Eknath Shinde : शिंदेंची रणनीती भाजपलाच देणार धक्का? ठाण्यात 'या' मतदारसंघासाठी जोरबैठका सुरू

मुंबई तक

ADVERTISEMENT

eknath shinde shiv sena meeting for thane vidhan sabha 2024 devendra fadnavis bjp maharashtra politics
शिवसेनेने ठाणे विधानसभेची जागा मिळवण्यासाठी मौर्चेबांधणी सुरु केली आहे.
social share
google news

Eknath Shinde Shiv Sena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्याची जागा जिंकून ठाकरेंना मोठा धक्का दिला होता. या जागेवरून शिंदेंचे उमेदवार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) विजयी ठरले होते. यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेने भापजला धक्का द्यायची तयारी सूरू केली आहे. शिवसेनेने ठाणे विधानसभेची जागा मिळवण्यासाठी मौर्चेबांधणी सुरु केली आहे. शिंदेंच्या या भुमिकेमुळे महायुतीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. (eknath shinde shiv sena meeting for thane vidhan sabha 2024 devendra fadnavis bjp maharashtra politics) 

ADVERTISEMENT

ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. त्यामुळे तो ताब्यात घेण्यासाठी शिंदेकडून प्रयत्न सुरु आहेत. खरं तर लोकसभा निवडणुकीत शिंदेसेनेने ठाणे आणि कल्याणची जागा जिंकून जिल्ह्यावर आपला वरचष्मा दाखवला होता. त्यामुळे आता विधानसभेतही ठाण्याची जागा मिळवण्यासाठी शिंदेसेनेच्या जोरबैठका सुरु आहेत. 

हे ही वाचा : रवींद्र वायकर घोटाळ्यातून सुटले! पोलिसांच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक कारण

विधानसभा निवडणुकीतही लोकसभेत मिळवलेल्या मतांचा फायदा घेण्यासाठी शिवसेनेकडून रणनिती आखली जात आहे. कोपरी पाचपाखाडी आणि ओवळा माजिवाडा हे दोन मतदारसंघ शिंदे सेनेकडे आहेत. आता ठाणे आपला हातात घेण्यासाठी शिंदेसेनेकडून व्युहरचना आखली जात आहे. 

हे वाचलं का?

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर आता शिंदेसेनेकडून ठाणे विधानसभेवर आपला दावा पुन्हा मजबुत करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापासून मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. शिंदेंच्या शिवसेनेच्या या भुमिकेने भाजपला मोठा धक्का बसणार आहे.

दरम्यान 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजप एकमेकांच्या विरोधात लढले होते. संजय केळकर विरूद्ध शिवसेनेचे रवींद्र फाटक यांच्यात लढत झाली होती. या लढतीत केळकर यांनी फाटक यांचा पराभव करत शिवसेनेचा बालेकिल्ला सर केला होता. 

ADVERTISEMENT

तसेच 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने मनसेच्या अविनाश जाधव यांना छुपा पाठिंबा देत केळकरांना पाडण्यासाठी खेळी केली होती. मात्र तरी देखील केळकरांनी विजय मिळवला होता. त्यानंतर आमदार झाल्यापासून केळकरांनी विकासाच्या मुद्यावरून शिवसेनेला लक्ष्य केले होते. 

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Vidhan Parishad Election : मविआ विरुद्ध महायुती... कुणाचा उमेदवार पडणार? 

पण सध्या एकनाथ शिंदेंची शिवसेना महायुतीत आल्यापासून केळकर थोडेस मवाळ झाले आहेत. मात्र अधुन मधून बेकायदा बांधकाम, हुक्का पार्लर आणि नालेसफाईचे मुद्दे काढून एकनाथ शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच आता संजय केळकरांची जागा ताब्यात घेण्यासाठी शिंदेंनी हालचाली सुरु केल्या आहेत. या संदर्भात मौर्चेबांधणीही सुरु केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT