Manoj Jarange : महायुतीला धसका! विधानसभेआधी जरांगेंचा क्लिअर 'मेसेज'

ADVERTISEMENT

मनोज जरांगे पाटील यांनी शिंदे सरकारला १३ जुलैपर्यंतची वेळ दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेले उपोषण स्थगित केले आहे.
social share
google news

Manoj Jarange Patil News : मनोज जरांगे पाटील यांनी महिनाभराचा वेळ देताना शिंदे सरकारचं टेन्शन वाढवून ठेवलं आहे. ८ जून रोजी उपोषणाला बसलेल्या जरांगे पाटलांनी १३ जून रोजी उपोषण स्थगित केले. मागण्या झाल्या नाही, तर विधानसभा निवडणुकीत उडी घेणार आणि नाव घेऊन उमेदवार पाडणार, असा इशाराच जरांगे पाटलांनी दिला. लोकसभा निवडणुकीत जबर झटका बसलेल्यानंतर आता सत्तेत असलेली महायुती सावध पावलं टाकताना दिसत आहे. (Manoj Jarange patil ultimatum to Shinde Government)

मनोज जरांगे हे उपोषणाला बसल्यानंतर त्यांची सरकार किंवा राज्यातील आणि देशातील लोकप्रतिनिधी जास्त दखल घेताना दिसले. याचं कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीचा निकाल.

हेही वाचा >> 'अमित शाहांना सांगितलेलं शिवसेना पक्ष चिन्ह काढू नका...', राज ठाकरेंचा गौप्यस्फोट 

मराठा आरक्षणाचं केंद्र राहिलेल्या भागात महायुतीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. मराठवाड्यातील आठपैकी तब्बल सात लोकसभा मतदारसंघ महायुतीला गमवावे लागले आहेत. इतकंच काय तर जे लोकसभा मतदारसंघ भाजपचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जात होते. तेही यावेळी ढासळले आहेत.  

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे समजून घेण्यासाठी आठही लोकसभा मतदारसंघातील निकाल बघणे महत्त्वाचे आहे...

1) औरंगाबाद लोकसभा निवडणूक

संदिपान भुमरे 476130 
इम्तियाज जलील 341480
चंद्रकांत खैरे 293450

2) बीड लोकसभा निवडणूक 

बजरंग सोनवणे 683950 
पंकजा मुंडे 677397

ADVERTISEMENT

3) हिंगोली लोकसभा निवडणूक 

नागेश पाटील आष्टीकर 492535 
बाबुराव कदम कोहळीकर 383933
बी.डी. चव्हाण 161814

ADVERTISEMENT

4) जालना लोकसभा निवडणूक 

कल्याण काळे 607897 
रावसाहेब दानवे 497939
मंगेश साबळे 155930

5) लातूर लोकसभा निवडणूक 

शिवाजी काळगे 609021 
सुधाकर श्रृंगारे 547140
नृसिंगराव उदगीरकर 42225

6) नांदेड लोकसभा निवडणूक 

वसंतराव चव्हाण 528894 
प्रतापराव चिखलीकर 469452
अविनाश भोसीकर 92512

7) उस्मानाबाद लोकसभा निवडणूक 

ओमराजे निंबाळकर 748752 
अर्चना पाटील 418906
भाऊसाहेब आंधळकर 33402

8) परभणी लोकसभा निवडणूक 

संजय जाधव 601343  
महादेव जानकर 467282
पंजाबराव डख 95967

आठही लोकसभा मतदारसंघातील निकाल बघितले, तर महायुतीच्या उमेदवाराला मिळालेली मते लक्षात येतात. मराठवाड्यातील औरंगाबाद हा एकमेव मतदारसंघा महायुतीला मिळाला आहे. 

मराठवाड्यातील आठही मतदारसंघातील विजयी उमेदवाराचे मताधिक्य 

औरंगाबाद 134650

बीड 6553

परभणी 134061

उस्मानाबाद 329846

नांदेड 59442

लातूर 61881

जालना 109958

हिंगोली 108602

हेही वाचा >> राज ठाकरेंनी वाढवली भाजपची 'कटकट'! स्वबळावर लढणार 'एवढ्या' जागा

हे तेच मतांचे आकडे आहेत, ज्यामुळे महायुतीची धाकधुक वाढली आहे. कारण महायुतीकडे असलेल्या विधानसभा मतदारसंघातही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मताधिक्य मिळाले आहे. हेच पॅटर्न विधानसभा निवडणुकीत राहिला, महायुतीला प्रचंड नुकसान होऊ शकते. त्यामुळे आता महायुती जरांगेंचे आंदोलन व्यवस्थित हाताळताना दिसत आहे. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT