Vidhan Parishad Election : "माझी पक्षातून हकालपट्टी करा, पण आधी...", आमदार खोसकर संतापले

मुंबई तक

ADVERTISEMENT

मिलिंद नार्वेकरांना काँग्रेसने सात मते दिली, त्यातील एक मत फुटल्याचा गौप्यस्फोट हिरामण खोसकर यांनी केला आहे.
हिरामण खोसकर क्रॉस व्होटिंगच्या आरोपांवर काय बोलले?
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची मते फुटली

point

हिरामण खोसकर यांनी आरोपांवर सोडले मौन

point

मिलिंद नार्वेकरांना काँग्रेसची किती मते मिळाली?

Hiraman Khoskar MLC Election 2024 : काँग्रेसची आठ मते विधान परिषद निवडणुकीत फुटली. त्यानंतर आता काँग्रेसच्या कोणत्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले, याभोवती चर्चा सुरू झाली आहे. यात आमदार हिरामण खोसकर यांच्या नावाचाही समावेश आहे. आमदार खोसकर यांनीच या सगळ्यांवर आता भाष्य केले आहे. 

हिरामण खोसकर क्रॉस व्होटिंग केल्याच्या आरोपावर काय बोलले?

क्रॉस व्होटिंग केल्याच्या आरोपावर आमदार खोसकर यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे. खोसकर मतदानाच्या प्रक्रियेबद्दल माहिती देतानाच काँग्रेस नेत्यांना मतदानाची तपासणी करण्याची विनंती केली आहे.

हेही वाचा >> Opinion Poll : विधानसभेतही महायुतीला बसणार झटका, 'मविआ'चं काय? 

खोसकर म्हणाले, "दोन दिवसांपासून मीडियाच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून माझी बदनामी चालली आहे. ती कुठेतरी थांबली पाहिजे. वरिष्ठांनी थांबवली पाहिजे. विधान परिषदेचे मतदान आम्हाला ठरवून दिले होते."

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> भाषण करत असतानाच ट्रम्प यांच्यावर झाडल्या गोळ्या, बघा व्हिडीओ

"काँग्रेसचे सात मतदान हे मिलिंद नार्वेकरांना करायचे आणि उर्वरित मतदान हे जयंत पाटील यांना करायचे असे आम्हाला सांगितले होते. नाना पटोले आणि तर काही जण आम्ही गेलो आणि मतदान केले."

काँग्रेसचे एक मत कुणाचे फुटले? खोसकर यांचा सवाल

आमदार खोसकर यांनी म्हटले आहे की, "उद्धव ठाकरेंचे १६ आणि काँग्रेसचे ७ असे २३ मते होतात. पहिल्या पसंतीचे एक मत कुणाचे फुटले? वरिष्ठांनी न्यायालयाचे आदेश घेऊन मतदान तपासले पाहिजे. मला मराठीतून मतदान करायला लावले. मी मराठीतून मतदान केले."

ADVERTISEMENT

हेही वाचा >> Vidhan Parishad Election : क्रॉस व्होटिंग करणारे काँग्रेसचे 'ते' आठ आमदार कोण? 

"पहिल्या पसंतीचे मत मी मिलिंद नार्वेकरांना दिले. दुसऱ्या पसंतीचे मत मी जयंत पाटलांना दिले आणि तिसऱ्या पसंतीचे मत प्रज्ञा सातव यांना दिले. मी व्यवस्थित मतदान केलेले आहे. माझी बदनामी सुरू आहे. ती चुकीची आहे. जे आमदार फुटले, त्यांच्यावर त्यांनी कारवाई करावी. पण, त्यांना कुणी बोलत नाही. यांची ताकद नाही त्या आमदारांना बोलण्याची", अशा शब्दात खोसकरांनी काँग्रेसच्या नेत्यांना सुनावले आहे. 

ADVERTISEMENT

माझी पक्षातून हकालपट्टी करा, पण आधी..., खोसकर काय म्हणाले?

"माझ्यासारखा गरीब कार्यकर्ता... नाना पटोले असतील, वरिष्ठ असतील, त्यांनी कुठेतरी हे थांबवलं पाहिजे. माझ्यावर कारवाई करायची, तर जरुर करा. माझी पक्षातून हकालपट्टी करा. परंतू आधी मतदान चेक करा", असे भूमिका हिरामण खोसकर यांनी मांडली आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT