Vidhan Parishad election : 'शरद पवारांचेच मत फुटले', जयंत पाटलांच्या पराभवाचे कारण समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील आणि शरद पवार.
विधान परिषद निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर जयंत पाटलांचा स्फोटक दावा
social share
google news

बातम्या हायलाइट

point

विधान परिषद निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जयंत पाटलांचा मोठा दावा

point

मानसिंग नाईक यांनी मतदान केले नसल्याचा पाटलांचा स्फोटक दावा

point

काँग्रेसने पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीची मते दिली नसल्याची खंत

Vidhan Parishad election 2024 : शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पाठिंब्यावर विधान परिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. पण, नेहमीप्रमाणे बेरजेचं राजकारण पाटलांना जमलं नाही आणि पराभवाला सामोरे जावे लागले. यात महत्त्वाची बाब म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचेच मते फुटल्याचे समोर आले आहे. स्वतः जयंत पाटील यांनीच याबद्दल भाष्य केले आहे. (Why Did Jayant Patil Defeated in Maharashtra Legislative council election 2024)

ADVERTISEMENT

शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एक मिळाले नाही -जयंत पाटील

विधान परिषद निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर जयंत पाटील हे शनिवारी (13 जुलै) शरद प पवार यांच्या भेटीला गेले होते. प्रकृती बरी नसल्याने त्यांची भेट झाली नाही. पण, यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एक मत फुटल्याचा स्फोटक दावा केला.

हेही वाचा >> "जे आमदार फुटले त्यांची नावे आज...", जितेंद्र आव्हाडांच्या पोस्टने खळबळ 

जयंत पाटील म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेसच्या १२ मतांवर उभा होतो. त्यातील एक मत फुटले. आमचीही मते फुटली. मला जर चार मते मिळाली असती, तर दुसऱ्या पसंतीच्या मोजणीत मी 25 ते 30 मते आणखी घेऊन निवडून आलो असतो. तेच गणित होते."

हे वाचलं का?

जयंत पाटील काँग्रेसवर नाराज

काँग्रेसबद्दल जयंत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, "दुसऱ्या पसंतीची मते काँग्रेसने समान वाटली असती किंवा पहिल्या पसंतीची काही मते दिली असती, तर निकाल बरोबर लागला असता. मी 14 मते घेऊनच निवडणूक लढलो होतो, पण हे नाटक बदलले. यावर मी बोलेन", असे सांगत जयंत पाटलांनी काँग्रेसबद्दलची नाराजी बोलून दाखवली.

 

ADVERTISEMENT

शरद पवारांचा कोणता आमदार फुटला? जयंत पाटलांनी थेट नावच घेतलं

"शरद पवारांच्या गटाची 11 मते होती. 12वे मत हे मानसिंग नाईकांचं होतं. ते आले नाही. आयत्या वेळी आले. ते आयत्या वेळी का आले, माहिती नाही. ते 12वे मत आम्ही धरले होते की, आमच्याकडे असेल. ते मतदानाला पण आमच्याकडूनच गेले. बैठकीलाही प्रत्येक वेळी आमच्याबरोबर आले. पण, मत दिलेले दिसत नाही. ज्यांची मते दिली होती, त्याचा कोड दिला होता. ते आम्ही बघितले. कळते कोणी दिले आणि कोणी दिले नाही ते", असे सांगत जयंत पाटील यांनी मानसिक नाईकांनी मत दिले नसल्याचा स्फोटक खुलासा केला. 

ADVERTISEMENT

 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT