‘…अन् एकनाथ शिंदे रडायला लागले’, आदित्य ठाकरेंनी कोणता किस्सा सांगितला?
Aaditya Thackeray Interview : शिवसेना फुटण्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री व्हायचे आहे का, असा प्रश्न विचारला होता. एकदा मातोश्रीवर एकनाथ शिंदे रडले होते, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
ADVERTISEMENT
Aaditya Thackeray India today conclave Mumbai 2023 : पक्षात बंड होण्यापूर्वी तुम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली, तेव्हा तुम्हाला असा संशय आला होता का की, काहीतरी गडबड आहे, की तुम्हाला याचा थांगपत्ताच नव्हता? असा प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरेंनी शिवसेनेतल्या बंडापूर्वी पडद्यामागे झालेली घटना सांगितली. (why Eknath Shinde cried after Uddhav Thackeray asked him question?)
ADVERTISEMENT
आदित्य ठाकरे म्हणाले, “डाल में काला नहीं, डाल ही काली थी. तुम्ही त्यांना विचारा. पण, गेल्या तीन-चार वर्षांपासून ते प्रामाणिक राहिलेले नाहीत. पण, ठिक आहे. २० मे रोजी म्हणजे ते निघून गेले त्याच्या महिनाभर आधी माझ्या वडिलांनी (उद्धव ठाकरे), जे त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्यांनी (उद्धव ठाकरे) त्यांना (एकनाथ शिंदे) बोलावलं आणि विचारलं की, तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचं आहे का?”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
भाजपसोबत जायचं आहे…
आमदार आदित्य ठाकरे याच मुद्द्यावर पुढे म्हणाले, “कारण नोव्हेंपासून माझ्या वडिलांवर शस्त्रक्रिया झालेली होती. त्यांना बातम्या मिळू लागल्या. त्याचबरोबर आमदारही येऊन सांगत होते की, यांनी अशी ऑफर दिली आहे. म्हणत आहे की, भाजपसोबत जायचं आहे. पक्ष तोडायचा आहे. हे सगळं चालू होतं. त्याचबरोबर ते हेही म्हणाले की, उद्धव ठाकरे सध्या रुग्णालयात आहेत. पुढचं माहिती नाही. असा व्यक्ती नेतृत्व करू शकतो का?”
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
हेही वाचा >> ‘अजित पवारांना युतीत घेतलं, कारण…’, फडणवीसांनी दिलं उत्तर
बंड करण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना काय विचारलं?
शिवसेनेतल्या बंडापूर्वी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात झालेल्या संवादाही आदित्य ठाकरेंनी सांगितला. ते म्हणाले, “तुम्ही विचार करा की, एका व्यक्तीचं मनात किती काळं असू शकतं. ज्या व्यक्तीने तुम्हाला मोठं केलं, तो रुग्णालयात आहे आणि तुम्ही स्वतः करिअरबद्दल विचार करत आहे. जेव्हा त्यांना (एकनाथ शिंदे) विचारलं, तेव्हा ते रडायला लागले. आणि म्हणाले की, “नाही. नाही. हे असं आहे. तुरुंगात टाकतील. हे तुरुंगात जायचं वय नाहीये. मुलाला तुरुंगात टाकतील. असं करतील, तसं करतील. त्यानंतर २० जून रोजी ते पळून गेले.”
हेही वाचा >> “शरद पवारांनीच राष्ट्रपती राजवट लावायला सांगितलं”, देवेंद्र फडणवीसांनी फोडला बॉम्ब
आदित्य ठाकरेंनी शिंदे आणि ४० आमदारांना काय दिलं चॅलेंज?
“हे ४० लोक पळून गेले कारण, त्यांना भीती वाटत होती. त्यांनी जे खाल्लं ते पचवता आलं नाही किंवा लपवता आलं नाही आणि त्यामुळे ते पळून गेले. जे प्रामाणिक होते, धाडसी होते, ते आमच्यासोबत राहिले. महाराष्ट्रात राहिले. बाकीचे गुजरात, गुवाहाटी आणि गोव्यात पळून गेले. आता सुद्धा एक चर्चा घ्या की ते का पळून गेले. खोटं का बोलले?”, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी आमने-सामने चर्चेसाठी येण्याचं आव्हान दिलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT