Sharad Pawar: 'दमदाटी करू नका, शरद पवार म्हणतात मला.. मी सोडतही नाही...', पवारांचा नेमका कुणाला इशारा?

मुंबई तक

ADVERTISEMENT

अजित पवारांना शरद पवारांचा अप्रत्यक्ष इशारा
अजित पवारांना शरद पवारांचा अप्रत्यक्ष इशारा
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवारांचा अजित पवारांना इशारा

point

शरद पवारांचं लोणावळ्यात तुफान भाषण

point

मोदी सरकारवर पवारांची टीका

Sharad Pawar: लोणावळा: 'एकदा दमदाटी केली ते बास.. पुन्हा असं काही केलंत तर शरद पवार म्हणतात त्यांना.. तुम्ही त्याची काळजी करू नका.. मी त्या रस्त्याने कधी जात नाही.. पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर सोडतही नाही...' असं म्हणत शरद पवार यांनी अजित पवार गटातील आमदाराला थेट इशाराच दिला आहे. मात्र, हा इशारा केवळ आमदारालाच नाही तर अप्रत्यक्षपणे अजित पवार यांनाही असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. (do not bully on anyone sharad pawar gave a direct warning to ajit pawar in his speech in lonavala)

ADVERTISEMENT

लोण्यावळ्यात आज (7 मार्च) राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचा मेळावा लोणावळ्यात घेण्यात आला. यावेळी शरद पवारांनी अजित पवार गटाचे लोणावळ्यातील आमदार सुनील शेळके यांच्यावर जोरदार निशाणा साधला.. आजच्या मेळाव्याला जााऊ नका.. यासाठी आमदार सुनील शेळके दमदाटी करत असल्याचा आरोप लोणावळ्याच्या मेळाव्यात करण्यात आला. ज्याचा पवारांनी भाषणातच खरपूस समाचार घेतला.

'शरद पवार म्हणतात मला...', पवार लोणावळ्यात पाहा असं का बोलले? 

'एका बाजूने आरोप करता आणि दुसरीकडे स्वत:च्या पक्षात घेता. पंतप्रधानांनी 1 वर्षांपूर्वी असं म्हटलेलं की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही भ्रष्ट लोकं आहेत. त्यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात पाटबंधारे खात्यात 70 हजार कोटीचा घोटाळा झाला असं सांगितलं. राज्य सहकारी बँकेत घोटाळा झाला.. हा आरोप त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसवर.. मी जाहीरपणाने सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असा घोटाळा कोणी केला असेल तर तुमच्या हिंमत असेल तर चौकशी करा. सुप्रीम कोर्टाचा माणूस नेमा..' 

हे वाचलं का?

'ज्यांच्यावर आरोप केले हे घटक आज कुठे आहेत याची पाहणी तुम्ही केली पाहिजे. याचा अर्थ हा आहे की, भाजप म्हणजे एक वॉशिंग मशीन झालं आहे. आज या पद्धतीचं राजकारण सुरू आहे.'

हे ही वाचा>> Baramati: 'तेव्हा त्यांना सांगतो कसा आहे अजित पवार.. तेव्हा काय सोडणार नाही..' अजित पवारांनी थेट दिली धमकी?

'बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची स्थापना केली. मराठी माणसाच्या प्रश्नाची मांडणी सामना वृत्तपत्रातून केली जाते. सामनाचे संपादक संजय राऊत हे खासदार आहे. संसदेत माझ्या शेजारीच त्यांची जागा आहे. सामनामधून नरेंद्र मोदींच्या सरकारवर त्यांनी टीका-टिप्पणी केली. त्यांना अटक केली.. त्यांना 4 महिने तुरुंगात टाकलं.' 

ADVERTISEMENT

'लोकशाहीत लिखाणाचं स्वातंत्र्य आहे की नाही? पं. जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी असो किंवा इतर मोठे नेते असोत.. त्यांच्यावर, धोरणांवर अनेकांनी टीका केली. पण नेत्यावर टीका केली म्हणून लेखक, संपादकाला तुरुंगात टाकलं जातं हे या देशात कधी घडलं नाही.. हे हल्लीच्या राज्यकर्त्यांच्या कालखंडात घडलं आहे. याचा अर्थ एकच आहे की, आज मोदींचा जो कारभार चालला आहे तो लोकशाहीला संकटात नेणारा आहे. ही लोकशाही संकटात आली तर सामान्य लोकांचे अधिकार जातील, उध्वस्त होतील..' 

ADVERTISEMENT

'माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की, महाविकास आघाडीचे जे कोणी उमेदवार असतील त्यांच्या पाठिशी तुमची शक्ती उभी करणं ही जबाबदारी तुमची आहे. '

'आज बाफना साहेब सांगत होते की, काही आमदारांनी तुम्ही आजच्या मेळाव्याला येऊ नये यासाठी देखील दमदाटी केली. कोणावर टीका केली.. त्यांनाही फोन करण्यात आला. किती गंमतीची गोष्ट आहे.'

हे ही वाचा>> Ajit Pawar: '…तर मी विधानसभा निवडणूक लढवणार नाही', सुप्रिया सुळेंच्या पराभवासाठी अजित पवारांचा नवा डाव

'इथे आमदारांनी दमदाटी करावी.. मला त्यांना सांगायचंय, बाबा रे.. तू आमदार कोणामुळे झाला? तुझ्या सभेला इथे कोण आलं होतं? त्यावेळेस तुझ्या पक्षाचा अध्यक्ष कोण होता? फॉर्म भरायला चिन्ह यासाठी नेत्याची सही लागते.. ती सही माझी आहे. माझ्या सहीने फॉर्म भरला.. आणि आज तुम्ही त्याच पक्षाच्या कार्यकर्त्याला.. जे तुम्हाला निवडून आणण्यासाठी राबले, घाम गाळला.. आज त्यांना तुम्ही दमदाटी करता?'

माझी विनंती आहे.. एकदा दमदाटी केली ते बास.. पुन्हा असं काही केलंत तर शरद पवार म्हणतात त्यांना.. 'तुम्ही त्याची काळजी करू नका.. मी त्या रस्त्याने कधी जात नाही.. पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर सोडतही नाही... असं म्हणत शरद पवार यांनी गर्भित इशाराच यावेळी दिला आहे.

शरद पवारांचा अजितदादांना इशारा?

दरम्यान, शरद पवार हे जरी आमदार सुनील शेळके यांच्या अनुषंगाने बोलत असले तरीही त्यांचा बराचसा रोख हा अजित पवारांकडे असल्याची चर्चा आहे. 

काही दिवसांपूर्वी अजित पवार हे बारामतीतील आपल्या भाषणात थेट म्हणाले होते की, 'ज्यांना माझ्यासोबत राहायचंय त्यांनी खुलेपणाने राहा.. दबावाने कोणी बरोबर राहू नका.. आता जसं संदीप गुजर, एस एन जगताप, सतीशमामा खोणे, काटे वकील हे सगळे जणं जसं तिकडच्या बाजूने काम करतायेत.. मला काही वाटत नाही.. तो त्यांचा अधिकार आहे.. त्यांचा विचार आहे, आपल्याला काय करायचंय.. पण पुढे कधी तरी त्यांना अजित पवारची गरज लागेल.. तेव्हा त्यांना सांगतो कसा आहे अजित पवार.. तेव्हा काय सोडणार नाही.. तेव्हा कोणी यायचं नाही.. नाही नाही दादा जाऊ दे, जाऊ दे दादा.. किंवा ते मला म्हणतील आमदारकीला तुम्हीच.. ते तसलं मला नाही चालणार..' 

यामुळे देखील शरद पवार यांच्या आजच्या भाषणाचा रोख हा अजित पवारांकडे असल्याचं आता बोललं जातंय.

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT