'हम होंगे कंगाल एक दिन...', कुणाल कामराने शेअर केलेलं नवं गाणं जसंच्या तसं!
कुणाल कामरा याने नवं गाणं शेअर करत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर पुन्हा एकदा टीका केली आहे. पाहा कुणाल कामराचं नवं गाणं.
ADVERTISEMENT

Kunal Kamra New Video: मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विंडबन गीत तयार करून टीका केल्याने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा हा प्रचंड चर्चेत आला. कारण त्याच्या याच गाण्यामुळे शिंदेंच्या शिवसैनिकांनी तुफान राडा केला. मुंबईतील एका स्टुडिओची तोडफोड करून शिवसैनिकांनी कामराविरोधात संताप व्यक्त केला. दरम्यान, या घटनेनंतरही आपण माफी मागणार नाही असं कुणाल कामराने स्पष्ट केलं. तो एवढ्यावरच थांबला नाही. तर त्याने आज (25 मार्च) आणखी एक विडंबन गीताचा व्हिडिओ अपलोड करत कालच्या राड्यावरून शिवसेनेला पुन्हा डिवचलं आहे.
दरम्यान, कुणाल कामरा याच्यावर पोलिसात गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र, असं असतानाही कुणालने पुन्हा एकदा नवा व्हिडिओ अपलोड केला आहे.
हे ही वाचा>> 'मन मैं नथुराम, हरकते...' कुणाल कामराने पुन्हा शेअर केला नवा VIDEO, शिंदेंच्या सेनेला आणखी डिवचलं
कुणाल कामराने शेअर केलेल्या नव्या Video मधील गाणं जसंच्या तसं
विकसित भारत का एक और अँथम..
हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल
हम होंगे कंगाल एक दिन..
मन मैं अंधविश्वास
देश का सत्यानाश
हम होंगे कंगाल एक दिन..
होंगे नंगे चारो और,
करेंगे दंगे चारो और...
पुलिस के पंगे चारो और,
एक दिन...
मन मैं नथुराम
हरकते आसाराम...
हम होंगे कंगाल एक दिन..
होगा गाय का प्रचार,
लेके हाथों में हथियार
होगा संघ का शिष्टाचार...
एक दिन..
जनता बेरोजगार
गरीबी की कगार
हम होंगे कंगाल एक दिन
या गाण्यासह कुणाल कामराने काल शिवसैनिकांनी स्टुडिओमध्ये जी तोडफोड केली त्याचे फोटो आणि व्हिडिओ जोडले आहेत. यासोबतच शिवसेनेचे नेते राहुल कनाल यांच्यावरही बोचरी टीका केली आहे.
हे ही वाचा>> Eknath Shinde : कुणाल कामरावर पहिल्यांदाच बोलले, एकनाथ शिंदे म्हणाले 'त्या' तोडफोडीचं समर्थन नाही, पण...
या नव्या व्हिडिओमुळे कामरावरील कायदेशीर कारवाईचा धोका वाढला आहे. यापूर्वीच त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 353(1)(ब), 353(2) आणि 356(2) अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. आता या नव्या व्हिडिओनंतर आणखी तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी त्याला चौकशीसाठी समन्स बजावलं होतं, परंतु तो सध्या पॉन्डिचेरी येथे असल्याचं सांगितलं जात आहे.