Devendra Fadnavis : ''लाडक्या बहिणींचे फॉर्मच सबमीट करणार नाहीत...'', फडणवीस 'हे' काय बोलून गेले?

मुंबई तक

ADVERTISEMENT

devendra fadnavis criticize mahavikas aghadi on mukhyamantri ladki bahin yojana fake narrative maharashtra politics
महाविकास आघाडीच्या लोकांनी एक स्ट्रेटेजी ठरवली आहे.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाविकास आघाडीची स्ट्रेटेजी आहे.

point

महाविकास आघाडीला योजना फसवायची आहे

point

देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर आरोप

Devendra Fadnavis On Maha Vikas Aghadi : राज्यात महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे. या योजनेवरून राजकारण देखील पेटले आहे. अशात तुमचे फॉर्म भरले जातील आणि सबमीटच करणार नाही, अशी महाविकास आघाडीची स्ट्रेटेजी आहे. महाविकास आघाडीला योजना फसवायची आहे, असा आरोप देखील देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केला आहे. (devendra fadnavis criticize mahavikas aghadi on mukhyamantri ladki bahin yojana fake narrative maharashtra politics) 

महाविकास आघाडीच्या लोकांनी एक स्ट्रेटेजी ठरवली आहे. ही लोक महिलांचे फॉर्म भरून  घेणार आहेत आणि फॉर्मच सबमीट करणार नाहीयेत. आणि त्या महिलांमध्ये सरकारच्या विरूद्ध रोष तयार करणार आहेत. तुमचा फॉर्म भरला होता आणि पण सरकारने तुम्हाला पैसै दिले नाही. त्यामुळे ही योजना कशी फसेल हा प्रयत्न यांचा चालला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. महिलांनी या मविआच्या लोकांकडून अर्ज भरुण घेऊ नये असे फडणवीसांनी म्हटले आहे.

हे ही वाचा : Mazi Ladki bahin Yojana New GR : माझी लाडकी बहीण योजनेतील कोणत्या ‘या’ अटींमधून झाली सुटका?

हीच लोक सभागृहात सांगतात ही खोटी योजना आहे. आणि गावात सगळ्यात पहिलं पोस्टर यांचंच. हे कोर्टात पण चालले आणि पोस्टर मात्र स्वत:च लावतात, अशी टीका फडणवीसांनी विरोधकांवर केली. 
 
फडणवीस पुढे म्हणाले, आजची तारीख लिहून ठेवा, विधानसभेनंतर महायुतीचंच सरकार निवडून येईल. 2024च्या निवडणुकीत देखील जनता आपल्या पाठिशी होती. फेक नरेटीव्हमुळे आपला पराभव झाला आता फेक नरेटीव्हला खऱ्या नरेटीव्हने उत्तर द्यायची वेळ आली आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. मविआचा विजय फुग्यासारखा, माझ्या कार्यकर्त्याने टाचणी लावली की फुगा फुटेल, विधानपरिषदेला अशीच टाचणी लावली.आपली मशिनरी जमीनीवर उतरली पाहिजे, आपल्या योजनांची माहिती सरकारला द्या, असे आवाहन फडणवीसांनी कार्यकर्त्यांना दिला. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Maratha Reservation : “मी आमदारकीचा राजीनामा देतो, तुम्ही...”, प्रसाद लाडांचा जरांगेंना मोठा प्रस्ताव

आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतं, पण तो आदेशाची वाट बघतोय, मी तुम्हाला आज परवानगी देतो, ज्याला बॅटींग करायचीय त्याने बॅटींग करा, मैदानात उतरा, अट एकच, हिट विकेट व्हायचं नाही. काही लोकं बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायचं सोडून आपल्याच माणसांवर बोलतात, असं काही बोलतात की चार दिवस त्याचीच उत्तर द्यावी लागतात. बाकी आदेश विचारु नका, मैदानात उतरा आणि ठोकून काढा, अशी फ्रि हँड सूट फडणवीसांनी कार्यकर्ते, नेत्यांना दिली.
 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT