राष्ट्रवादी, काँग्रेसचे अनेक आमदार संपर्कात, पण…; फडणवीसांनी सांगितली प्रवेशाची वेळ
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील काही आमदार भाजपत प्रवेश करण्यासाठी संपर्कात असल्याचे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंबई Tak बैठक’मध्ये दिले.
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील काही आमदार भाजपत प्रवेश करण्यासाठी संपर्कात असल्याचे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंबई Tak बैठक’मध्ये दिले. संपर्कात असलेले आमदार कधी भाजपत येणार याबद्दलची योग्य वेळेचा उल्लेखही देवेंद्र फडणवीस यांनी केला. मुंबई Tak चे संपादक साहिल जोशी यांनी ही मुलाखत घेतली.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस यांना विरोधी पक्षांची एक लाईन तयार होताना दिसत नाही. विरोधकांनी काढलेले सगळे मुद्दे शरद पवारांनी खोडून काढले आहेत. उद्धव ठाकरेंवर टीका करताहेत फडतूस वगैरे शब्द वापरले नाही पाहिजे. चुकीच्या मुद्द्यांवर विरोधी पक्ष पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही स्वतः सांगितलं की, शरद पवारांच्या आशीर्वादाने आणि त्यांना सांगून ही चर्चा सुरू झाली होती. त्यावेळी तुम्ही म्हणाला होता की, अर्धसत्य सांगतोय. आता पूर्ण सत्य सांगून टाका”, असा प्रश्न विचारण्यात आला.
हेही वाचा >> ‘उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणं अशक्य’; देवेंद्र फडणवीसांचं ‘मुंबई Tak बैठक’मध्ये मोठं भाकित
त्यावर फडणवीस म्हणाले, “वेळ यायची आहे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. राजकारणात काहीजण सोबत असतात, काही विरोधक असतात. पण, काही मुद्दे तत्वांशी निगडित असतात. त्यामुळे प्रत्येक गोष्ट कधी सांगायची याची एक योग्य वेळ असते. एखाद्याशी जमलं नाही, म्हणून त्यांना संकोच वाटेल अशा गोष्टी तुम्ही वेळोवेळी बोलू शकत नाही.”
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
“राजकीय संबंध वेगळे असतात. वैयक्तिक संबंध वेगळे असतात. रोज समोरासमोर येतो. तरी महाराष्ट्रात दक्षिणेकडील राज्यासारखी परिस्थिती नाही. कट्टर वैर आपल्याकडे नाही. आम्ही एकमेकांविरुद्ध कितीही बोललो तरी एकमेकांसोबत बोलू शकतो. त्यामुळे असं वाटतं की, उरलेलं अर्धसत्य सांगण्याची वेळ येईल. ती वेळ आली की मी निश्चित सांगेन.”
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे किती आमदार संपर्कात, फडणवीसांनी दिलं उत्तर
‘राज्यात अशी चर्चा सुरू आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही आमदार भाजपमध्ये येणार आहेत. काँग्रेसमधील काही आमदार तुमच्यासोबत येऊ शकतात. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील बहुमत चाचणीला काँग्रेसचे 17 आमदार गैरहजर होते. त्यावरूनही तर्कविर्तक सुरू होते. त्यामुळे माध्यमांचं काम खूप कठीण झालं आहे. तुम्ही असं वागता आणि नंतर माध्यमांना जबाबदार ठरवतात. तुमच्या संपर्कात काही आमदार आहेत का?’ असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला.
ADVERTISEMENT
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, “असं आहे की, संपर्कात नेहमीच असतात. कारण शेवटी मागच्या वर्षात बघितलं तर सत्तारुढ पक्षात काम करत असताना आपण संबंध निर्माण करतो. त्यासंबंधामुळे आणि आपल्या आत्मविश्वासामुळे अनेक लोकसोबत येतात. गेल्या पाच वर्षात अनेक लोक आले. त्यामुळे संपर्कात अनेक लोक आहेत, त्यातील किती लोक येतील हे आज पक्कं सांगता येणार नाही. आमदार संपर्कात असतातच”, असं उत्तर फडणवीसांनी दिलं.
ADVERTISEMENT
याच प्रश्नावर पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, “संपर्काचं नात्यामध्ये परिवर्तन होण्याची वेळ यायची आहे. ही वेळ येईल निवडणुकीच्या तोंडावर.”
अजून लोकांची गरज आहे का लोकांची? त्यावर फडणवीस म्हणाले, “गरज कधीच संपत नसते. असं आहे की आम्ही सक्षम आहोत, पण शेवटी आम्ही प्रयत्न करत राहणार”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ADVERTISEMENT