Maharashtra budget 2024: शिंदे सरकार महिलांना देणार दर महिन्याला 'एवढे' पैसे, मोठ्या योजनेची घोषणा
अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली. जाणून घ्या या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा किती रुपये मिळणार आहेत?
ADVERTISEMENT
Maharashtra Budget 2024 Ajit Pawar: मुंबई: विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर राज्यातील शिंदे सरकारमधील अर्थमंत्री अजित पवार यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना एका मोठ्या योजनेची घोषणा केली आहे. जी सरकारसाठी गेमचेंजर ठरू शकते. ही योजना म्हणजे मु्ख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. ज्यामध्ये महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणार आहेत. (maharashtra budget 2024 finance minister ajit pawar announced mukhamantri majhi ladki bahin yojana government will give rs 1500 per month to women)
ADVERTISEMENT
2024-25 वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली.मागील काही दिवसांपासून या योजनेची चर्चा होती. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत लाडली बहना ही योजना गेमचेंजर ठरली होती. ज्यामुळे तिथे भाजप पुन्हा सत्तेत आली. असं असताना आता अशाच प्रकारची योजना शिंदे सरकारने अंमलात आणण्याचा विचार केला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर करताना अर्थमंत्री नेमकं काय म्हणाले?
स्त्री समाजाचा केंद्रबिंदू होत आहे. महिला कुटुंब आणि अर्थार्जन अशा दोन्ही पातळीवर महिला काम करत आहेत. लेकी-बहिणींसाठी मु्ख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे. महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन, आरोग्य आणि पोषणासहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत वय २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा १५०० रुपये प्रदान करण्यात येतील. मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी दरवर्षी ४६ हजार कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. योजनेची अंमलबजावणी जुलै २०२४ पासून करण्यात येईल.
'आपल्या शासनाने सन-२०२३-२४ पासून लेक लाडकी योजना सुरू केली आहे.'
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
'अंतरिम अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वंयरोजगार निर्मिती तसेच सुरक्षित प्रवासासाठी पिंक ई-रिक्षा योजनेची घोषणा केली होती. राज्यातील १७ शहरात १० हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात येईल.' अशी घोषणा अजित पवार यांनी केलं.
महिलांना नेमके किती पैसे मिळणार, कधीपासून सुरू होणार योजना?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेमध्ये वय 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये प्रदान करण्यात येतील. जुलै 2024 पासून ही योजना लागू करण्यात येईल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT