"आम्ही सगळ्यांचा सुपडा साफ करून दाखवला आणि...", बदलापूरमध्ये CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
CM Devendra Fadnavis Speech : "ज्याच्यामागे आईची ताकद, बहिणीची ताकद आणि मुलीची ताकद असते, त्याला कोणीही वाकडं करू शकत नाही. हे आमच्या बहिणींनी करून दाखवलं."
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

बदलापूरमध्ये पार पडला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा

"आई जिजाऊंनी दिलेली आण घेऊन आणि भवानी तलवार घेऊन..."

CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
CM Devendra Fadnavis Speech : "लाडक्या बहिणींचं प्रेम आणि आशीर्वाद असा मिळाला की आम्ही सगळ्यांचा सुफडा साफ करून टाकला आणि महाराष्ट्राच प्रचंड महाविजय मिळवला. ज्याच्यामागे आईची ताकद, बहिणीची ताकद आणि मुलीची ताकद असते, त्याला कोणीही वाकडं करू शकत नाही. हे आमच्या बहिणींनी करून दाखवलं आणि पुन्हा एकदा मला एकनाथ शिंदे आणि अजितदादांना या महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी या पदावर आपण बसवलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. या निमित्ताने या बदलापूरमध्ये पहिला कार्यक्रम घेण्याची संधी मिळाली. तो ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनावरणाची..आपण सर्व जण जाणतो आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेतो आहोत. आज आपण जगतो आहोत. आज आमचा स्वदेश, स्वधर्म, स्वभाषा ही जिवंत आहे. याचं एकमेव कारण जर का असेल, तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत, असं मोठं विधान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते बदलापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात बोलत होते.
देवेंद्र फडणवीस जनतेला संबोधीत करताना पुढे म्हणाले, "ज्यांच्यामुळे हे स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे. तो काळ असा होता की ज्या काळात अनेक राजे आणि राजवाडे मुघलांचं मांडलीकत्व स्वीकारत होते. स्वातंत्र्याची इच्छा सोडून दिली होती. गुलामीत राहणं पसंत करत होते. अशा काळात आई जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवण दिली आणि संकल्प दिला की शिवबा तुला देव देश आणि धर्मासाठी लढायचं आहे. ज्याप्रकारे आपल्या या मराठी मुलुकामध्ये आमच्या आया बहिणींची अब्रू लुटली जातेय. ज्या प्रकारचे अनाचार, अत्याचार, दुराचार आणि बलात्कार पाहायला मिळतायत, शिवबा तुला माझी आण आहे. तुला या मराठी मुलुकाला स्वराज्यात परिवर्तीत करावच लागेल".
हे ही वाचा >> Suresh Dhas : "संतोष देशमुख हत्याप्रकरणी सुरेश धस यांचं खळबळजनक विधान! म्हणाले, "तिच्यासोबत झटापट केल्याचं..."
आई जिजाऊंनी दिलेली आण घेऊन आणि भवानी तलवार घेऊन छत्रपती शिवराय हे मैदानात उतरले. अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं. कालपर्यंत सामान्य वाटणारे शेतकरी, शेतमजूर, बाराबलुतेदार, ज्यांना कोणता चेहरा आणि ओळख नव्हती. अशा सगळ्या लोकांना एकत्रित करून त्यांना प्रशिक्षीत करून त्या सामान्य माणसांकडून असामान्य काम करून घेण्याचं धारिष्ठ जर कुणी दाखवलं असेल, तर ते छत्रपती शिवरायांनी याठिकाणी दाखवलं आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.