Vidhan Parishad Election : मविआ विरुद्ध महायुती... कुणाचा उमेदवार पडणार? 

मुंबई तक

ADVERTISEMENT

विधान परिषद निवडणुकीत कोण जिंकणार यापेक्षा पराभूत होणारा एक उमेदवार कोण? याची चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागांसाठी निवडणूक होत असून, १२ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महायुतीचे ९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

point

महाविकास आघाडीकडून तीन जणांना उमेदवारी

point

विधान परिषद निवडणुकीत मोठी चुरस

Maharashtra vidhan parishad election : 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरल्याने विधान परिषदेच्या निवडणुकीची चुरस वाढली आहे. महायुतीचे 9 उमेदवार, तर महाविकास आघाडीचे 3 उमेदवार रिंगणात आहेत. जागा 11 आणि उमेदवार 12 अशी स्थिती असल्याने पराभूत होणारा तो एक उमेदवार कोण असेल, याबद्दल राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. (9 candidates of Mahayuti and 3 candidates of Mahavikas Aghadi are contesting the Maharashtra Legislative Council elections 2024)

ADVERTISEMENT

भाजपने 5, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी 2 असे महायुतीने 9 उमेदवार विधान परिषद निवडणुकीत उतरवले आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीचेही 3 उमेदवार (काँग्रेस 1, शिवसेना UBT 1, आणि शेकाप 1) निवडणूक लढवत आहेत. त्यामुळेच या निवडणुकीची चुरस वाढली असून, आमदारांची फोडाफोडी होणार, हे जवळपास निश्चित असल्याचे राजकीय वर्तुळात खासगी सांगितले जात आहे. 

Vidhan Parishad Election : विधानसभेतील संख्याबळ किती?

भाजप

हे वाचलं का?

103 + अपक्ष आणि मित्रपक्ष 8 = 111
23 x 5 = 115 (-4)

शिवसेना शिंदे

ADVERTISEMENT

38 + 7 अपक्ष + बच्चू कडू 2 = 47
23 x 2 = 46 (+1)

ADVERTISEMENT

राष्ट्रवादी काँग्रेस 
39
23 x 2 = 46 (-7)

काँग्रेस 
37 
23 x 1 = 23 (+14) 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार
13

हेही वाचा >> रवींद्र वायकर घोटाळ्यातून सुटले! पोलिसांच्या रिपोर्टमध्ये धक्कादायक कारण 

शेकाप 
1
23 x 1 = 23 (-22) 

शिवसेना ठाकरे 
15
23 x 1 = 23 (-8)

छोटे पक्ष -

एमआयएम : 2
समाजवादी पार्टी : 2
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी : 1
क्रांतिकारी शेतकरी पक्ष : 1
मनसे : 1

maharashtra vidhan sabha members 2024 party wise
महाराष्ट्र विधानसभेतील पक्षनिहाय आमदारांची संख्या

23 मतांचा कोटा... सगळ्यांकडे अपुरे संख्याबळ

काँग्रेस सोडली तर आज स्थितीत एकाही पक्षाकडे त्यांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आवश्यक मते नाहीत. 5 उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला 4 मतांची गरज लागेल. शिंदेंच्या शिवसेनेला अपक्ष आणि बच्चू कडूंनी मदत केली, तर त्यांचे दोन उमेदवार निवडून येऊ शकतात. त्यामुळे शिंदेंनाही मतांची जुळवा जुळव करावी लागणार आहे.

हेही वाचा >> Mazi ladki bahin yojana : एक रुपयाही खर्च न करता घरीच भरा अर्ज! 

दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही उमेदवार निवडून आणण्यासाठी 7 मतांची गरज लागणार आहे. ठाकरेंकडेही 15 मते असून मिलिंद नार्वेकरांना निवडून आणण्यासाठी ठाकरेंना 8-9 मतांची तजवीज करावी लागणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जयंत पाटील यांना पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीला जिंकण्यासाठी ताकद पणाला लावावी लागणार आहे. 

राजकीय वर्तुळात चर्चा काय?

लोकसभा निवडणुकीत महायुतीला झटका बसला. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांमध्ये चलबिचल आहे. यातील काही आमदार ठाकरे आणि पवारांकडे येण्याच्या प्रयत्नात असल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून याला दुजोराही दिला गेला आहे.

हेही वाचा >> मोदींनंतर कोण होणार पंतप्रधान, जोतिषशास्त्राने सांगितला वारसदार 

विधानसभा निवडणुकीच्या आधी हे उमेदवार परत येऊ शकतात. त्यामुळे हे आमदार महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे गुप्त मतदान असल्याने मतांची फोडाफोडी जास्त होणार असल्याची स्थिती असून, यात १२ पैकी एका उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागणार आहे.
 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT