Manoj jarange : 'देवेंद्र फडणवीसांना माझं एन्काऊंटर करायचंय', जरांगेंचा गृहमंत्र्यांवर गंभीर आरोप

मुंबई तक

Manoj jarange patil big allegation on Devendra fadnavis : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उप मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'देवेंद्र फडणवीसांना माझं एन्काऊंटर करायचंय', असा खळबळजनक आरोप जरांगेनी फडणवीसांवर केला आहे.

ADVERTISEMENT

manoj jarange patil big allegation on devendra fadnavis maratha reservation ajay bawaskar maharaj cm eknath shinde
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उप मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'देवेंद्र फडणवीसांना माझं एन्काऊंटर करायचंय', असा खळबळजनक आरोप जरांगेनी फडणवीसांवर केला आहे.
social share
google news

Manoj jarange patil big allegation on Devendra fadnavis : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्याचे उप मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'देवेंद्र फडणवीसांना माझं एन्काऊंटर करायचंय', असा खळबळजनक आरोप जरांगेनी फडणवीसांवर केला आहे. तसेस 'हे सगळं देवेंद्र फडणवीस करतोय आणि तुला इतकीच खुमी आहे तर मैदानात ये असे आव्हान देखील जरांगेनी (Manoj jarange patil) फडणवीसांना (Devendra fadnavis)  दिले आहे. (manoj jarange patil big allegation on devendra fadnavis maratha reservation ajay bawaskar maharaj cm eknath shinde) 

मराठा आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीतून बोलताना जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसावर जोरदार हल्ला चढवला आहे.  "मी कुठल्याच पक्षाचा नाही किंवा कोणत्याच पक्षासाठी काम करत नाही. उद्धव ठाकरेंचे सरकार होते त्यावेळीही मी त्यांना बोललो होतो. तेही कठोर भाषेत. आता यांचं आहे आणि मी बोललो आहे, असे जरांगेनी यावेळी स्पष्ट केले. 

हे ही वाचा : ''वंचित'महाविकास आघाडीचाच एक घटक', राऊतांनी स्पष्टच सांगितलं...

तसेच समाजापुढे कुणाचाही मुलाइजा मी ठेवत नाही. पण, नेमकं झालंय असं सरकारने 10 टक्के आरक्षण दिलं आहे. आणि आपण मागतोय ओबीसीतून सरसकट आरक्षण. मराठा कुणबी एकच हे सिद्ध झालं आहे, असे जरांगेंनी यावेळी सांगितले.

हे सगळं करतोय ते फक्त देवेंद्र फडणवीस. मराठ्यांचा दरारा पुन्हा निर्माण झाला आहे आणि हा दरारा संपवण्याचं त्यांचं स्वप्न आहे. संपवायचं तर मराठ्याच्याच हाताने संपवायचं. यात एकनाथ शिंदेंचेही दोन-चार लोक आहेत. अजित पवारांचेही दोन आमदार आहेत, असा खळबळजनक आरोप जरांगे पाटलांनी केला आहे. 

सगेसोयरेचं होऊ देत नाहीत आणि 10 टक्के मराठ्यांवर लादायचं काहीही करू आणि हे पोरग (मनोज जरांगे) होऊ देत नाही. हे पोरग इथेच संपलं पाहिजे नाहीतर याचा गेम तरी करावा लागेल. नसता याला बदनाम तरी करावं लागेल किंवा उपोषणात मरू द्यावं लागेल. सलाईनमधून विष देऊन तरी... म्हणून मी परवा रात्री सलाईन बंद केलं. याचं एन्काऊंटर तरी करावं लागेल हे देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न आहे, असा गंभीर आरोप देखील जरांगे पाटलांनी यावेळी केला. 

हे ही वाचा : आमदार वायकर ईडीच्या तावडीतून सुटणार? 'बीएमसी'चा यू-टर्न

देवेंद्र फडणवीसला एवढीच खुमखुमी आहे ना, तर बैठक संपल्यावर मी सागर बंगल्यावर येतो, मला मारून दाखव. तुला माझा बळी घ्यायचा ना... तुला माझा बळी पाहिजे ना, मी सागर बंगल्यावर येतो घे माझा बळी, पण समाजासोबतची ईमानदारी मी नाही विकू शकत, असे जरांगे पाटलांनी ठणकावून सांगितले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp