Sharad Pawar : शरद पवारांनी PM नरेंद्र मोदींचे मानले आभार, पत्रात केली 'ही' मोठी मागणी!
Sharad Pawar Writes Letter To PM Narendra Modi : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे कोणती मागणी केली?

दिल्ली आणि मराठीचं नातं काय आहे?'

डॉ. उदय कुलकर्णींनी सांगितला संपूर्ण इतिहास.. '
Sharad Pawar Writes Letter To PM Narendra Modi : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून त्यांचे आभार मानले आहेत. 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. या संमेलनाला नरेंद्र मोदीही उपस्थित होते. याच पार्श्वभूमीवर पवार यांनी मोदींना पत्र लिहून मोठी मागणी केली आहे. पहिले बाजीराव पेशवे, महादजी शिंदे आणि सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पूर्णाकृती अश्वारूढ पुतळे उभारण्यासाठी लागणाऱ्या परवानग्या मिळाव्यात, अशी मागणी या पत्राद्वारे शरद पवार यांनी केली आहे.
विशेष म्हणजे या संमेलनात 'नाते दिल्लीशी मराठीचे', असा परिसंवाद रंगला होता. यावेळी तक चॅनेल्सचे मॅनेजिंग एडिटर मिलिंद खांडेकर यांनी डॉ. उदय कुलकर्णी यांना दिल्ली आणि मराठीच्या नात्याबद्दल महत्त्वाचा प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर देताना डॉ. उदय कुलकर्णी यांनी रंजक इतिहास उगलडला. तसच तालकटोराच्या इतिहासाबाबत कुलकर्णी नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
'दिल्ली आणि मराठीचं नातं काय आहे?', डॉ. उदय कुलकर्णींनी सांगितला संपूर्ण इतिहास..
डॉ. उदय कुलकर्णी म्हणाले, "दिल्लीचा संबंध हा छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरु होतो. दिल्ली आपल्याला काबीज करायची आहे, हे महाराजांनी पहिल्यापासून बोलून दाखवलं आहे. राजाराम महाराजांचं एक पत्र आहे. जेव्हा ते जिंजीला होते..मी आता इतके सहा लाख हौंद बाजूला ठेवले आहेत आणि जेव्हा आपण दौलताबाद जिंकू तेव्हा त्यातले दोन लाख होत..जेव्हा आपण रायगड जिंकू..त्यासाठी दोन लाख आणि जेव्हा आपण दिल्ली जिंकू त्यासाठी दोन लाख, असे मी बाजूला ठेवले आहेत. दिल्ली काबिज करायला जाण्यासाठी हे एकप्रकारे प्रोत्साहन होतं. प्राचिन हिंदूस्थानाची राजधानी म्हणून दिल्ली प्रख्यात आहे पांडव काळापासून..त्यामुळे दिल्लीवर आपला अधिकार असावा, हे मराठ्यांपासून शिवाजी महाराजांचं ध्येय होतं".
हे ही वाचा >> रत्नागिरी: होळीदरम्यान मशिदीचा गेट तोडला? काय खरं-काय खोटं.. नेमकं प्रकरण काय?
कुलकर्णी पुढे म्हणाले, "18 व्या शतकात पहिल्यांदा मराठे इथे पोहोचले, ते वर्ष होतं 1719.. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर केवळा 12 वर्षानंतर मुघलांची शक्ती कमी झाली होती. हुसेन अली नावाचा दक्षिणेचा सुभेदार होता. त्याच्यासोबत मोठं मराठा सैन्य इकडे आलं आणि फरुकशाह बादशाहाला त्यांनी गादीवरून हटवलं आणि दुसऱ्या गादीवर राजा बसवला. त्यावेळी संभाजी महाराजांच्या महाराणी येसुबाई, शिवाजी महाराजांच्या पत्नी आणि त्यांचे बरेच कुटुंब तीस वर्ष मुघलांच्या कैदेत दिल्लीला होते.
त्या सर्वांची सुटका करून पुन्हा साताफऱ्याला शाहू महाराजांकडे त्यावेळी घेऊन गेले. ही 1719 ची पहिली मोहीम खूप महत्त्वाची आहे. त्यानंतरची प्रख्यात मोहीम होती 1737 ची..त्या मोहिमेमागे भूमिका अशी होती की, माळवा हा जो प्रांत आहे, त्यात 1700 सालापासून अनेक हल्ले होत गेले..शिंद्यांनी केले, होळकरांनी केले आणि हळूहळू तो प्रांत आपण आपलासाच करून घेतला होता".
हे ही वाचा >> Palghar: लहान मुलांनी उघडली बेवारस सुटकेस, सापडलं महिलेचं छाटलेलं मुंडकं
"पण त्याच्यावर कायदेशीर मोहोर लागायची राहिली होती. सनदशीर पद्धतीने एखाद्या प्रांताचं जे शासन आहे, तसं हस्तांतरित करण्यासाठी जी प्रक्रिया होती. त्या प्रक्रियेसाठी मोहम्मद शाहा बादशाहा त्यावेळी दिल्लीत होता. त्याच्या दरबारात दोन गट होते. एक गट मराठ्यांशी मैत्री करायला तयार होता आणि दुसरा गट नव्हता..तेव्हा बाजीराव साहेबांनी जयपूरहून अनेक वकील पाठवले की, माळव्याची सनद आम्हाला द्या. माळव्यावर आमचंच राज्य आहे. पुण्याला परत माघारी बाजीराव पेशवे गेले, तेव्हा माळव्याची सनद त्यांनी दिली नाही. ते 1736 साली पहिल्यांदा रानोजी शिंदे आणि मल्हारराव होळकर यांना पहिल्यांदा माळव्यात मुक्काम करायला सांगितलं गेलं", असंही डॉ. उदय कुलकर्णी म्हणाले.
"मोहम्मद शहाने सनद दिली नाही, तेव्हा 1737 मध्ये शिंदे, होळकर, बाजीराव, पिळाजी जाधवराव ही सर्व मंडळी उत्तरेकडे गेली. त्यावेळी एक लाख मुघल सैन्य दिल्लीच्या दक्षिणेला होते. त्या एक लाख सैन्याच्या मधून वाट काढत, हे मराठा सैन्य जेमतेम 25-30 हजार घोडेस्वार हे दिल्लीला पोहोचले. तालकटोराचं महत्त्व असं आहे की इथे बाजीराव, मल्हारराव होळकर, रानोजी शिंदे, या सर्वांची इथे छावणी होती. इथे जेव्हा ते आले, तेव्हा पहिल्यांदा कालकाजीच्या देवळात गेले. त्यादिवशी राम नवमीचा दिवस होता. त्यानंतर मुघलांना धक्का बसला की मराठे इथपर्यंत कसे पोहोचले..असा इतिहास कुलकर्णी यांनी यावेळी सांगितला.