By Poll Results : भाजपला धक्का, 'काँग्रेस'चा डंका; 13 जागांचे निकाल काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

सात राज्यात झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल काय लागले?
विधानसभा पोटनिवडणुकीचे सर्व निकाल पहा...
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विधानसभा पोटनिवडणूक निकाल २०२४

point

काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने जिंकल्या सर्वाधिक जागा

point

भाजपला जास्त जागा जिंकण्यात अपयश

News about Assembly Seats : 7 राज्यांतील विधानसभेच्या 13 जागांसाठीच्या पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर झाले. काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसने प्रत्येकी 4 जागा जिंकल्या, तर भाजपला 2 जागा जिंकता आल्या आहेत. जालंदरची जागा आम आदमी पार्टीने जिंकली. हिमाचल प्रदेशमध्ये 2-1 अशी लढत होती, जिथे सत्ताधारी काँग्रेसने 2 आणि भाजपने एक जागा जिंकली. (Know Everything about Assembly by Election results 2024)

उत्तराखंड

उत्तराखंडमधील मंगळूर आणि बद्रीनाथ जागेवर पोटनिवडणूक झाली. या जागा यापूर्वी काँग्रेस आणि बसपाकडे होत्या आणि त्या जागा जिंकण्याचे आव्हान भाजपसमोर होते. त्यात भाजपला यश मिळाले नाही. बद्रीनाथ मतदारसंघात काँग्रेसच्या लखपतसिंग बुटोला यांनी भाजपच्या राजेंद्र भंडारी यांचा 5 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. राजेंद्र भंडारी हे आधी येथून आमदार होते, पण नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.

हेही वाचा >> 'शरद पवारांचेच मत फुटले', जयंत पाटलांच्या पराभवाचे कारण समोर

दुसरीकडे, बसपाचे आमदार सरबत करीम अन्सारी यांच्या निधनानंतर रिक्त झालेली मंगळूरची जागा काँग्रेसच्या काझी निजामुद्दीन यांनी जिंकली आणि चुरशीच्या लढतीत त्यांनी भाजपच्या कर्तारसिंग भडाना यांचा 400 हून अधिक मतांनी पराभव केला. काझी निजामुद्दीन याआधी तीनवेळा या जागेवरून काँग्रेसचे आमदार राहिले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हिमाचल प्रदेश

हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने तीनपैकी 2 जागा जिंकल्या आहेत. देहरा मतदारसंघातून मुख्यमंत्री सुखू यांच्या पत्नीने 9399 मतांनी विजय मिळवला. नालागढ मतदारसंघातून काँग्रेसच्या हरदीपसिंग बावा यांनी भाजपच्या के. एल. ठाकूर यांचा सुमारे 9 हजार मतांनी पराभव झाला. हमीरपूरमध्ये भाजपच्या आशिष शर्मा यांनी काँग्रेसच्या पुष्पेंद्र वर्मा यांचा 1571 मतांनी पराभव केला. यापूर्वी या तीन जागा अपक्ष उमेदवारांकडे होत्या.

पश्चिम बंगाल

सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने राज्यातील चार विधानसभा जागांवर क्लीन स्वीप केले. रायगंज, बागडा, राणाघाट आणि माणिकतला या जागांवर तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. रायगंज मतदारसंघातून तृणमूलचे उमेदवार कृष्णा कल्याणी यांनी भाजपचे उमेदवार मानसकुमार घोष यांचा 49 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.

ADVERTISEMENT

हेही वाचा >> "जयंत पाटलांचा उबाठाने ठरवून पराभव केला", शेलारांची 'पोस्ट'

तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार मधुपर्णा ठाकूर यांनी बागडा मतदारसंघात 33455मतांनी विजय मिळवला. याशिवाय राणाघाटमधून तृणमूलच्या मुकुट मणी यांनी भाजपच्या मनोज कुमार बिस्वास यांचा सुमारे 39 हजार मतांनी पराभव केला. माणिकतला मतदारसंघात तृणमूलच्या सुप्ती पांडे यांनी भाजपच्या कल्याण चौबे यांचा 41406 मतांनी पराभव केला.

ADVERTISEMENT

पंजाब

जालंधर पश्चिम मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या मोहिंदर भगत यांनी भाजपच्या शितल अंगुराल यांचा सुमारे 37 हजार मतांनी पराभव केला. आधी ही जागा आम आदमी पार्टीकडे होती आणि शितल अंगुराल येथून आमदार होत्या, पण नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर येथे पोटनिवडणूक झाली.

बिहार

बिहारच्या रुपौली जागेवर मोठा गोंधळ झाला. जेडीयू आणि आरजेडीसारख्या पक्षांना मागे टाकत अपक्ष उमेदवार शंकर सिंह विजयी झाले. जेडीयूचे कलाधर मंडल दुसऱ्या, तर विमा भारती तिसऱ्या स्थानी राहिल्या. विमा भारती जेडीयूमध्ये गेल्याने येथील जागा रिक्त झाली होती. विमा भारती यांनीही लोकसभा निवडणूक लढवली होती, पण तिथेही त्या तिसऱ्या क्रमांकावर होत्या.

तामिळनाडू

तामिळनाडूतील विक्रवंडी मतदारसंघात सत्ताधारी द्रमुकने विजय मिळवला आहे. द्रमुकचे अन्नियूर शिव शिवाशनमुगम. ए. यांनी पट्टाली मक्कल कच्ची पार्टी (पीएमके)चे अंबुमनी. सी यांचा 50 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला.

हेही वाचा >> Majhi ladki bahin yojana New Rules : रेशन कार्डवर नाव नाही, मग असा भरा अर्ज!

मध्य प्रदेश

मध्य प्रदेशातील अमरवाडा मतदारसंघाचाही निकाल लागला आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील अमरवाडा मतदारसंघातील मतमोजणीत भाजपचे कमलेश शाह 3253 मतांनी विजयी झाले आहेत. काँग्रेसचे धीरेन शहा यांचा पराभव झाला आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने अमरवाडा जागा जिंकली होती, परंतु कमलेश प्रताप यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केल्याने ही जागा रिक्त झाली होती.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT