Narendra Modi: 'आरोपींना कठोर शिक्षा...', 'त्या' प्रकरणावरून PM मोदी प्रचंड संतापले!

मुंबई तक

ADVERTISEMENT

ഇന്ത്യൻ പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്ര മോദി
ഇന്ത്യൻ പ്രധാനമന്ത്രി നരേന്ദ്ര മോദി
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत PM मोदी काय म्हणाले?

point

समान नागरी कायद्याबाबत मोदींचं मोठं विधान

point

बांगलादेशच्या परिस्थितीवरही मोदींनी वेधलं लक्ष

PM Narendra Modi On Crime Against Women, दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशातील ७८ व्या स्वातंत्र्यदिनाचा सोहळा लाल किल्ल्यावर मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. परंतु, कोलकातामध्ये डॉक्टर तरुणीच्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेमुळं संपूर्ण देश हादरला आहे. देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून डॉक्टरांच्या विविध संघटनांनी निदर्शने सुरु केली आहे. कोलकाताच्या घटनेबाबत देशात संतापाची लाट पसरलीय. या घटनेच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागलं आहे. अशातच स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांवरील घटनांबाबत दु:ख व्यक्त केलं. मोदी म्हणाले, महिलांवर अत्याचार झाल्यावर दु:ख होतं. यांच गांभीर्य समाजानं आणि राज्य सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणांची तातडीनं चौकशी झाली पाहिजे. राक्षसी विकृतीनं काम करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. ते खूप महत्त्वाचं आहे. महिलेवर अत्याचार झाल्यावर अनेक चर्चा होतात. पण आरोपीला शिक्षा दिल्यावर त्याबाबत एव्हढी चर्चा केली जात नाही. गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण केली पाहिजे. (A wave of anger has spread in the country regarding the incident in Kolkata. the opposition has criticized the rulers. Similarly, on Independence Day, Prime Minister Narendra Modi expressed grief over the incidents against women)

महिलांवरील अत्याचाराच्या घटनांबाबत PM मोदी काय म्हणाले?

महिलांवर अत्याचार झाल्यावर दु:ख होतं. यांच गांभीर्य समाजानं आणि राज्य सरकारनं लक्षात घेतलं पाहिजे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणांची तातडीनं चौकशी झाली पाहिजे. राक्षसी विकृतीनं काम करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. ते खूप महत्त्वाचं आहे. महिलेवर अत्याचार झाल्यावर अनेक चर्चा होतात. पण आरोपीला शिक्षा दिल्यावर त्याबाबत एव्हढी चर्चा केली जात नाही. गुन्हेगारांमध्ये भीती निर्माण केली पाहिजे.

हे ही वाचा >>PM Modi Speech : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा निर्धार, लाल किल्ल्यावर घोषणांचा पाऊस, म्हणाले; "२०३६ चं ऑलिम्पिक..."

समान नागरी कायद्याबाबत मोदींचं मोठं विधान

देशात जो समान नागरी कायदा सुरु आहे, तो एक जातीय नागरी कायदा आहे, असं देशातील काही लोकांना वाटतंय. कायद्या-धर्माच्या आधारावर देशाचं विभाजन जे करतात, त्यांच्याबाबत चर्चा झाली पाहिजे. देशात निधर्मी नागरी कायदा असला पाहिजे, यासाठी आपण काम केलं पाहिजे, तेव्हाच आपली सुटका होईल.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>Independence Day: स्वातंत्र्यदिनी PM मोदींच्या मोठ्या घोषणा! महिला आणि तरूणांसाठी खास काय?   

बांगलादेशच्या परिस्थितीवरही मोदींनी वेधलं लक्ष

बांगलादेशात जे काही झालं त्याबाबत आम्हाला चिंता आहे. कारण आपला देश त्यांच्या शेजारी आहे. लवकरच त्या ठिकाणची परिस्थिती चांगली होईल, अशी आशा आहे. तेथे असणारे हिंदू आणि अल्पसंख्यांक सुरक्षीत असले पाहिजेत. काही लोकांना भारताचं भलं झालेलं पाहायचं नाही. ते फक्त स्वत:च्या भल्याचं विचार करतात. देशाला अशा लोकांपासून वाचवायचं आहे. असे लोक नैराश्यात राहतात. भ्रष्टाचाराविरोधात माझी लढाई सुरुच राहील. भ्रष्टाचाऱ्यांविरोधात भीतीचं वातावरण निर्माण केलं पाहिजे. काही लोक भ्रष्टाचाराचा जय जयकार करत आहेत. परिवारवाद आणि जातीयवाद देशाचं नुकसान करत आहे. निवडणुका पुन्हा पुन्हा होत असल्यानं देशात नाराजी आहे. काही महिन्यांनी निवडणुका येतात. प्रत्येक कामाला निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पाहिलं जातं. सर्व पक्ष आपापल्या पद्धतीनं विचार करत आहेत. वन नेशन, वन इलेक्शनसाठी देशाला पुढे जावं लागेल, असंही मोदी म्हणाले. 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT