कार्यकर्त्यांचं प्रेम पाहून मोदी झाले भावूक, जुळ्या बाळांचा बाप होऊनसुद्धा कार्यकर्ता...

मुंबई तक

ADVERTISEMENT

Narendra Modi
Narendra Modi
social share
google news

बातम्या हायलाइट

point

जुळ्या बाळांच्या बापासाठी मोदींची भावूक पोस्ट

point

नरेंद्र मोदी त्या कार्यकर्त्यासाठी झाले भावूक

PM Narendra Modi: लोकसभा निवडणुकींच्या (Lok sabha Election 2024) तयारीसाठी सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकही जोरदार तयारीला लागले आहेत. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सध्या देशातील अनेक भागात दौरा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तामिळनाडूचा (Tamilnadu) दौरा केला. ते जेव्हा चेन्नई (chennai) विमानतळावर पोहोचले होते, तेव्हा, तिथे त्यांच्यासाठी आनंददायी आणि एक वेगळी गोष्ट त्यांना पाहायला मिळाली. 

ADVERTISEMENT

आधी स्वागत मोदींचे

पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी चेन्नईमधील विमानतळावर पोहोचले त्यावेळी त्यांना भेटण्यासाठी तिथे एक कार्यकर्ता पोहचला होता. तो कार्यकर्ता सोमवारीच जुळ्या मुलांचा बाप बनला होता, मात्र त्याने आपल्या मुलांचे चेहरेही पाहण्याआधी तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहचला होता.  

जो कार्यकर्ता आपल्या जुळ्या बाळांचा चेहरा न पाहता आधी मोदींच्या स्वागतासाठी विमानतळावर पोहचला होता, तो सारा प्रसंग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पंतप्रधान मोदी यांनी त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'पक्षासाठी असे प्रामाणिक आणि स्वतःला समर्पित करणारे कार्यकर्ते आमच्याकडे असल्याचे पाहून नक्कीच आम्हाला आनंद होतो.'

जुळ्या बाळांना जन्म

या घटनेविषयी लिहिलाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले आहे की. 'चेन्नई विमानतळावर आमचा एक कार्यकर्ता अस्वंथ पिजाई माझ्या स्वागतासाठी आला होता. त्यावेळी त्यांनी मला सांगितले की, त्याच्या पत्नीने नुकतेच जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. मात्र त्या बाळांचा अजून मी चेहरा पाहिला नाही. त्याचवेळी मी असवंतला सांगितले की यावेळी तु्म्ही इथे नाही तर तुमच्या कुटुंबीयांसोबत पाहिजे होता.'

ADVERTISEMENT


कार्यकर्त्यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, या अशा प्रसंगामुळे आणि एवढे निष्ठावंत कार्यकर्ते आमच्याकडे असल्याचे पाहून आम्हाला आनंद होतो. कार्यकर्त्यांच्या या प्रेमामुळे आणि त्यांच्या आपुलकीमुळे मी भावूक होतो. 

ADVERTISEMENT

चेन्नई दौऱ्यावेळी त्यांनी मागील वर्षी आलेल्या महापुराची आठवण करून देत त्यांनी द्रमुक सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी कल्पक्कममधील अणुऊर्जा प्रकल्पालाही भेट दिली.

हे ही वाचा >> सरकारला झटका, साईबाबांसह 5 जण निर्दोष, प्रकरण काय?

    follow whatsapp

    ADVERTISEMENT