Member of Parliament Salary: खासदारांना असतो गलेलठ्ठ पगार, पेन्शन किती मिळते?
Member of Parliament Salary and pension: भारतात खासदारांचे मासिक वेतन एक लाख रुपये आहे. 1 एप्रिल 2023 पासून खासदार आणि आमदारांचे वेतन आणि भत्ते दर पाच वर्षांनी 5% वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ADVERTISEMENT
Member of Parliament Salary and pension Details: नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीचे 2024 चे निकाल 4 जून रोजी जाहीर झाले. ज्यामध्ये एनडीएला 293 आणि इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या तर इतरांना 16 जागांवर विजय मिळाला. भारतीय जनता पक्षाने (भाजप) सर्वाधिक 240 जागा जिंकल्या. तर काँग्रेसने 99 जागा जिंकल्या आहेत. आज आम्ही तुम्हाला लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेल्या खासदारांना मिळणाऱ्या सुविधा आणि पगाराबद्दल माहिती देणार आहोत. (members of parliament have a huge salary how much pension do they get know rights powers salary and facilities)
ADVERTISEMENT
खासदाराचे नेमके काम काय?
- कायदे बनवणे: खासदारांचे प्राथमिक काम हे संविधानानुसार कायदे बनवणे आणि त्यात सुधारणा करणे हे आहे.
- सरकारवर लक्ष ठेवणे: सरकारी धोरणे आणि कृतींचे पुनरावलोकन आणि टीका करणे.
- लोकांचा आवाज बुलंद करणे: आपल्या मतदारसंघातील लोकांच्या समस्या संसदेत मांडणे.
- सरकारला सल्ला देणे: राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारला सल्ला देणे.
- आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये सहभाग: आंतरराष्ट्रीय परिषद आणि बैठकांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे.
हे ही वाचा>> Rahul Gandhi : "....तर पंतप्रधान मोदी 2 ते 3 लाख मतांनी हरले असते"
संसद सदस्यांचे अधिकार
- कायदे बनविताना मतदान: संसदेत प्रस्तावित कायद्यांवर मतदान करण्याचा अधिकार.
- वादविवादात भाग घेणे: संसदेतील चर्चेत भाग घेण्याचा अधिकार.
-
सरकारी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारणे : सरकारच्या कामकाजाशी संबंधित प्रश्न विचारण्याचा अधिकार.
खासदाराचे विशेषाधिकार
संसदेच्या दोन्ही सभागृहांना विशेषाधिकार आहेत ज्यानुसार अध्यक्ष किंवा अध्यक्षांच्या परवानगीशिवाय कोणतेही कायदेशीर समन्स, दिवाणी किंवा फौजदारी, संसदेच्या आवारात बजावता येत नाही. तसेच सभापती किंवा अध्यक्षांच्या परवानगीशिवाय संसद भवनाच्या आत कोणालाही अटक करता येत नाही. कारण संसदेच्या आवारात केवळ सभापती किंवा सभागृहाच्या अध्यक्षांच्या आदेशाचे पालन केले जाते. कोणत्याही सरकारी अधिकारी किंवा स्थानिक प्रशासनाच्या आदेशाचे सभागृहात पालन केले जात नाही.
हे ही वाचा>> Modi 3.O: नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राचं नुकसान, नेमकं कसं?
खासदाराच्या अटकेचा नियम
संसद सदस्याच्या अटकेबाबत संसदेच्या नियमांच्या प्रकरण 20A मध्ये तरतूद करण्यात आली आहे. ज्यानुसार कोणत्याही खासदाराला गुन्हेगारी प्रकरणात अटक होऊ शकते. त्यासाठी खासदाराला अटक करण्यासाठी जाणाऱ्या पोलिस किंवा संबंधित एजन्सीला अटकेचे कारण राज्यसभेचे सभापती किंवा लोकसभेच्या अध्यक्षांना सांगावे लागते.
हे वाचलं का?
खासदाराचा पगार
- मूळ वेतन: रु. 1,00,000/- प्रति महिना (01/04/2018 पासून)
- दैनिक भत्ता: रु. 2,000/- (01/10/2010 पासून प्रभावी)
- मतदारसंघ भत्ता: रु. 70,000/- दरमहा
- कार्यालयीन खर्च भत्ता: रु. 60,000/- प्रति महिना (त्यापैकी रु. 20,000/- स्टेशनरी वस्तू इ. आणि टपालासाठी)
- टेलिफोन: दिल्लीतील निवासस्थान, मतदारसंघ निवासस्थान आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी तिन्ही दूरध्वनींवर दरवर्षी 1,50,000 विनामूल्य कॉल
- निवास: भाड्याने मोफत सरकारी निवास (वसतिगृह निवासासह)
- पाणी आणि वीज: प्रति वर्ष 50,000 युनिट वीज (25,000 युनिट प्रत्येक लाईट/वीज मीटर किंवा एकत्र) आणि 4,000 किलोलिटर पाणी प्रति वर्ष (प्रत्येक वर्षी जानेवारीपासून)
- पेन्शन: निवृत्त खासदारांसाठी किमान पेन्शन रु. रु.25,000/- प्रति महिना (01/04/2018 पासून)
- पेन्शनमध्ये टर्मनुसार वाढ: पाच वर्षांपेक्षा पुढील प्रत्येक टर्मसाठी प्रति वर्ष रु. 2,000/- अतिरिक्त पेन्शन
- प्रवास भत्ता: विमान प्रवास, रेल्वे प्रवास, रस्ते प्रवास यासाठी भत्ता
- प्रवास सुविधा: खासदार आणि त्याच्या/तिच्या साथीदार/कुटुंबासाठी रेल्वे पास, विमान प्रवास
- माजी खासदारांसाठी प्रवास सुविधा: मोफत एसी सेकंड क्लास रेल्वे प्रवास
2020 मध्ये कोविड-19 महामारीमुळे खासदारांचे पगार आणि भत्ते एका वर्षासाठी 30% ने कमी करण्यात आले होते. यानंतर 1 एप्रिल 2023 पासून खासदार आणि आमदारांचे वेतन आणि भत्ते दर पाच वर्षांनी 5% वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT