Ravindra Waikar : अमोल कीर्तिकर 1 मताने होते आघाडीवर, मग 48 मतांनी कसे झाले पराभूत?

भागवत हिरेकर

ADVERTISEMENT

अमोल कीर्तिकर यांचा रवींद्र वायकर यांनी 48 मतांनी पराभव केला.
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात रवींद्र वायकर यांनी अमोल कीर्तिकर यांचा पराभव केला.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकाल वाद

point

अमोल कीर्तिकर यांना नक्की किती मते मिळाली?

point

रवींद्र वायकर यांना किती टपाली मते मिळाली?

Mumbai North West Lok Sabha Ravindra Waikar : उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचा निकाल राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे रवींद्र वायकर हे अवघ्या 48 मतांनी विजयी झाले. दुसरीकडे ईव्हीएमच्या सर्व फेऱ्यांअंती 1 मताने आघाडीवर असलेल्या अमोल कीर्तिकर यांचा पराभव झाला. त्यामुळे एका मताने आघाडीवर असलेले कीर्तिकर 48 मतांनी कसे पराभूत झाले, हे जाणून घेणे महत्त्वाचे. (Mumbai North West Lok Sabha Result Controversy Detail story)

ADVERTISEMENT

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकाल 2024
विधानसभा मतदारसंघ अमोल कीर्तिकर मते रवींद्र वायकर मते मताधिक्य
जोगेश्वरी पूर्व 83409 72118 11291
दिंडोशी 77469 75768 1701
गोरेगाव 70562 94304 23742
वर्सोवा 80487 59397 21090
अंधेरी पश्चिम 70522 70743 221
अंधेरी पूर्व 68646 78764 10118
टपाली मते 1501 1550 49
एकूण मते 452596 452644 48

अमोल कीर्तिकर 1 मताने होते पुढे

मतमोजणीची सुरूवात टपाल मतांच्या मतमोजणी होते. त्यानंतर ईव्हीएमची मते मोजली जातात. वरील तक्त्यावर नजर टाकली तर अमोल कीर्तिकर यांना ईव्हीएम मतमोजणीत 451,095 मते मिळाली. तर रवींद्र वायकर यांना 451,094 मते मिळाली. 

टपाली मतांनी निकाल बदलला

ईव्हीएम मतमोजणीनंतर कीर्तिकर यांनी 1 मताने आघाडी घेतली होती. त्यानंतर टपाली मतांसह एकूण मते जाहीर करण्यात आली. सर्व मतमोजणीनंतर वायकर यांना 452644 मते मिळाली, तर कीर्तिकर यांना 452596 मते मिळाली.

हे वाचलं का?

हेही वाचा >> वायकरांच्या मेहुण्याकडे खरंच ईव्हीएम अनलॉक करणारा मोबाईल होता का?

वायकर यांना 1550 टपाली मते मिळाली, तर कीर्तिकर यांना 1501 टपाली मते मिळाली. त्यामुळे 1 मताने आघाडीवर असलेले कीर्तिकर 48 मतांनी पिछाडीवर पडले आणि वायकर विजयी झाले. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT