या अडवल्या गेल्या आणि त्यांची तोडफोड करत चिखली गावाजवळ जाळपोळ करण्यात आली आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा : Shiv Sena UBT Candidate List : शिवसेना ठाकरे गटाची दुसरी यादी 'सामना'तून जाहीर! वाचा एका क्लिकवर...  

सुजय विखे पाटील काय म्हणाले? 

"सभेतील झालेलं महिलांचे वक्तव्य निषेधार्थ आहे. महायुतीच्या वतीने कालही निषेध केला व आजही करतो. वसंतराव देशमुख महायुतीचे घटक नाहीत. केवळ त्या गावातील ज्येष्ठ व थोरात विरोधक म्हणून स्टेजवर आले होते. त्यांना भाषणाला कोणीही उठवलं नव्हतं ते स्वतःहून भाषणाला उठले. भाषण करताना त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला पण ते थांबले नाही. अशा प्रकारच्या खालच्या पातळीचे टीका महायुती स्वीकार करत नाही. 

गुन्हा दाखल झाला असेल तर कारवाई करा असं देखील आम्ही पोलिसांना सांगितलं. मात्र हे सगळं घडल्यानंतर ज्याने वक्तव्य केलं तो बाजूला राहिला आणि पुढच्या पंधरा मिनिटात त्या गावच्या एक्झिट पोइंटवर प्रत्येक ठिकाणी शंभर ते दीडशे जणांचा जमाव आला. गाड्या थांबवल्या गेल्या, दगड घेऊन गाड्या फोडल्या. आज सगळ्या कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यावर हा मला मारण्याचा पूर्वनियोजित कट होता हे समोर आलं", अशी प्रतिक्रिया या प्रकरणावर सुजय विखे पाटील यांनी दिली आहे. 

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT