Devendra Fadnavis: "दिल्लीत प्रचंड मोठा पराभव...", राहुल गांधींवर निशाणा साधत CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

मुंबई तक

Cm Devendra Fadnavis On Rahul Gandhi: 39 लाख मतदार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी दरम्यानच्या 5 महिन्यात नोंदवले गेले. हे मतदार कुठून आले? असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय.

ADVERTISEMENT

CM Devendra Fadnavis On Rahul Gandhi
CM Devendra Fadnavis On Rahul Gandhi
social share
google news

बातम्या हायलाइट

point

CM देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधींना केलं टार्गेट

point

"जोपर्यंत ते आत्मचिंतन करणार नाहीत..."

point

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?

Cm Devendra Fadnavis On Rahul Gandhi: 39 लाख मतदार लोकसभा आणि विधानसभा निवडणुकी दरम्यानच्या 5 महिन्यात नोंदवले गेले. हे मतदार कुठून आले? असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला होता. यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलंय. "सर्व उत्तर निवडणूक आयोगाने दिलं आहे. किती मतदार वाढले, कुठे वाढले, हे निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. दिल्लीत प्रचंड मोठा पराभव होत असल्याने आता राहुल गांधींची अशी तयारी चालली आहे. त्याचं कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न ते करत आहेत", असं म्हणत फडणवीसांनी राहुल गांधींवर निशाणा साधला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना काय म्हणाले?

"किती मतदार वाढले, कुठे वाढले, हे निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. दिल्लीत प्रचंड मोठा पराभव होत असल्याने आता राहुल गांधींची अशी तयारी चालली आहे. त्याचं कव्हर फायरिंग करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. मी वारंवार सांगतो, जोपर्यंत ते आत्मचिंतन करणार नाहीत आणि आपल्या मनाची खोटी समजूत काढून घेतील, तोपर्यंत जनतेचं समर्थन त्यांना कधीच मिळणार नाही. वोटर्स कुठून आले, कुणाचं नावं कापलं गेलं, या सर्व गोष्टींचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं आहे. यामुळे त्याचं वेगळं असं उत्तर देण्याची आवश्यकता नाहीय"', असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं.

हे ही वाचा >> 'ऑपरेशन टायगर'ला 'टायगर जिंदा हैं' म्हणत उत्तर... ठाकरेंच्या खासदारांनी दिल्लीत एकत्र पत्रकार परिषदेत घेत दिली गॅरंटी

राहुल गांधी एकप्रकारे कव्हर फायरिंगच करत आहेत, कारण त्यांना माहित आहे, 8 तारखेला दिल्लीचा निकाल लागल्यानंतर त्यांची पार्टी दिल्लीत संपणार आहे. यामुळे त्यादिवशी काय बोलायचं आणि कशाप्रकारे नवीन नरेटिव्ह सेट करायचं, याचा सराव ते करत आहेत. जोपर्यंत ते आत्मचिंतन करत नाहीत, फक्त स्वत:च्या मनाला खोटं सांगून सावरण्याचा प्रयत्न करतील. राहुल गांधींनी त्यांच्या पराभवाचं आत्मचिंतन करावं, असंही देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले. 2019 ते 2024 दरम्यान राज्यात 34 लाख मतदार नोंदवले गेले. मात्र,  तब्बल 39 लाख मतदार लोकसभा आणि विधानसभेच्या दरम्यानच्या 5 महिन्यात नोंदवले गेले. विधानसभेपूर्वी सहभागी झालेले हे 39 लाख मतदार कोण आहेत असा प्रश्न राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता. 

हे ही वाचा >> 7 February Gold Rate : लग्नसराईत सोनं खरेदी करण्याची सुवर्ण संधी? चांदीतही झाली घसरण, जाणून घ्या आजचे दर

हे वाचलं का?

    follow whatsapp