Supriya Sule: 'भाजप म्हणजे भ्रष्टाचार जुमला पार्टी मॉडेल' सुळेंनी थेट निशाणाच साधला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Supriya Sule Devendra Fadnavis Adarsh scam
Supriya Sule Devendra Fadnavis Adarsh scam
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'भाजप म्हणजे भ्रष्टाचार जुमला पार्टी मॉडेल'

point

'आदर्श घोटाळा भाजपनं उघडकीस आणला' सुळेंनी नेमकं ते सांगितलं

BJP-NCP: भाजपकडून काँग्रेसला जोरदार धक्के दिले जात असतानाच आता पुन्हा एकदा भाजप (BJP) राष्ट्रवादी काँग्रेसला (Nationalist Congress Party) धक्का देणार का असं चित्र निर्माण झालं आहे. एकीकडे काँग्रेसमधून निवडून येत मुख्यमंत्री राहिलेले नेते भाजपमध्ये जात असल्याने दुसरीकडे आता पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा दिग्गज नेताही भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा असतानाच त्यावर खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपकडून आधी नेत्यांवर अनेक आरोप केले जातात, त्यानंतर तोच नेता दुसऱ्या दिवशी भाजपमध्ये गेलेला दिसतो अशा शब्दात सुप्रिया सुळेंनी भाजपचा समाचार घेतला आहे. 

ADVERTISEMENT

गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं

खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका करताना राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत त्यांनी गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे अपयशी ठरल्याची गंभीर टीका त्यांनी त्यांच्यावर केली आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, 'कायदा आणि सुव्यवस्थेबद्दलपण मी अनेक वेळा सांगितलं आहे. त्याच बरोबर मी आणि अमित शाह यांच्याबरोबरसुद्धा त्याबाबत चर्चा केली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून पुणे, नागपूर आणि ठाणे या तीन ठिकाणीही मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याचा आरोपही त्यांनी त्यांच्यावर केला असून हे सगळं गृहमंत्रालयाचे अपयश असल्याचेही त्यांनी सांगितले.

हे ही वाचा >> ठाकरेंच्या सेनेला 'मविआ'मध्ये 18 जागा? नियुक्त्या जाहीर

भाजप जुमला पार्टी

खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले की,' निशिकांत दुबे यांनी अशोक चव्हाण यांच्या विरोधात आरोप केले होते की, आदर्श घोटाळ्यात काही गोष्टी आहेत. आदर्श घोटाळा हा अशोक चव्हाण यांनी केला हे मी नाही बोलत पण हे भाजपकडून सांगितले जात होते. तरीही त्यांना आता भाजपमध्ये घेण्यात आले. त्यामुळे भाजप हे भ्रष्टाचार जुमला पार्टी हे मॉडेल तयार झाले असल्याचा घणाघातही सुप्रिया सुळे यांनी केला आहे. 

हे वाचलं का?

आमच्यामध्ये काही तरी टॅलेंट

खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्याही भाजप प्रवेशाबद्दल सांगितले. जयंत पाटील यांच्या नावाप्रमाणेच बऱ्याच लोकांची रोज चर्चा असते. भाजपकडे 200 आमदार असले तरी त्यांना आमच्याकडचेच लोक त्यांना पाहिजे असतात, त्याचा अर्थ हाच असतो की, आमच्यामध्ये काही तरी टॅलेंट आहे असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला आहे.

हे ही वाचा >> शरद पवारांना बसणार झटका, जवळचा नेता भाजपच्या वाटेवर?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT