Narayan Rane : 'भाजपने 288 जागा लढवाव्या', शिंदे-अजितदादासोबतची युती तोडण्याचा राणेंचा सल्ला?

मुंबई तक

ADVERTISEMENT

narayan rane criticize udhhav thackeray  birthday poster future chief minister maharashtra politics
नारायण राणे यांची पत्रकार परिषद पार पडलीय.
social share
google news

बातम्या हायलाइट

point

मला वाटतं भाजपने 288 जागा लढवाव्यात

point

राणेंच्या विधानानंतर महायुतीत अंतर्गत धुसफूस

point

राज ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत आहे.

Narayan Rane Big Statement : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीने जोरबैठका घ्यायला सुरूवात केली आहे. दोन्ही आघाड्यांकडून मतदार संघाची चाचपणी देखील सुरू आहे. त्यात आता ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी भाजपने (BJP) विधानसभेच्या (Vidhan Sabha Election) 288 जागा लढवाव्यात असे मोठं विधान केले आहे. राणेंच्या या विधानाने महायुतीच्या नेत्यांमध्ये मोठी खळबळ माजली आहे. (narayan rane big statement bjp should contest 288 seat in vidhan sabha mahayuti maharashtra politics) 

नारायण राणे यांची पत्रकार परिषद पार पडलीय.या पत्रकार परिषेदत त्यांनी अनेक मुद्यावर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी पत्रकारांनी विधानसभेत भाजप किती जागा लढणार असा सवाल केला होता. यावर नारायण राणे यांनी मला वाटतं भाजपने 288 जागा लढवाव्यात असे मोठं विधान केले होते. राणेंच्या विधानानंतर महायुतीत अंतर्गत धुसफूस सुरु झाल्याची चर्चा आहे.राज ठाकरेंनी घेतलेल्या निर्णयाचे मी स्वागत आहे. पण त्यांचा हा निर्णय मी पहिल्यांदाच ऐकत असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे. तसेच त्या कोणत्या जागा लढणार, हा त्यांचा स्वत:चा प्रश्न असल्याचे नारायण राणे म्हणाले आहेत. 

हे ही वाचा : Ladki Bahin Yojana: 'लाडक्या बहिणीं'ना शिंदे सरकारचं आणखी मोठं गिफ्ट, काय मिळणार मोफत?

यावेळी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांना (ठाकरेंना)  दिर्घ आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, त्यांच्या अपेक्षा पुर्ण व्हाव्यात आणि त्यांनी चांगले बोलावे, अशा शुभेच्छा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिल्या आहेत. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्री असल्याची बॅनरबाजी केली आहे. यावर बोलताना राणे म्हणाले, भावीला काही अर्थ नसतो, भावी कायम भावीच राहतो, मुख्यमंत्रीपद विसरा आता म्हणावं, त्यांचे सरकार येऊ शकत नाही. उद्धव ठाकरेंचं अस्तित्व आता काय वाढणार नाही. आता त्यांना ओहोटी लागलीय, अशी बोचरी टीका नारायण राणे यांनी ठाकरेंवर केली आहे.

दिशा सॅलियन प्रकरणावर बोलताना नारायण राणे म्हणाले की, कोर्टात केस असताना आपण बोलू नये असे वाटतं. आता अनिल देशमुख आरोपी होते, आरोपीला किती गांभीर्याने घ्यावं हा माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे, असे देखील राणे यांनी सांगितले.  

ADVERTISEMENT

हे ही वाचा : Premanand Maharaj : 'फिगर मेन्टेन करणं सोडा, हिंदू महिलांनो तुम्ही 4 मुलं...', प्रेमानंद महाराजांचं वादग्रस्त वक्तव्य

    follow whatsapp

    ADVERTISEMENT