'फरार आरोपी कृष्णा आंधळे सापडला...', सुरेश धसांना फोन आला, पोलीस जागेवर पोहोचताच घडलं असं काही...
Krishna Andhale Latest News: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार असून पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागलेला नाहीय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

फरार आरोपी कृष्णा आंधळे सापडला?

सुरेश धस यांना फोन आला अन् पोलिसही चक्रावले

कृष्णा आंधळेबाबत कोणी दिली खोटी माहिती?
Krishna Andhale Latest News: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार असून पोलिसांना त्याचा ठावठिकाणा लागलेला नाहीय. परंतु, बाबूराव बारगजे नावाच्या व्यक्तीनं भाजप आमदार सुरेश धस यांना फोन करून कृष्णा आंधळे सापडल्याची माहिती दिली आणि त्यांना पाच हजारांचा गंडा घातला. या व्यक्तीनं फसवणूकच केली नाही, तर धस यांच्यासह पोलिसांनाही कृष्णा आंधळेची चार तास वाट पाहायला लावली. फरार कृष्णा आंधळे सापडल्याचा धस यांना फोन आल्यानंतर नेमकं घडलं तरी काय? जाणून घ्या सविस्तर माहिती.
मिळालेल्या माहितीनुसार, फरार आरोपी कृष्णा आंधळे सापडल्याचा दावा करत एका व्यक्तीने सुरेश धस यांन पाच हजारांना गंडा घातला. निश्चित ठिकाणी आरोपीला घेऊन येतोय, अशी खात्री त्यान व्यक्तीने सुरेश धस यांना दिली होती. बाबूराव बारगजे नावाच्या व्यक्तीनं सुरेश धस यांना फोन केला होता. त्यानं सांगितलं की फरार कृष्णा आंधळे सापडलाय. त्याला तुमच्याकडे टॅक्सीने घेऊन येतो. मला यासाठी पैसै लागतील. त्यानंतर धसांनी त्या व्यक्तीला पाच हजार रुपये ट्रान्सफर केले. त्या व्यक्तीनं सांगितलेल्या ठिकाणी धस पोलिसांसह पोहोचले. धस यांच्यासह पोलिसांनी जवळपास चाडेचार तास वाट पाहिली. परंतु, ना कोणता व्यक्ती..ना कृष्णा आंधळे तिथे पोहोचला. धस यांना फसवणूक झाल्याचं कळताच त्यांनी खासदार बजरंग सोनावणेंना सर्व माहिती सांगितली. बाबूराव बारगजे नावाच्या याच व्यक्तींना आपल्यालाही फसवल्याचा प्रयत्न केल्याचं सोनावणे यांनी सांगितलं.
हे ही वाचा >> अरेरे.. गटाराच्या पाण्यात धुतली मेथी, VIDEO पाहून तुम्हालाही येईल किळस
दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील आरोपी कृष्णा आंधळे पाहिजे आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली होती. 9 डिसेंबरला मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून कृष्णा आंधळे पोलिसांना सापडलेला नाही. या प्रकरणातले इतर आरोपी पोलिसांना सापडले, कृष्णा आंधळेला पोलीस शोधू शकलेले नाही, त्यामुळे राजकीय वर्तुळान अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. कृष्णा आंधळेला शोधण्यात पोलिसांना अपयश का येत आहे? तो फरार आहे त्याच्या मृत्यू झालाय? असा सवाल विरोधक उपस्थित करत आहेत.