Sharad Pawar: बंद खोलीत पवार- CM शिंदेंची भेट, कशाबद्दल झाली चर्चा? Inside Story

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

पवार- CM शिंदेंची भेट, कशाबद्दव झाली चर्चा?, Inside Story
पवार- CM शिंदेंची बंद दाराआड चर्चा, Inside Story
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंची भेट

point

भेटीत दोन नेत्यांमध्ये बंद दारआड नेमकी काय झाली चर्चा?

point

दोन नेत्यांमध्ये तब्बल 20 मनिटं सुरू होती चर्चा.

Sharad Pawar and CM Shinde Meeting: मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (22 जुलै)  सह्याद्री अतिथीगृहात येथे जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शरद पवार हे नेहमीच राज्याच्या प्रमुखांशी चर्चा करत असतात. त्यामुळे त्यांच्या आजच्या या भेटीकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं होतं. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे आणि शरद पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याची नेमकी Inside Story आम्ही आपल्याला सांगणार आहोत. (ncp sp chief sharad pawar and cm eknath shinde met behind closed doors what was discussed inside story)

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका या आता अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्री शिंदेंची घेतलेली ही भेट अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. कारण याच भेटीत राज्यातील राजकारणाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 

शरद पवार-मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीत नेमकं काय ठरलं?

शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीत सुरुवातीला काही औपचारिक गप्पा झाल्या. ज्यामध्ये जलसंपदा, दुधाचे दर आणि साखर कारखान्यांचे काही प्रलंबित प्रश्न यासह अनेक विषयांवर सखोल चर्चा झाली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> RSS : मोदी सरकारचा मोठा निर्णय! 58 वर्षांपूर्वी घातलेली बंदी उठवली

दरम्यान, विशाळगड हिंसाचारामुळे राज्यातील वातावरण हे काहीसं ढवळून निघालं आहे. अशावेळी जातीय सलोखा कायम ठेवण्यासाठी आगामी सर्वपक्षीय बैठक घेण्यात यावी याबाबत प्रामुख्याने चर्चा झाली. ज्याला मुख्यमंत्री शिंदेंनी हिरवा कंदील दिल्याचं समजतं आहे. 

20 मिनिटं बंद दाराआड चर्चा 

सुसंस्कृत महाराष्ट्रात जातीवादाचा गालबोट लागू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यात एकमत झाल्याची माहिती आता समोर आली आहे. याशिवाय मराठा-ओबीसी वादावर शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात तब्बल 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली. मनोज जरांगे आणि ओबीसी नेत्यांना सरकारने जे आश्वासन दिल होते, याबाबत चर्चा झाली नसल्याने विरोधी पक्षात नाराजी होती. या सगळ्या मुद्यांवर शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. त्यामुळे आता आगामी काळात राज्यातील राजकारण हे कोणत्या दिशेने वळण घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

ADVERTISEMENT

विधानसभेआधी जातीय तेढ निर्माण होऊ नये यावर देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांनी चर्चा केली. याबाबत आगामी काही दिवसात पुन्हा सर्वपक्षीय बैठकीचे निमंत्रण विरोधकांनाही देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शरद पवार यांना आश्वासन दिल्यांच सूत्रांकडून समजतंय.

ADVERTISEMENT

हे ही वाचा>> Hiraman Khoskar : काँग्रेस आमदार CM शिंदेंना भेटला! म्हणाला, "कुठतरी जावंच लागतं ना?"

एकीकडे विधानसभेच्या निवडणुका या अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची झालेली भेट ही बऱ्याच गोष्टी अधोरेखित करत आहेत.

राज्याची सत्ता पुन्हा आपल्या हाती यावी यासाठी एकनाथ शिंदे हे बरेच अॅक्टिव्ह झाले आहेत. राज्यात ज्या योजनांच्या लागू करण्यात आल्या आहेत. त्याचे श्रेय घेण्यासाठीही त्यांच्या महायुतीतच सध्या बरीच स्पर्धा सुरू आहे. 

या सगळ्या पार्श्वभूमीवर आता एकनाथ शिंदेंनी शरद पवार यांच्यासोबत बंद दारआड चर्चा केल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.  

    follow whatsapp

    ADVERTISEMENT