Jitendra Awhad : 'शरद पवारांना मी रडताना पाहिलंय', आव्हाडांचा कंठ दाटला
Jitendra Awhad on Sharad Pawar : 'मी त्यांना (शरद पवारांना) रडताना बघितलं आहे, मी बघितलेत त्यांच्या डोळ्यातले अश्रू, तो माणूस इतका स्वत:ला कब्जात ठेवतो', असे विधान शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी केले आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
'मी शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू बघितले'
आम्हाला शरद पवारांना सोडावेसेच वाटत नाही
हे सेक्युलर मनाने पण नाहीत आणि स्वभावाने पण नाहीत
Jitendra Awhad on Sharad Pawar : अभिजीत करंडे,मुंबई : 'मी त्यांना (शरद पवारांना) रडताना बघितलं आहे, मी बघितलेत त्यांच्या डोळ्यातले अश्रू, तो माणूस इतका स्वत:ला कब्जात ठेवतो', असे विधान शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)यांनी केले आहे. या संबंधित सांगलीतील भाषणाचा एक किस्सा देखील आव्हाडांनी सांगितला. (jitendra awhad criticize ajit pawar ncp sharad pawar ncp political crisis maharashtra politics)
ADVERTISEMENT
मुंबई तकचे वरिष्ठ पत्रकार अभिजीत करंडे यांनी जितेंद्र आव्हाड यांची रोखठोक मुलाखत घेतली होती. या मुलाखतीत आव्हाडांनी शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू पाहिल्याचा किस्सा सांगितला. 'सांगलीच्या एका भाषणात मी भावनिक बोललो होतो. त्यावेळी 'मी त्यांना (शरद पवारांना) रडताना बघितलं आहे, मी बघितलेत त्यांच्या डोळ्यातले अश्रू, तो माणूस इतका स्वत:ला कब्जात ठेवतो'. त्यावेळी शरद पवारांच्या डोळ्यांच्या कडाला अश्रू दिसले होते, त्यांनी ते दाबून बाजूला केल्याचे देखील आव्हाड यांनी यावेळी सांगितले. तो माणूस संवेदनशील आहे, संवेदनशील होता म्हणून लातूरच्या भुकंपामध्ये 45 दिवस तिथे उभं राहून त्यांनी घरं उभी केली. ज्यावेळेस बॉम्बब्लास्ट झाला, त्यावेळी ते प्रत्येक ठिकाणी गेले. तेही संवेदनशील आहे, असे आव्हाडांनी सांगितले.
हे ही वाचा : Lok Sabha Election 2024 : 'शिवसेना भाजपच्या दावणीला बांधलेली चालणार नाही'
'अजित पवारांच्या आरोपांना शुन्य किंमत देतो'
दरम्यान अजित पवारांच्या आरोपावर बोलताना आव्हाड म्हणाले की, अजित पवार काय आरोप करतात याला मी शुन्य किंमत देतो. त्याच्या गटालाही मी शुन्य किंमत देतो, माझ्या भाषेत सांगायचं झालं तर 'चल हवा येऊ दे'!. मी कायम संघटनेत राहिलो आणि सत्तेच्या बाजूने कधी गेलोच नाही. त्यामुळे आम्ही संघटनेतून आलो असल्या कारणाने आम्हाला शरद पवारांना सोडावेसेच वाटत नाही. पण अजित पवारांनी कायम सत्ता उपभोगली ते कधीच संघटनेत आले नाही,अशी टीका देखील आव्हाडांनी अजित पवारांवर केली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
'तुम्ही सेक्युलर आहात ना मग...'
जर तुम्ही सेक्युलर आहात ना मग बोला... 1993 साली कार्याधीशच्या कार्यालयावरीत तिरंगा लागत नव्हता, त्याचा आम्ही निषेध करतो. ऑर्गनायझेशनमध्ये 1950 साली जे छापून आले त्याचा आम्ही निषेध करतो, उत्तर प्रदेशात जे आज चालू आहे, ते आम्हाला मान्य नाही. मुख्यमंत्री हाजी मलंग दर्ग्यावर बोलून गेले ते आम्हाला मान्य नाही, बोला ना, असे आव्हानच आव्हाडांनी अजित पवारांना दिले. तसेच हे सेक्युलर मनाने पण नाहीत आणि स्वभावाने पण नाहीत, त्यांच्याकडे सेक्युलर असण्याचा वैचारीक अधिष्ठाण पण नाही, असा हल्ला देखील आव्हाडांनी चढवला.
हे ही वाचा : उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीवर शिक्कामोर्तब! काँग्रेस किती जागा लढवणार?
'मला माहिती आहे ना,मी भाषण करायचं तेव्हा (अजित पवार) मला काय म्हणायचे, तुझ्यामुळे मत खराब होतात. पण शरद पवारांनी मला कधीच सांगितलं नाही तुझी भूमिका बदल, पुरंदरेच्या बाबतीत मला जबरदस्ती करण्यात आली होती, तु माघार घे, तु ताबडतोब पुरंदरेची माफी माग. पण शरद पवारांनी सरळ सांगितलं, तो अभ्यासाचा विषय आहे, त्याचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, काही माफी वगैरे मागायची नाही. तु तूझी लढाई अभ्यासावर करत आहेस, ती करत राहा, हे शरद पवार आहेत' असे जितेंद्र आव्हाडांनी सांगितले.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT