Devendra Fadnavis : "शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री होते, मग...", फडणवीसांनी घेरलं

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

     devendra fadnavis  criticize sharad pawar on maratha reservation fake narrabtive pune rally
82 सालापासून का आरक्षण दिलं नाही?
social share
google news

Devendra Fadnavis Criticize Sharad Pawar : राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. त्यात विरोधकांनी आरक्षणाच्या बैठकीला दांडी मारल्याने सत्ताधारी चांगलेच तापले होते. असे असताना आता आरक्षणाच्या मुद्यावरून देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) शरद पवारांवर (Sharad Pawar) जोरदार हल्ला चढवला आहे. पवारसाहेब चार वेळा स्वत: स्वत: मुख्यमंत्री होते, का मराठा आरक्षण दिलं नाही? 82 सालापासून का आरक्षण दिलं नाही? असा सवाल फडणवीसांनी शरद पवारांना केला आहे.  (devendra fadnavis criticize sharad pawar on maratha reservation fake narrabtive pune rally)

पुण्यात भाजपचा मेळावा पार पडला आहे. या मेळाव्यातून फडणवीसांनी महाविकास आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडलं. ''अण्णासाहेब पाटलांनी जर 1982 साली स्वत:ला गोळी झाडून घेतली होती. तुम्ही चार वेळा तिकडे रेकॉर्डवर सांगितले. मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही. मी नाही बोललो, कोण बोललोय हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि  चार वेळा पवारसाहेब स्वत: मुख्यमंत्री होते, का मराठा आरक्षण दिलं नाही? असा सवाल फडणवीसांनी शरद पवारांना केला.  पण आता मतांकरता दुफळी निर्माण करण्याचं काम सुरु आहे. दोन समाजामध्ये पेट्रोल टाकण्याच काम काही नेते करतायत'', असा आरोप फडणवीसांनी यावेळी शरद पवारांवर केला. 

हे ही वाचा : Maharashtra Vidhan Sabha: भाजपचा आकडा ठरला? पवार-शिंदे करावा लागणार मोठा त्याग!

''हो आम्ही आरक्षण दिलं. आणि आरक्षण देऊत ते हायकोर्टातही टिकवलं. आणि जोपर्यंत आमचं सरकार होतं सुप्रीम कोर्टात तीन वेळा सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने स्टे द्यायला नकार दिला. सुप्रीम कोर्टातही आरक्षण आम्ही टिकवलं. पण दुदैवाने शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि आरक्षण गेलं. त्याला टिकवण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही'', अशी टीका फडणवीसांनी ठाकरे,पवारांवर केली. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

 मनोज जरांगेंना माझा सवालच नाही. माझा सवाल उद्धव ठाकरे, शरद पवार साहेब आणि नाना पटोले यांना आहे. हे जे आंदोलन चाललंय, या आंदोलनात तुमची भूमिका स्पष्ट करा. तुम्ही सांगा,मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याकरता तुमचं समर्थन आहे का? हे एकदा स्पष्ट करा आणि दुटप्पी भूमिका सोडा, असे फडणवीस यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा : Prakash Ambedkar : ''अजित पवार महायुतीतुन बाहेर पडले, तरच...'', आंबेडकरांचं मोठं राजकीय विधान

आपल्यापैकी प्रत्येकाला उत्तर देता येतं, पण तो आदेशाची वाट बघतोय, मी तुम्हाला आज परवानगी देतो, ज्याला बॅटींग करायचीय त्याने बॅटींग करा, मैदानात उतरा, अट एकच, हिट विकेट व्हायचं नाही. काही लोकं बोलायला उतरले की समोरच्यावर बोलायचं सोडून आपल्याच माणसांवर बोलतात, असं काही बोलतात की चार दिवस त्याचीच उत्तर द्यावी लागतात. बाकी आदेश विचारु नका, मैदानात उतरा आणि ठोकून काढा, अशी फ्रि हँड सूट फडणवीसांनी कार्यकर्ते, नेत्यांना दिली.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT